>> डॉ. अविनाश भोंडवे
आधुनिक जीवनशैलीचे फलित म्हणून विसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात जे आजार जगभरात मोठय़ा प्रमाणात फोफावले, त्यात मधुमेहाचा क्रमांक खूप वर लागतो. आज जगामध्ये अंदाजे 42.5 कोटी आणि हिंदुस्थानमध्ये सव्वासात कोटी लोकांना मधुमेह आहे. त्यामुळेच हिंदुस्थानला मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणून गणले जात आहे. 14 नोव्हेंबरच्या जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने…
दरवर्षी 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून जगभरात साजरा होतो. या निमित्ताने जगातील सर्व नागरिकांचे मधुमेहाविषयी प्रबोधन केले जाते. मधुमेह हा बऱयाच प्रमाणात आनुवंशिक असल्याने त्यात कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळेच या वर्षीचे घोषवाक्य आहे, ‘कुटुंब आणि मधुमेह’ या कार्यक्रमांतर्गत कुटुंबात असलेल्या मधुमेही रुग्णांची काळजी कशी घ्यायची, त्यांना कशी मदत करावयाची याबाबत अनेक प्रकल्प जागतिक स्तरावर घेतले जाणार आहेत. रुग्णांची काळजी आणि कुटुंबातील इतरांसाठी काय प्रतिबंधक उपाय करावयाचे याबाबत अभियान राबवले जाणार आहे. यासाठी मधुमेहाबाबत काही मूलभूत माहिती प्रत्येकाला असणे आज अत्यंत जरुरीचे आहे.
शरीरात पुरेसे इन्सुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लुकोज पेशींना त्यांच्या कार्यासाठी मिळत नाही पण रक्तातील त्याची पातळी वाढत जाते. यालाच मधुमेह म्हणतात.
मधुमेहाचे प्रकार
टाईप 1- या व्यक्तींच्या शरीरात स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन जन्मतःच अजिबात तयार होत नाही किंवा ते हळूहळू पूर्ण थांबलेले असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढलेले राहते. एकुणातल्या 10 टक्के रुग्णांना अशा प्रकारचा मधुमेह असतो.

टाईप 2- जगात 90 टक्के रुग्ण या प्रकारचे आहेत. या रुग्णांमध्ये शरीरातील काही पेशींमुळे इन्सुलिनच्या कार्यांना अडथळा निर्माण होत असतो. या अडथळ्याला ’इन्सुलिन रेझिस्टन्स’ (इन्सुलिन अवरोध) म्हणतात. या अवरोधामुळे शरीरात निर्माण होणारे इन्सुलिन शरीरातील साखर कमी करण्यास अपुरे पडते आणि रक्तातील साखर वाढत जाते.
उतारवयातील मधुमेह- अनेकदा वाढत्या वयानुसार शरीरातील इतर अवयवांबरोबर स्वादुपिंडाचेही कार्य कमी होऊन त्यातून इन्सुलिन कमी प्रमाणात निर्माण होऊन मधुमेह होतो.
गर्भवती स्त्रियांचा मधुमेह- अनेक स्त्रियांमध्ये दिवस गेल्यानंतर दुसऱया किंवा तिसऱया तिमाहीत इन्सुलिनचे प्रमाण घटून मधुमेह होतो. याला ’जेस्टेशनल डायबिटीस’ म्हणतात. साधारणतः दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. 80 टक्के स्त्रियांमध्ये प्रसूतिपश्चात हा दोष निघून जातो. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे
इतर कारणे- काही व्यक्तींमध्ये विशिष्ट आजार, जंतुसंसर्ग, काही औषधांचा अतिरिक्त वापर, पोटावरील काही शस्त्रक्रिया यामुळे इन्सुलिनची निर्मिती घटते आणि मधुमेह होतो.
मधुमेह पूर्णपणे बरा होईल असे एकही ’प्रमाणित औषध’, कुठल्याही शाखेच्या वैद्यकीयशास्त्रामध्ये आज तरी उपलब्ध नाही. पण मधुमेह आटोक्यात ठेवला तर रुग्ण सर्वसामान्य आयुष्य उत्तमप्रकारे जगू शकतो.
मधुमेहाच्या उपचाराचे आहार, व्यायाम आणि औषधोपचार हे तीन मुख्य घटक आहेत. शस्त्रक्रिया हा विकल्प काही रुग्णांमध्ये आज वापरला जातो.
आहार- मधुमेहामध्ये आहारातून मिळणाऱया उष्मांकांवर नियंत्रण ठेवणे ही मुख्य मेख असते. प्रत्येकाच्या शरीरास लागणारे उष्मांक त्याचे वय, वजन आणि दैनंदिन जीवनात होणारे काम यावर अवलंबून असतात. साधारणतः बैठेकाम करणाऱया मध्यमवयीन व्यक्तीला 1400 ते 1500 आणि शक्तीचे काम करणाऱयाला 2000 ते 2500 कॅलरीज लागतात. हे उष्मांक फक्त एक किंवा दोन वेळच्या जेवणामधून घेण्याऐवजी 4-5 वेळा समप्रमाणात मिळणे योग्य असते. म्हणजे सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे आणि रात्रीचे भोजन यातून विभागून मिळाव्यात. आहारात घेण्यात येणारे उष्मांक दिवसभर विभागले गेले म्हणजे एका वेळी शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही. उदा. 1400 कॅलरीज आवश्यक असलेल्या व्यक्तीने प्रत्येक वेळेस 350 कॅलरीज घ्याव्यात.
या कॅलरीज ज्या आहारातून मिळतील त्यामध्ये आहार घटकांच्या प्रकाराप्रमाणे मिळणे गरजेचे असते. म्हणजे-
50-60 टक्के उष्मांक पिष्टमय पदार्थांमधून
10-20 टक्के उष्मांक प्रथिनांमधून
30 टक्के उष्मांक स्निग्ध पदार्थ किंवा मेदाम्लामधून यावेत.
50-60 टक्के उष्मांक पिष्टमय पदार्थांमधून
10-20 टक्के उष्मांक प्रथिनांमधून
30 टक्के उष्मांक स्निग्ध पदार्थ किंवा मेदाम्लामधून यावेत.
व्यायाम- शरीरातली अतिरिक्त ग्लुकोज व्यायामाच्या साह्याने खर्च होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण तर कमी होतेच, पण अतिरिक्त मेद कमी होऊन वजनसुद्धा आटोक्यात येते. म्हणून मधुमेही व्यक्तींनी नियमितपणे रोजच्या रोज व्यायाम करणे नितांत गरजेचे ठरते. मात्र हा व्यायाम एरोबिक स्वरूपाचा म्हणजे सपाटीवर भरभर चालणे, जॉगिंग, धावणे, पोहोणे किंवा सायकल चालवणे यापैकी असावा लागतो. मध्यमवयीन मधुमेही व्यक्तीने रोज किमान 30 मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम करणे योग्य ठरते.
औषधोपचार- टाइप-1च्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिनचा पूर्ण अभाव असल्यामुळे त्यांना इन्सुलिन घेण्याशिवाय पर्याय नसतो. आज विविध प्रकारची इन्सुलिन उपलब्ध आहेत. रुग्णाच्या मधुमेहातील साखरेच्या प्रमाणानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घ्यावी लागतात.
टाइप-2 च्या रुग्णांमध्ये विविध गटांची औषधे, विविध मार्गांनी शरीरावर परिणाम करून रक्तशर्करा कमी करतात. ती गोळ्यांच्या स्वरूपात, स्वतंत्र किंवा एकत्रितपणे दिली जातात.
नियमित व्यायाम आणि योग्य आहाराबरोबर मन शांत ठेवणे, त्यासाठी मानसिक तणाव कमी करणे यासाठी योग किंवा ध्यानधारणाही आवश्यक आहे.
खालील गोष्टींमुळे मधुमेहाची संभाव्यता वाढते.
– सरासरी वजनापेक्षा 20 टक्के किंवा अधिक वजन असणे (स्थूलत्व), पोट सुटणे, कंबर आणि पोटाभोवती चरबी वाढणे,
– जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे. आई, वडील, आजोबा-आजी, भाऊ-बहीण, काका-मामा यांच्यापैकी कोणालाही मधुमेह असल्यास. टाइप 1 आणि 2 या दोन्ही प्रकारांत हा वारसा महत्त्वाचा ठरतो
– स्थूल आणि बैठेकाम, शारीरिक हालचाल न करता सर्व कामे जागी बसून करणे
– जंक फूड खाणे
– पुरेसा व्यायाम नसणे
– गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोंहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया.
– 140/90 किंवा जास्त रक्तदाब
– एच डी एल कोलेस्टेरॉल 35 मि.ग्रा. / 100 मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी 250 मिग्रॅ /100 मिलि
– जी.टी.टी. (ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट) या रक्ततपासणीत रक्तात अतिरिक्त साखर दिसणे.
– काही विशिष्ट औषधांमुळे रक्तातील साखर वाढून मधुमेह होतो.