
अर्जेंटिना दौऱयावर गेलेल्या हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाला शनिवारी पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. अर्जेंटिनाच्या ‘ब’ संघाने त्यांना 2-1 गोलफरकाने हरविले.
अर्जेंटिनाला सहाव्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी मिळाल्या. मात्र हिंदुस्थानची गोलरक्षक रजनीने हे दोन्ही हल्ले परतावून लावले. मात्र 11 व्या मिनिटाला सोल पगेल्ला हिने गोल करून अर्जेंटिनाचे खाते उघडले. 54 व्या मिनिटाला सलीमा टेटे हिने गोल करून हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पण 57व्या मिनिटाला अगस्टिना गोरजेलानी हिने गोल करून अर्जेंटिनाला 2-1 असे आघाडीवर नेले. यजमान संघाने ही आघाडी कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.


























































