‘कू’ पर्यायी सत्याचा आविष्कार

>> अतुल कहाते

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल्टरनेट रिऑलिटी’ नावाचा शब्द अमेरिकेमध्ये रुजवला आणि जगभरात तो अनेक जणांनी आनंदानं उचलला. ‘कू’ नावाचे नवे देशी अॅप हादेखील ‘पर्यायी सत्या’चा आविष्कारच आहे. स्वतंत्र समाज माध्यमं देशोदेशी उभी राहायला लागली तर प्रत्येक देशच नव्हे, तर त्या देशामधले काही राजकीय पक्ष, वैचारिक गट आपल्याला उपयुक्त ठरणारी ‘सत्यं’ उभी करणार आणि ती सगळ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करणार. हे आहे या नव्या समाज माध्यमांचं पर्यायी नव्हे, तर खरं सत्य!

संदेशवाहक म्हणायचं? म्हणजेच ती नेमपं काय प्रसारित व्हायला पाहिजेत हेसुद्धा ठरवतात की आधीच प्रसारित झालेलं किंवा आता प्रसारित होत असलेलं फक्त वाहून नेण्याचं काम करतात? याबाबतीत निरनिराळ्या लोकांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. तसंच जर आपण ही खरोखरच माध्यमं आहेत असं म्हटलं तर बघणाऱयाच्या दृष्टिकोनातून ती कधी सोयीची ठरू शकतात तर कधी अडचणीची ठरू शकतात. केंद्रीय सरकारचा ट्विटरशी सुरू असलेला संघर्ष याप्रकारे बघितला तर आपल्याला ‘कू’ नावाच्या नव्या देशी अॅपच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चेचा अर्थ लागू शकेल.

नावापुरती लोकशाही अस्तित्वात ठेवून एकतर्फी संवाद साधायचा यासाठी ट्विटरसारखी माध्यमं उत्कृष्ट आहेत. अनेक देशांमध्ये आपल्याला नेत्यांनी त्याचा वापर अतिशय यशस्वीपणे केलेला असल्याचं दिसून येतं. खरे प्रश्न चर्चेत येऊ न देणं, टीकाकारांच्या प्रश्नांना दुर्लक्षून टाकणं, सारासार विवेकबुद्धी गमावून आपल्या शरण आलेल्या लोकांना सतत काहीतरी चमचमीत चघळायला देणं अशी अनेक वैशिष्टय़ं यातून दिसतात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पनीसुद्धा हेच केलं. फक्त आपल्या बाजूनं बोलणारे म्हणजे देशप्रेमी आणि उरलेले सगळे देशद्रोही अशी सरसकट व्याख्या करून आपल्या बाजूच्यांना सतत चेतवत राहण्याचा प्रकार ट्रम्पनी सातत्यानं केला. अवघड प्रश्नांची उत्तरंच द्यायची नाहीत. कारण हाताशी ट्विटर होतं. आता हे अनेक देशांमध्ये घडत असल्याचं आपण दररोज अनुभवतो. ज्यावेळी ट्विटरनं ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात त्यांच्याकडून ट्विटर वापरण्याचे हक्कच काढून घेतले तेव्हा कुठे हे संपलं. अर्थातच तेव्हा खूप उशीर झाला होता.

अशा प्रकारे ट्विटरचा वापर झाल्यामुळे समाज माध्यमांकडे आपण नक्की कसं बघायचं? हा प्रश्न गहन बनला. सुरुवातीला अरबी देशांमध्ये झालेल्या क्रांतीमध्ये तसंच हिंदुस्थानात ‘निर्भया’ प्रकरणाच्या सुमाराला झालेल्या निदर्शनांमध्ये समाज माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली असं चित्र दिसत होतं. साहजिकच हे हत्यार लोकशाहीवादी लोकांना, चळवळीत असलेल्यांना उपकारक असल्याचं मत पसरलं. आंदोलन करणाऱया लोकांना या माध्यमांचा अतिशय सकारात्मकपणे वापर करता येईल आणि प्रस्थापित व्यवस्थांना हादरवून टाकता येईल असा समज सर्वदूर पसरला. काही चतुर लोकांना मात्र या समाज माध्यमांची ही बाजू आपल्याला पार उलथवून टाकता येईल आणि कसलंही उत्तरदायित्व नसलेली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा गैरवापर करता येईल हे लगेच उमगलं. अत्यंत वेगानं खोटय़ा बातम्या आणि अफवा पसरवणं, त्या सातत्यानं बिंबवत राहणं, अपप्रचार करणं, आपली प्रतिमा उजळवत ठेवणं यासाठी ही समाज माध्यमं उत्पृष्ट साधनं ठरली. शेकडोंच्या संख्येनं लोक नेमून आपल्याला अनुकूल असलेल्या बातम्या पसरवत राहणं, त्या परत परत शेअर करत राहणं, आपल्या विरोधकांविषयी अपमानास्पद मजकूर पसरवणं असे प्रकार वाढीला लागले. दहावेळा खोटं बघितल्यावर किंवा वाचल्यावर अकराव्यांदा ते खरं वाटतं हे गोबेल्स तंत्र विसाव्याच नव्हे, तर एकविसाव्या शतकातही यशस्वी ठरू शकतं हे दिसून आलं.

ट्रम्प यांच्याबाबतीत बोलायचं तर मेक्सिको आणि चीन यांना आपले मुख्य शत्रू ठरवून आपल्या समर्थकांना चेतवत ठेवण्यासाठी ट्विटर हे उत्कृष्ठ साधन ठरलं. तसंच अमेरिकेमधल्या संकटांना जागतिकीकरण कारणीभूत असल्याचा कांगावा करून ट्रम्प यांनी स्वदेशीचा नारा दिला. अनेक ठिकाणी अनेक नेते हे करत आलेले असल्यामुळे त्यात नवं काहीच नाही. अमेरिकेसारख्या देशानं जाहीरपणे स्वदेशीचा पुकार केल्यावर इतर काही देशांमधल्या नेत्यांनाही अचानकपणे स्वदेशीचा साक्षात्कार झाला. अमेरिका ही बहुसंख्याकांबाबतीत इतर जगाच्या पुढे. तिला स्वदेशी धोरणं काही प्रमाणात राबवण्यामध्ये फार अडचणी आल्या नाहीत. उदाहरणार्थ, अगदी समाज माध्यमंही बऱयाच अंशी अमेरिकी असल्यामुळे स्वदेशीच्या व्याख्येत ती बसत होती. इतर देशांना मात्र ट्विटरसारख्या माध्यमांना पर्याय शोधणं गरजेचं ठरण्याची चिन्हं दिसायला लागली. आपल्या देशाबद्दल बोलायचं तर ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचं बघून सरकारी पातळीवर अस्वस्थता वाढली. त्यातच दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार ट्विटरचा वापर देशद्रोही कृत्यांसाठी, खलिस्तानच्या प्रचारासाठी करण्यात आल्यामुळे ट्विटरवर कारवाई करायचं सरकारनं ठरवलं. काही खाती ट्विटरनं बंद करण्याचा आदेश सरकारनं दिला.

मोठी गंमत म्हणजे जागतिक पातळीवरच्या समाज माध्यमाऐवजी देशांनी आपापली समाज माध्यमं काढली तर एका देशामधल्या समाज माध्यमावर आलेला मजकूर हा दुसऱया देशासाठी शत्रूच्या मजपुरासारखा वाटू शकतो. उदाहरणार्थ, चिनी समाज माध्यमावर आलेला मजकूर अमेरिकी लोकांना शत्रूच्या मजपुरासारखा वाटणार आणि अमेरिकी समाज माध्यमावर आलेला मजकूर चिनी लोकांना शत्रूच्या मजपुरासारखा वाटणार. म्हणजेच ज्या उदात्त हेतूनं समाज माध्यमांची निर्मिती झाली आणि त्यांच्यामुळे जग सपाट होईल असं थॉमस फ्रीडमनसारखे लोक म्हणायचे. त्याच्या बरोबर उलटा प्रकार यातून घडणार. तसंच सर्वसामान्य लोकांना समाज माध्यमांमुळे आवाज मिळाला असं म्हटलं जातं, त्यालाही काही अर्थ राहणार नाही. कारण थोडा जरी विरोधी सूर काढला तरी तो लगेच दाबला जाण्याची व्यवस्था त्या-त्या देशामधलं समाज माध्यम करणार हे उघड आहे.

‘कू’ या समाज माध्यमावर रॅचेल जॉन यांना आलेला अनुभव वाचण्यासारखा आहे. त्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचं तर ‘कू’ अॅप वापरणाऱयाचं नाव, वय, वैवाहिक स्थिती, लोकेशन अशी सगळी माहिती गोळा करतं. मी पुणाला ‘फॉलो’ करावं याच्या यादीत या अॅपनं सगळ्यात वर रिपब्लिक टीव्ही, अमित मालवीय, पीयूष गोयल अशी नावं दाखवली. त्यानंतर या अॅपमधला फेरफटका हा जणू पर्यायी सत्यासारखा होता. आपल्याशी असहमत असलेल्या लोकांना ट्विटरमधून काढून टाकावं अशी ज्या लोकांची मागणी होती, ती कूर्ण करूनच हे अॅप सुरू झाल्यासारखं वाटत होतं. जणू काही आपण काहीतरी बोलत आहोत आणि खोलीमधला प्रत्येक माणूस सहमती दर्शक मान डोलावत असावा. पुणीही आपल्याशी असहमत नाहीच. या अॅपवरचे सगळ्यात लोकप्रिय युजर्स ‘द वेदिक रिंग ऑफ फायर’, ‘द फ्रस्ट्रेटेड इंडियन’, ‘वेदिक कीडा’ असे आहेत. कमालीचा देशाभिमान, धार्मिक कट्टरता आणि असंख्य षडयंत्रांविषयीच्या काल्पनिक कहाण्या यांनी ही खाती भरलेली आहेत.

‘कू’ या नव समाजमाध्यमाचा वापर नक्की कोण, कसा आणि कशासाठी करणार हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? घासून गुळगुळीत झालेल्या त्याच त्या गोष्टी ‘कू’वर फिरत राहणार आणि व्हॉट्सअॅप विद्यापीठाप्रमाणे ‘कू’चं स्वतःचं विद्यापीठही सुरू होणार हे नक्की. आपली बुद्धी, विचारशक्ती हे सगळं गहाण टाकून समोर आलेले चेतावणारे संदेश सर्वशक्तिनिशी क्षणार्धात पुन्हा प्रसारित करणं, त्यात स्वतःची भर टाकणं हे सुरू राहणार. विरोधी किंवा वेगळ्या मतांचं कुणी नसल्यामुळे पुणावर थेटपणे तुटून पडण्याची संधी मात्र इथे मिळणार नाही. उलट सगळेच आपल्याशी सहमत असल्याचा सुखद गारवा सगळ्यांना अनुभवता येणार.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल्टरनेट रिऑलिटी’ नावाचा शब्द अमेरिकेमध्ये रुजवला आणि जगभरात तो अनेक जणांनी आनंदानं उचलला. ‘कू’ नावाचे नवे देशी अॅप हादेखील ‘पर्यायी सत्या’चा आविष्कारच आहे. स्वतंत्र समाज माध्यमं देशोदेशी उभी राहायला लागली तर प्रत्येक देशच नव्हे, तर त्या देशामधले काही राजकीय पक्ष, वैचारिक गट आपल्याला उपयुक्त ठरणारी ‘सत्यं’ उभी करणार आणि सगळ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करणार. हे आहे या नव्या समाज माध्यमांचं पर्यायी नव्हे, तर खरं सत्य!

देशोदेशींचे ‘कू’

आता ट्विटर वापरू नका; त्याऐवजी हिंदुस्थानमध्ये तयार झालेलं ‘कू’ नावाचं अॅप वापरा असं अधिपृत-अनधिपृतपणे काही मंत्री आणि तथाकथित सेलिब्रिटी सुचवत आहेत. म्हणजेच जोपर्यंत ट्विटरचा वापर आपल्यासाठी अनुकूल होता तोपर्यंत त्याचा वापर करण्यात काही चुकीचं नव्हतं; पण आता मात्र त्यामध्ये दोष असल्याचं सांगितलं जातं आहे. तसंच आत्मनिर्भरतेच्या घोषणेशी हिंदुस्थानमधलं ट्विटरसारखं एखादं मिळतंजुळतं उत्पादन वापरायला सांगणं हे जोडता येत असल्यामुळे त्यात काहीच अडचण नाही. आता ट्विटरसारखी माध्यमं जागतिक पातळीवर सगळ्याच विचारसरणीच्या, सगळ्याच देशांमधल्या लोकांना मुक्तपणे आपली मतं मांडण्याची संधी देत असल्यामुळे सगळ्यांनाच ते चालेल असं नाही. साहजिकच अनेक देशांमध्ये आपापलं ‘कू’ अवतरलं तर त्याचं आश्चर्य वाटू नये.

ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप ही सगळी माध्यमं नेमकी आहेत तरी कशी? त्यांना माध्यमं म्हणायचं का निव्वळ

z [email protected]
(लेखक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या