‘तबला’मय ओंकार

137

>>माधव डोळे

महाराष्ट्रात तबलावादकांची खूप मोठी परंपरा आहे. तबल्याचे रीतसर गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतल्यानंतरच जाहीर मैफलीत सादरीकरण करण्याची परवानगी पूर्वी असायची. सध्याच्या वेगवान काळातही काहीजण ही परंपरा जपत आहेत. तबला हाच ध्यास आणि श्वास असणारे अनेक तरुण गुरूंकडे शिक्षण घेत आहेत. त्यातीलच एक नाव आहे ओंकार कदम.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत असो की सुगम संगीत, त्यात तबला या वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तबल्याशिवाय गाणे म्हणजे मिठाशिवाय जेवण. महाराष्ट्रात तबलावादकांची खूप मोठी परंपरा आहे. तबल्याचे रीतसर गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतल्यानंतरच जाहीर मैफलीत सादरीकरण करण्याची परवानगी पूर्वी असायची. सध्याच्या वेगवान काळातही काहीजण ही परंपरा जपत आहेत. तबला हाच ध्यास आणि श्वास असणारे अनेक तरुण गुरूंकडे शिक्षण घेत आहेत. त्यातीलच एक नाव आहे ओंकार कदम. महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत असताना तो लहानपणापासूच म्हणजे दहा वर्षांपासून तबला शिकतोय. अनेक मुले आधी तबल्याचा क्लास हौसेपोटी लावतात, पण नंतर हा क्लास कधी सुटतो हेच कळत नाही. मात्र ओंकार याच्या घरातच सूर आणि ताल असल्याने जन्मापासूनच त्याला संगीताचे बाळकडू मिळाले.ओंकारचे वडील अशोक कदम हे विख्यात तबलावादक तसेच ढोलकी-ढोलकवादक असून ते गेली 25 वर्षे गानसम्राज्ञी लता मंगेशकर व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे तबला वाजवतात. आतापर्यंत देशविदेशातील असंख्य मैफलींना तसेच रेकार्ंडगलाही त्यांनी साथसंगत केली आहे. कदम यांचे कल्याणमधील खडकपाडा या भागात स्वतŠचे प्रथमेश संगीत विद्यालय असून संगीत क्षेत्रात या विद्यालयाचा सुरेल दबदबा आहे. वडिलांची तबल्यावर तसेच ढोलकीवर फिरणारी लिलया बोटे बघून बाल ओंकारच्या मनात तबल्याचे बोल घुमले. तबल्याच्या या संस्कारामुळेच त्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून आपल्या वडिलांकडेच तबल्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. दादरा, झपताल, त्रिताल, केरवा, चौताल, आडा चौताल असे अनेक प्रकार तो लिलया वाजवत असून तालाच्या अंतरंगात शिरून त्याच्याशी एकरूप होण्याची त्याची अभ्यासी व समाधीस्थ वृत्ती असल्याने तबला हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.

रोज चार ते पाच तास रियाज

तबल्यालाच आपला खरा मित्र मानणारा ओंकार रोज चार ते पाच तास रियाज करतो. कार्यक्रमांमध्ये फक्त साथसंगत करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा तबल्यातील बारकावे, मात्रा, लय अशा अनेक बाबींचा अभ्यास तो करतो. कॉलेजच्या शिक्षणाबरोबरच तबल्यामध्ये संशोधन करून त्यात डॉक्टरेट मिळविण्याचा निर्धार ओंकार कदम याने केला आहे. त्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असले तरी फक्त पुरस्काराच्या मागे न धावता रियाजाची साधना जास्तीत जास्त करण्याकडेच त्याचा कल आहे. सध्या तो जागतिक कीर्तीचे जलद तबलावादक अल्ताफ हुसैन ताफू खान यांच्याकडे धडे गिरवीत आहे.

हृदयनाथ मंगेशकरांची दिलखुलास दाद

ओंकारने आतापर्यंत अनेक कार्यक्रम केले. विशेष म्हणजे कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर व नगरच्या तुळजाभवानी मंदिरात केलेले तबलावादन त्याला वेगळीच अनुभूती देऊन गेली. महालक्ष्मी मंदिरातील तबलावादनाचा क्षण हा जणू देवीचा प्रसादच असल्याची त्याची भावना आहे. परभणी व नांदेडमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम कार्यक्रमात त्याने तबल्याची साथ केली होती. यावेळी त्याची तबल्यावरून फिरणारी बोटे तसेच सफाईदारपणा व तयारी बघून मंगेशकर यांनी ‘वा… क्या बात है….’ अशी मुक्तकंठाने दाद दिली होती. ही दाद आपण काळजाच्या कप्प्यात जपून ठेवली असल्याचे तो सांगतो. टेलिव्हीजनवरील स्वरप्रवाह तसेच म्युझिक महेफिल या कार्यक्रमातही त्याचे तबलावादन गाजले होते. त्याचा पहिलाच सोलो परफॉर्मन्स सह्याद्री वाहिनीवर झाला.

गिटार, व्हायोलीन आणि हार्मोनियम

तबल्यामध्येच करीअर करण्याचा निर्णय ओंकारने घेतला असला तरी गिटार, व्हायोलीन, की बोर्ड तसेच हार्मोनियम ही वाद्येही तो तेवढय़ाच सफाईदारपणे वाजवतो. त्याचा मोठा भाऊ हा स्वतŠ उत्कृष्ट की बोर्ड व हार्मोनियम प्लेअर असून कदम यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतमय झाले आहे. लहान वयात ओंकार याने तबल्याच्या क्षेत्रात घेतलेली झेप बघता त्याच्यामध्ये भावी संगीतकार दडला आहे हे मात्र नक्की. हा नादमयी ओंकार असाच बहरत जावा ही शुभेच्छा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या