‘अदानी म्हणजे हायवे लुटारू’ अर्शद वारसीने ट्विट करताच वाढीव वीज बिलाची समस्या सुटली

2450

विजेचा वापर नसतानाही प्रचंड बिले आल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. सामान्य ग्राहकांपासून अगदी सेलिब्रिटींनाही वाढत्या वीज बिलाचा झटका बसला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर संताप व्यक्त होत आहे. अभिनेता अर्शद वारसी याने तर ट्विटरवर ‘अदानी म्हणजे हायवे लुटारू’ अशी पोस्ट केली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर त्याच्या वीज बिलाची तक्रार कंपनीने दूर केली.

अर्शद वारसीला चालू महिन्यात आलेले वीज बिल पाहून अक्षरशः शॉक बसला. त्याने ट्विटरवर ‘अदानी इलेक्ट्रीसिटी’ कंपनीला टॅग करत अगदी थंड डोक्याने एक संतापजनक पोस्ट केली. ‘‘हायवे लुटारू अदानी’कडून आलेले हे माझं बिल. ते पाहून अदानींना हसू येत आहे. 1,03,564 रुपये तुमच्या खात्यामधून 5 जुलै 2020 रोजी डेबिट झाले.’ अर्शदने केलेल्या या ट्विटनंतर अदानी कंपनीने तत्काळ दखल घेतली.

अदानी इलेक्ट्रीसिटीकडून अर्शदच्या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आले. ‘या महिन्यात जास्त बिल आल्यामुळे तुमची चिंता आम्ही समजू शकतो. तुम्हाला मदत करण्यासही आम्ही तयार आहोत. पण वैयक्तिक बदनामी मात्र सहन केली जाणार नाही.’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्यानंतर कंपनीने अर्शदची समस्याही सोडवली. त्यानंतर त्याने आधीचे सर्व ट्विट डिलिट करून नवे ट्विट पोस्ट केले. ‘अदानी इलेक्ट्रीसिटीकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. समस्या सुटली. आपल्याला फक्त त्यांच्याशी संपर्क करायचा आहे…धन्यवाद’ असे ते ट्विट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या