विस्मृतीत गेलेले कर्मयोगी

>> आनंद मुकुंदराव मुंजे

स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर आणि तत्कालीन मध्य प्रांतातील राजकारण व समाजकारणात धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे आणि धर्मवीर डॉ. लक्ष्मण वासुदेव परांजपे यांचा मोठा वाटा होता. त्याशिवाय तिसरे डॉक्टर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार. डॉ. ल. वा. परांजपे यांची 29 नोव्हेंबरला जयंती. त्यांच्या कार्याचा हा आढावा…

स्मरण

आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वी नागपुरात काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन होण्याचे ठरले होते. नागपूरच्या सर्व काँग्रेस नेत्यांनी लोकमान्य टिळक यांनाच काँग्रेसचे अध्यक्ष करण्याचे निश्चित केले होते. मात्र 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचे अकाली निधन झाल्याने त्यांचा मनसुबा पूर्णत्वाला नेता आला नाही. खरे तर या अधिवेशनामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. या अधिवेशनाच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी एक स्वयंसेवक दल उभारण्यात आले होते. त्याचे नाव ‘भारत स्वयंसेवक मंडळ.’ सर्व स्वयंसेवकांना लष्करी पद्धतीचा गणवेश स्वखर्चाने करवून घेण्यास सांगण्यात आला होता. त्या स्वयंसेवक मंडळाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण वासुदेव परांजपे आणि सहप्रमुख डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे होते. त्याच वेळी डॉ. परांजपे यांनी अशी ‘स्वयंसेवक दले’ कायमस्वरूपी उभी करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच 1920 पासूनच हा विचार मनात घोळत होता हे स्पष्ट आहे.

सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने जे जे करणे आवश्यक असते ते कार्य करणे हीच दूरदृष्टी त्या वेळच्या नागपूरच्या सर्व सामाजिक व राजकीय प्रभावळीतल्या नेत्यांची होती. याच उद्देशाने पुढील पाच वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. राष्ट्र उभारणीसाठी व समाजाच्या समतोल व सर्वांगीण विकासासाठी इतर ज्या संस्था उभारण्याची गरज असते ती सर्व संस्थात्मक कामे या सर्व नेत्यांनी केली. त्यात शिर्षस्थानी धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे, डॉ. ल. वा. परांजपे आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार ही प्रमुख नेते मंडळी होती. साधनांची व दळणवळणाच्या साधनांची प्रचंड कमतरता असूनही त्यांनी एकाच आयुष्यात जी कामे व संस्था उभ्या केल्या ते बघून अचंबित व्हायला होते. 1920 पर्यंत नागपूरकर नेते मंडळी हे लोकमान्य टिळकांच्या जहाल मतवादी राजकारणाचे प्रमुख पेंद्र बनले होते, परंतु 1920 च्या काँग्रेस अधिवेशनानंतर गांधींच्या उदयानंतर मात्र नागपूरच्या जहाल मतवादी मंडळींना गांधींच्या राजकारणाची पद्धत काही रुचली नाही व त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. नंतरच्या काळात ‘हिंदू महासभा’ संघाची स्थापना करण्यात याची परिणती झाली. आधीपासून जहाल विचारांच्या या नेत्यांचा क्रांतिकारकांशीही जवळचा संबंध होता.

डॉ. ल. वा. परांजपे हे नागपुरातील प्रतिष्ठत सर्जन होते व नागपूरच्याच मेयो हॉस्पिटलचे पहिले ऑनररी सर्जन होते. त्यानंतर त्यांनी नागपुरातले पहिले बेडेड हॉस्पिटल सुरू केले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना कार्यकर्त्यांना ब्रिटिश सैनिकांचा प्रसाद मिळे तेव्हा जखमी कार्यकर्त्यांवर त्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी ‘स्वस्तिक सुश्रृषा पथक’ उभे केले होते. प्लेगच्या साथीतही याचा उपयोग झाला. 1925 च्या सुमारास व त्यानंतर संघाची वैचारिक संकल्पना, ध्येयवाद, त्याची दैनंदिन शाखापद्धती, प्रार्थना, हिवाळी व उन्हाळी संघाच्या अधिकाऱयांच्या शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षणासाठी नियोजनबद्ध शिबिरे, एक तासाच्या सूचनेने एकत्रीकरणाच्या रॅलीची पद्धत, वर्षातील उत्सव, संघाचे नामकरण या सर्व प्रक्रियेत डॉ. ल. वा. परांजपे यांचे प्रमुख मार्गदर्शन व सक्रिय सहभाग होता.

डॉ. ल. वा. परांजपे यांनी जी संस्थात्मक उभारणीची कामे केली ती अचंबित करणारी आहेत. दलितोद्धारासाठी चोखामेळा वसतिगृह व शाळा, हिंदू महिला परिचारिका प्रशिक्षण, महिला प्रसूतिगृह, खास हिंदू मुलींसाठी शैक्षणिक संस्था, दोन अनाथ वसतिगृह व शाळा, तरुणांच्या बलोपासनेसाठी व्यायामशाळा, शिवजयंती व गणेशोत्सव, विविध देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन, जंगल प्रदेशात सहली, रायफल क्लबमध्ये सहभाग.

राष्ट्र सेविका समितीच्या आद्य संचालिका मावशी केळकर यांनी डॉ. परांजपे यांचे सतत मार्गदर्शन घेतले व समितीच्या कार्यक्रमांना ते बौद्धिकांना जात असत. डॉ. हेडगेवार हे अतिशय स्वाभिमानी होते व विनाकारण दिलेली आर्थिक मदत स्वीकारत नसत म्हणून परांजपे भावंडांनी स्थापन केलेल्या इन्शुरन्स पंपनीत डॉ. हेडगेवारांची मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्ती करून ठरावीक मानधन देण्याची सोयही केली. डॉ. परांजपे यांनी निजामाने चालवलेल्या हिंदूंच्या छळाविरुद्ध झालेल्या भागानगर सत्याग्रह आणि गांधी हत्येनंतर संघावर आलेल्या बंदीकाळात तुरुंगवासही भोगला. डॉ. हेडगेवारांनी ‘जंगल सत्याग्रहात’ भाग घेण्याचे ठरवले तेव्हा त्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. ल. वा. परांजपे यांच्यावर विश्वास न ठेवता तरच नवल. जंगल सत्याग्रहात भाग घेण्यापूर्वी डॉ. हेडगेवारांनी ‘सरसंघचालक’ पदाची जबाबदारी डॉ. ल. वा. परांजपे यांच्यावर सोपवली व ती प्रभावीपणे डॉ. परांजपेंनी सांभाळून संघ शाखा दुपटीहून जास्त वाढवल्या. सरसंघचालक हे पद संघाच्या दृष्टीने उल्ग्dा & झ्प्ग्त्देदज्प असे असते. त्यामुळे पुढील काळातही डॉ. ल. वा. परांजपे यांनी संघाला मार्गदर्शन व आर्थिक मदत देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या