
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीर ४४ राष्ट्रीय रायफल्समधील लष्कराचा जवान औरंगजेब याची हत्या करण्याआधी दहशतवाद्यांनी त्याला मारहाण केली. त्याचा १ मिनिट १५ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निळी जीन्स आणि टी-शर्ट घातलेल्या औरंगजेबला त्याचे काम काय असते, पोस्टिंग कुठे असते आणि दहशतवाद्यांविरोधातील कुठकुठल्या ऑपरेशनमध्ये तू सहभागी होतास, याची माहिती विचारण्यात येत होती. त्यानंतर डोक्यात आणि मानेत गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.




























































