370 कलमाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधून 370 आणि 35ए ही कलमे हटविण्याच्या विरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारपासून सुनावणी सुरू झाली. केंद्र सरकारने ही कलमे हटविण्याच्या निर्णयाविरुद्ध या याचिकांमध्ये विरोध व्यक्त करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एन. व्ही. रामना यांच्या नेतृत्त्वाखालील पाच जणांच्या खंडपीठाने याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस जारी करत उत्तर मागविले आहे. एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेत कलम 370 आणि 35ए हटविण्याबाबत केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेली अधिसूचनाच बेकायदेशीर होती असे म्हटले आहे. केंद्र सरकार देशात आपला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही या वकिलाने आपल्या याचिकेत केला होता. या याचिकांमध्येच कश्मीर टाइम्सचे कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांनीही एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी कलम 370 हटविल्यानंतर पत्रकारांवर लादण्यात आलेले नियंत्रण हटविण्याची मागणी केली आहे.