चोरी, फसवणुकीतील फरार आरोपींना बेडय़ा

241

युनिट-9 ची कारवाई

दोन वेगवेगळ्या गुह्यांतील फरार आरोपींना शोधून काढण्यात गुन्हे शाखा युनिट-9 ला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत लपून राहणाऱया त्या सराईत आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात दिले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जाधव, तसेच मोहिते, नाईक, राऊत, पाटील या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून इस्माईल इब्राहिम सय्यद (40) या चोराच्या मुसक्या आवळल्या. 2015 पासून वर्सोवा पोलीस इस्माईलला शोधत होते. त्याला पुढील कारवाईसाठी वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, भेसळयुक्त तेल प्रकरणातील वॉण्टेड आरोपी घाटकोपर पश्चिमेकडील भारत हॉटेल येथे येणार असल्याची खबर एपीआय वाल्मीक कोरे यांना मिळाली. त्यानुसार महेश देसाई यांच्या सूचनेनुसार एपीआय कोरे, तसेच जितू शिंदे, कदम, परब आदींच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून सुरेश भानुशाली (56), मुश्ताक मझहर शेख (28) आणि अफताब अश्फाक खान (23) या तिघांना पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या