शायनिंग मारणे पडले महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शायनिंग मारण्यासाठी पिस्तुलाचा वापर करणाऱ्या गुरजीत सिंग, निपुंजकुमार पटेल आणि प्रकाश संतांनी या तिघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी निपुंजकुमारने ते पिस्तूल मध्य प्रदेश येथून आणले होते. संतोषनगरच्या पालिका कॉलनीमध्ये राहणाऱ्या एकाकडे पिस्तूल असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण, एटीसी पथकाचे उपनिरीक्षक देवर्षी यांच्या पथकाने तपास सुरू केला. सोमवारी रात्री पोलिसांचे पथक संतोषनगर येथील गुरजीतच्या घरी गेले. तेव्हा गुरजीतकडून एक पिस्तूल, प्रकाशकडून दोन काडतुसे आणि निपुंजकुमारकडून एक जिवंत काडतूस जप्त केले.