लेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल

137

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानी तटरक्षक दलास, किनारी सुरक्षेस जबाबदार करण्यात आलेले आहे. यात किनारी पोलीस दलांकडून गस्त घातली जाणारी क्षेत्रेही समाविष्ट आहेत. तटरक्षक दल आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा, समुद्री सुरक्षा, समुद्री सुरक्षितता, समुद्री पर्यावरण संरक्षण, शास्त्राrय सहाय्य, राष्ट्रीय संरक्षण अशा विविध कर्तव्ये करते. पूर्वसूचित आणि पूर्ण शस्त्रास्त्रसज्ज राहण्याकरता, सर्व उपलब्ध साधनांचा उपयोग करून प्रभावी निगराणी करणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने पश्चिम किनारपट्टीवरील खासगी बंदरांना त्यांच्या हाताखाली असलेल्या बंदरांची सुरक्षा वाढवण्याकरिता सांगितले आहे. अनेक खासगी बंदरांची सुरक्षा कमकुवत आहे. हिंदुस्थानी नौदल, कोस्ट गार्ड आणि महाराष्ट्र पोलीस यांनी केलेल्या पाहणीमध्ये हे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, महाराष्ट्रात असलेल्या 591 बंदरांच्या सुरक्षेचे अवलोकन करण्यात आले. त्यात असे दिसले की, रायगड जिह्यातील वीस बंदरे ही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. यांची सुरक्षा मजबुत करणे गरजेचे आहे.

‘26/11’च्या मुंबई हल्ल्यानंतर नियुक्त केलेल्या प्रधान कमिटीने सांगितले होते की, बंदरातून होणाऱया मच्छीमारी बोटींच्या हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय मच्छीमारांना बायोमेट्रिक आयडेंटिटी कार्डसुद्धा देणे गरजेचे आहे. असे दिसून आले की, अनेक ठिकाणी जिथे मच्छीमारी बोटी किनाऱयावर येतात तिथे अजूनसुद्धा होमगार्ड नियुक्त करण्यात आलेले नाही. म्हणजेच तिथून येणाऱया आणि जाणाऱया बोटींवर पुरेसे लक्ष नाही. केरळ आणि तामीळनाडू या किनारपट्टीवर श्रीलंकेमधून अफू, गांजा, चरसची तस्करी केली जात आहे. या तस्करीमुळे या दोन राज्यांमध्ये दहशतवाद वाढतो आहे. सध्या पाकिस्तानने आपले लक्ष दहशतवादी हल्ल्यावरून कमी करून अफू, गांजा, चरसचा दहशतवाद वाढविण्याकडे ठेवलेले आहे.

फेब्रुवारी 2009 पासून हिंदुस्थानी तटरक्षक दलास, किनारी सुरक्षेस जबाबदार करण्यात आलेले आहे. यात किनारी पोलीस दलांकडून गस्त घातली जाणारी क्षेत्रेही समाविष्ट आहेत. तटरक्षक दल आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा, समुद्री सुरक्षा, समुद्री सुरक्षितता, समुद्री पर्यावरण संरक्षण, शास्त्राrय सहाय्य, राष्ट्रीय संरक्षण अशा विविध कर्तव्ये करते. पूर्वसूचित आणि पूर्ण शस्त्रास्त्रसज्ज राहण्याकरता, सर्व उपलब्ध साधनांचा उपयोग करून प्रभावी निगराणी करणे आवश्यक आहे. निगराणी नियमित गस्त जमिनीवरून, समुद्रातून आणि हवाई फलाटांवरून केल्या जातात.

जहाज किंवा नौका थांबवून, अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार, अवैध मासेमारी, तस्करी, मादक पदार्थांचा व्यापार इत्यादी; रोखण्यासाठी त्यात प्रवेश करून शोध करण्याची कार्यवाही केली जाते.

किनारपट्टीवरील निगराणी ही उथळ पाण्यातील नौका व विमानांद्वारे केली जाते. उच्च गती हस्तक्षेपक नौका आणि हवाई आधारावर चालणाऱया वाहनांचाही (एअर कुशन वेहिकल्स, हॉवरक्राफ्ट), आतील भागातील खाडय़ांवरील, नदीमुखांतून गस्तीकरता उपयोग केला जातो.

भूमिका साकारण्यासाठी ऍडव्हान्स्ड ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स, ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स, पोल्युशन कंट्रोल व्हेसल, फास्ट पेट्रोल व्हेसल, इंटरसेप्टर बोटस्, जलदगती प्रतिसादांकरता आणि जलद रोख कार्यवाहीकरिता ही जहाजे उपयुक्त ठरतात.

2008 मध्ये तटरक्षक दलाकडे 61 नौका आणि सर्व प्रकारची मिळून 45 विमाने होती. डिसेंबर 2017 मध्ये 105 नौका आणि सर्व प्रकारची मिळून 64 विमाने आहेत. तटरक्षक दलाचे लक्ष्य 2020 पर्यंत 150 नौका आणि सर्व प्रकारची मिळून 100 विमाने बाळगण्याचे आहे. 85 नौका खासगी आणि सार्वजनिक नौका शिपयार्ड मार्फत बांधल्या जात आहेत. तटरक्षक दलापाशी हेलिकॉप्टरचा आणि सागरी निगराणी विमानांचा [Maritime Surveillance Aircrafts] एक ताफा आहे.

तटरक्षक दलाच्या जहाजांनी आणि विमानांनी या वर्षात 618 कोटी रुपयांचा अवैध माल पकडला. 18 परदेशी नावा आणि 160 खलाशी, हिंदुस्थानी प्रादेशिक पाण्यात शिरून अवैध मासेमारी करताना पकडले गेले. 4 नौका आणि 46 खलाशांना तस्करी करताना पकडले. 179 ‘शोध आणि सुटका’ (एस.ए.आर. – सर्च अँड रेस्क्यू) मोहिमा हाती घेतल्या गेलेल्या आहेत. महासागरात अडचणीत सापडलेल्या 438 माणसांची त्यात सुटका करण्यात आली. समुद्रातून 356 जणांचे जीव वाचविण्यात आलेले आहेत आणि 29 जणांना वैद्यकीय स्थलांतरण केले. 2018-19 मधील कामगिरी संकेत स्थाळावर उपलब्ध नाही. नौदल आणि सागरी पोलिसांची कामगिरी पण त्यांच्या संकेत स्थळावर दिलेली नाही. गुप्तवार्ता वितरण आणि समुद्री पोलीस, तटरक्षक दल व नौदल यांच्यातील समन्वयन आणखी सुधारले पाहिजे.

मासेमार नौकांच्या हालचालीची देखरेख करण्यासाठी; एकसारखी नोंद प्रणाली, नियंत्रण प्रणाली, मागकारक प्रणाली इत्यादी प्रणाली नियमीतपणे अद्ययावत केल्या गेल्या पाहिजेत. नौकांची ओळख पटवणे, नौकांचा माग काढणे, मासेमार नौकांची नोंदणी ही आणखी काही आव्हाने आहेत ज्यांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. लहान मासेमार नौका, धौस इत्यादींसह सर्वच निरनिराळ्या प्रकारच्या नौकांची नोंद झाली पाहिजे.

प्रत्येक बंदराच्या मार्गिका पद्धती, उतरण्याच्या जागा, नौका संचालन जागा आणि व्यक्तिगत मासेमाराला ओळखपत्र देण्याच्या पद्धती विकसित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक नौका माग काढणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा, ते ठराविक मार्गिकेतून येतील. ते काम अजून सुरू आहे. एकाच कार्डाद्वारे संबंधित व्यक्तीची सर्व माहिती मिळण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

कुठलीही अनोळखी नौका तपासण्याकरिता अधिक तंत्रज्ञान व गुप्तवार्ता यांची गरज आहे. आपल्याला धोक्याची पूर्वसूचना अथवा विश्वसनीय माहिती मिळालेली असेल तर आपण आपली निगराणी वाढवू शकतो, पाण्यातील गस्त वाढवू शकतो, नौदल आणि पोलीसही मदतीला येऊ शकतात. तटरक्षक दल, हिंदुस्थानचा समुद्र सुरक्षित आणि निर्भयित ठेवण्यास वचनबद्ध आहे. त्यांचे ब्रीदवाक्य आहे ‘वयंरक्षामः’ म्हणजे ‘आम्ही रक्षण करू.’ आशा करूया की ते त्यांची जबाबदारी अजून जास्त सक्षमरीत्या पार पाडतील.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या