पुंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी 13 जुलै 2022 रोजी हिंदुस्थानच्या लष्कराला जम्मू प्रांतातील पीर पंजाल खोऱ्यातील पुंछ जिल्ह्यात घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न अयशस्वी करण्यात यश आले आहे.

मात्र, घुसखोरांच्या हल्ल्यात किती जीवितहानी झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

‘मध्यरात्रीच्या वेळी, पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न झाला. सतर्क जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला,’ असे लष्कराने सांगितले.

घुसखोरांचा माग काढण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.