
>>सूर्यकांत पाठक
भारतीय रेल्वेने तत्काळ श्रेणीतील तिकिटाच्या बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. आता काऊंटरवर तत्काळ तिकीट काढायचे असेल तर मोबाईलवरचा ओटीपी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे तत्काळ श्रेणीतील तिकिटाचा होणारा काळाबाजार रोखला जाईल, शिवाय पारदर्शकता वाढेल आणि गरजू प्रवाशांना त्याचा लाभ मिळेल. अनेक एजंट एकाच वेळी अनेक तिकीट काढण्यासाठी बनावट नंबर आणि ओळखपत्राचा आधार घेतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तत्काळ श्रेणीतील तिकीट मिळणे कठीण जाते. आता तिकीट बुक करण्यासाठी प्रवासी स्वत: हजर असणे आणि मोबाईल नंबरची पडताळणी अनिवार्य आहे. या बदलामुळे गरजू प्रवाशांना लाभ मिळेल.
भारतीय रेल्वेने तत्काळ श्रेणीतील तिकिटाच्या बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. आता काऊंटरवर तत्काळ तिकीट काढायचे असेल तर मोबाईलवरचा ओटीपी महत्त्वाचा आहे. या ओटीपीद्वारे प्रवाशाची पडताळणी केली जाणार आहे. ओटीपी नमूद केल्यानंतरच तिकीट निश्चित होईल. रेल्वेच्या मते ओटीपीचे बंधन घातल्याने तत्काळ श्रेणीतील तिकिटाचा होणारा काळाबाजार रोखला जाईल, शिवाय पारदर्शकता वाढेल आणि गरजू प्रवाशांना त्याचा लाभ मिळेल. नवीन प्रणाली प्रायोगिक पातळीवर राबविण्यात आली आणि ती यशस्वीही ठरली आहे.
रेल्वेच्या मते, गेल्या काही वर्षांत तत्काळ तिकिटाचा काळाबाजार वाढला होता. तसेच बनावट बुकिंगच्या पारीदेखील वाढल्या आहेत. अनेक एजंट एकाच वेळी अनेक तिकीट काढण्यासाठी बनावट नंबर आणि ओळखपत्राचा आधार घेतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तत्काळ श्रेणीतील तिकीट मिळणे कठीण जाते. आता ओटीपीतून पडताळणी होत असल्याने प्रत्येक तिकीट बुक करण्यासाठी प्रवासी स्वत: हजर असणे आणि मोबाईल नंबरची पडताळणी अनिवार्य झाली आहे. अर्थात ही व्यवस्था ऑनलाईन तिकिटाच्या आरक्षणात लागू केलेली आहे आणि त्यात आता तत्काळ श्रेणीची भर पडली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बदलाला मान्यता देताना रेल्वेची आरक्षण व्यवस्था आणि तिकीट प्रणाली संपूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित व प्रवासीपुरक करण्याचा यामागचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. जुलै 2025 मध्ये ऑनलाइन तत्काळ तिकिटासाठी आधारआधारित ऑथेटिकेशन लागू करण्यात आले आणि त्यामुळे बनावट आयडीचा वापर बऱ्यापैकी कमी झाला. त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये जनरल रिझर्व्हेशन सिस्टममध्ये ओटीपी व्हेरिफिकेशनला जोडले.
प्रायोगिक तत्त्वावर चाचणी यशस्वी
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी त्याची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. त्यानुसार देशभरातील 52 रेल्वेगाडय़ांत ओटीपीआधारित तत्काळ तिकीट प्रणाली लागू केली. या चाचणीचे परिणाम सकारात्मक आले. रेल्वे कर्मचाऱ्याच्या मते, प्रायोगिक चाचणीच्या वेळी बनावट बुकिंगच्या प्रमाणात सुमारे 40 टक्के घट झाली आणि गरजू प्रवाशांना तिकीट मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली.
नवी व्यवस्था कशी असेल
नव्या व्यवस्थेनुसार, एखादा प्रवासी तत्काळ तिकिटासाठी काऊंटरवर दाखल होईल तेव्हा तिकीट पी करणारा कर्मचारी प्रवाशाचा मोबाईल क्रमांक घेईल. त्यानंतर प्रवाशाच्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओटीपी क्रमांक पाठवेल. ओटीपीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तिकीट जारी केले जाईल. प्रवाशाने चुकीचा मोबाईल क्रमांक दिल्यास, ओटीपी येत नसेल तर तिकीट दिले जाणार नाही.
तिकीट प्रणाली सुरक्षित करणे
रेल्वेने म्हटल्यानुसार, ओटीपी पडताळणी प्रणाली लागू करण्याचा उद्देश हा प्रवाशांच्या कटकटीत वाढ करण्याचा नाही. उलट तिकीट व्यवस्था सुरक्षित करण्याचा आहे. डिजिटल प्रािढयेचा स्वीकार केल्याने आगामी काळात तिकीट बुकिंग आणि प्रवाशाची खातरजमा या दोन्ही गोष्टी सहज होतील. रेल्वेच्या दाव्यानुसार या बदलामुळे गरजू प्रवाशांना लाभ मिळेल. कारण या व्यवस्थेत तिकीट खरेदीत पारदर्शकता राहणार असून बुकिंगमध्ये कोणतीही फसवाफसवी नसेल. प्रवाशांनी मोबाईल ाढमांक अपडेट ठेवण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. तसेच तिकीट बुकिंगच्या काळात मोबाईल जवळ बाळगण्याचाही सल्ला दिला आहे. जर मोबाईल नंबर चुकीचा किंवा जुना असेल तर ओटीपी मिळणार नाही. परिणामी तिकीट मिळणार नाही. तसेच ज्येष्ठ किंवा विशेष प्रवाशांसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मदत केली जाईल. कोणताही गरजू प्रवासी तिकिटापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. या सुधारणांमुळे रेल्वेने या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात तिकिटिंग सिस्टमचे डिजिटायजेशन करण्याचे ध्येय आहे.
चार्ट व्यवस्थेत बदल
प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वेने आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कालावधीतदेखील बदल केला आहे. आतापर्यंत बहुतांश रेल्वेचा चार्ट त्यांच्या निर्धारित प्रस्थान वेळेच्या चार तास अगोदर जारी केला जात असे. या कारणामुळे प्रतीक्षा यादीत अडकलेले प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, हे कळत नसायचे. प्रवास काही तासांवर आलेला असताना तिकिटाची स्थिती कळत असे आणि अशा वेळी त्यांची प्रवासाची योजना बारगळत असे. त्यामुळे रेल्वेने आता चार्ट जारी करण्याची वेळ चार तासांवरून आठ तासांवर नेली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना तिकिटाची शेवटची स्थिती समजल्यानंतर प्रवासात बदल करण्यास पुरेसा वेळ मिळेल. जर एखाद्याचे तिकीट कन्फर्म झाले नाही तर तो अन्य रेल्वेचे तिकीट काढू शकेल किंवा बस किंवा विमानातून प्रवास करू शकेल.
रेल्वे मंत्र्यांच्या मते, चार्टच्या वेळात केलेला बदल हा प्रवाशांना अधिक वेळ मिळण्यासाठी आणि प्रवासाची पुढील योजना आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. तत्काळ तिकिटात काळाबाजार होत असल्याच्या पारी अनेक वर्षांपासून येत होत्या. त्यानंतर दलाल जादा किमतीने तिकिटांची पी करत असत. ऑक्टोबर 2025 मध्ये ऑनलाईन तिकिटात ओटीपी बंधनकारक केल्यानंतर बनावट बुकिंगचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम पाहता रेल्वेने तत्काळ तिकीट प्रणालीतही ही व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला.
( लेखक अ.भा.ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.)


























































