अर्णब गोस्वामीच्या शोमध्ये अभिनेत्रीने केले जेवण; ट्रोलर्सला दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्या अभिनेत्री कस्तुरी शंकर हिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अर्ण गोस्वामीसोबतच्या डिबेच शोमध्ये ही अभिनेत्री चक्क जेवताना दिसत आहे. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी कस्तुरीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यावर कस्तुरीने मजेशीर उत्तर देत ट्रोलर्सला प्रतिक्रिया दिली आहे.

या शोमध्ये सुमारे एक तास आपण अर्णबला हायपर मोडवर सहन केले. त्यांनी मला बोलायला संधीच दिली नाही. त्यामुळे या वेळेत जेवण करण्याचे ठरवले. मात्र, त्यावेळी स्काइपहून लॉग आऊट करायला विरसलो, असे तिने सांगितले. कोणालाही दुखावण्याचा आपला हेू नव्हता. मात्र, याघटनेने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण माफी मागतो, असेही तिने स्पष्ट केले आहे.

हा व्हिडीओ शेअर करत एका युजर्सने आपल्यालाही तुमच्यासारखा आत्मविश्वास मिळवायचा आहे, असे म्हटले आहे. तर ही अभिनेत्री अर्णबच्या शोमध्ये काय करत आहे. तिने एखाद्या खाण्याच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, तिचा खाण्याचा वेग बघता याचा फायदा होईल, असे म्हटले आहे. आपल्याला माहिती आहे, अशा शोमध्ये फक्त अर्णबच बोलतात. त्यामुळे बोलण्याची संधी मिळाली नसल्याने कस्तुरीने जवणासाठी तोंड उघडले, असे अका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या विचारधारेवर टीका केली. तर काहींनी तिला सल्लाही दिला. कस्तुरी काय खात आहे, याची उत्सुकता असल्याचे एका युजरने म्हचले. त्यावर दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देत , ती बीफ करी खात असवी अशी टिप्पणी त्यावर केली.

एकही शब्द न बोलत 67 निमिटे गप्प राहून एखाद्याला फक्त ऐकत राहण्याचा अनुभव मी घेतला आहे. तसेच त्यावेळी आपल्याला भूकही लागली होती. त्यामुळे आपल्यासमोर दुसरा पर्याय नव्हता, असेही कस्तुरीने म्हटले आहे. तसेच आपली कोणतीही विचारधारा नसूनकोणत्याही पक्षाशी आपले संबंध नसल्याचे म्हटले आहे.