
>> चंद्रसेन टिळेकर
‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयात बुवाबाजी, ज्योतिष, गृहकोप, वास्तुशास्त्र, भूत, अंगात येणे, नवस, अंगठीतले खडे, हिरे, रुद्राक्ष हे खरे तर नेहमीचे विषय आहेत, पण काही परंपरागत रूढी अशा असतात की, त्यावर बोलणे हे अंधश्रद्धेइतकेच महत्त्वाचे असते. कारण त्यांनीही समाजाचे तेवढेच नुकसान केलेले असते.
प्रचलित अनिष्ट रूढीच्या प्रवाहाविरुद्ध प्रबोधन करणे हे नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे असते. इतिहासात ज्या नामवंत समाजसुधारकांनी समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही जिवाच्या आकांताने प्रवाहाच्या विरुद्ध पोहावे लागले आहे आणि हे केवळ हिंदुस्थानसारख्या मागासलेल्या देशातच घडले आहे असे नाही, तर युरोपसारख्या प्रगत खंडातही घडले आहे, इतका हा प्रबोधनाचा मार्ग खडतर असतो. असे असतानाही युरोपात पाचशे वर्षांपूर्वी समाजसुधारक आणि शास्त्र्ाज्ञ यांनी बाजी पणाला लावल्यामुळे तिथे युरोपियन रेनेसान्स उदयास आला आणि सारा युरोपच काय, पण अख्खे विश्व त्यामुळे उजळून गेले. या युरोपियन रेनेसान्सलाच मराठीत ‘प्रबोधन युग’ असे म्हटले जाते. मानवाचे आयुष्य नुसते सुखाचेच केले नाही, तर मानवाचे आयुर्मानही वाढवले ते या प्रबोधन युगानेच यात काही शंका नाही.
आपल्याकडेही चार्वाक, बुद्ध, बसवेश्वर, चक्रधर स्वामी आणि अगदी अलीकडे आपल्या देशात बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि दक्षिणेत पेरियार इत्यादी थोर विचारवंतांनी आपापल्यापरीने या रेनेसान्सपासून प्रेरणा घेऊन प्रबोधनपर चळवळी सुरू केल्या. अर्थात या चळवळी या विशिष्ट अन्यायाविरुद्ध, विशेषतः जातीनिष्ठ विषमतेविरुद्ध होत्या. याउलट युरोपमधील प्रबोधन हे सर्वव्यापी होते.
चित्रकला, शिल्पकला, वास्तू इत्यादी विषयांत तर क्रांती झालीच, पण विविध विषयांत जे शोध, संशोधन झाले, त्यातली मेडिकल क्षेत्रातील क्रांती तर अभूतपूर्व होती आणि या क्रांतीमुळेच आपले आयुर्मान आता सहजगत्या 80-90 पर्यंत येऊन ठेपले आहे.
युरोपातील प्रबोधनी वातावरणामुळे त्या समाजातील शेकडो वर्षांच्या अंधश्रद्धा नष्ट व्हायला मोठी मदत झाली. असे सगळे असले तरी हा विषय आपल्या समाजापुढे मांडताना मोठी काळजी घ्यावी लागते. कारण हा विषय आपल्यासारख्या बहुसंख्य धार्मिक-भाविक, किंबहुना दैववादी असलेल्या देशात अत्यंत संवेदनशील होऊन बसतो. त्यामुळे जवळच्या आप्तेष्टांना शक्यतो टाळावेच, कारण ‘पिकते तिथे विकले जात नाही’ हे खरेच आहे. कोण कधी दुखावेल याचा नेम नाही. अंधश्रद्धेवर भाषण देत असता काही मंडळी, विशेषतः वयस्कर मंडळी उठून जातात. त्याचे हेच कारण आहे की, त्यांनी आजपर्यंत जपलेल्या त्यांच्या श्रद्धांना धक्का बसलेला असतो.
असाच काहीसा, पण थोडा वेगळा अनुभव मला एका महाविद्यालयात ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर बोलताना आला. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयात बुवाबाजी, ज्योतिष, गृहकोप, वास्तुशास्त्र्ा, भूत, अंगात येणे, नवस, अंगठीतले खडे, हिरे, रुद्राक्ष हे खरे तर नेहमीचे विषय आहेत, पण काही परंपरागत रूढी अशा असतात की, त्यावर बोलणे हे अंधश्रद्धेइतकेच महत्त्वाचे असते. कारण त्यांनीही समाजाचे तेवढेच नुकसान केलेले असते. उदा. निष्ठsने जात पाळणे, कटाक्षाने जातीतल्या जातीतच विवाह करणे, इतकंच काय पण जवळच्या नातेसंबंधात लग्न करणे इत्यादी.
सोलापूर शहरातील एका महाविद्यालयात बोलताना मी नेहमीचे अंधश्रद्धेचे विषय तर मांडलेच, पण समोर कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे नवी पिढी होती. तेव्हा त्यांनी तरी ‘जात’ या विषारी संकल्पनेला थारा देऊ नये असे कळकळीचे आवाहन केले. ते करताना अर्थातच मूळच्या चार वर्णांपासून चार हजारांच्या वर जाती निव्वळ समाजाच्या सोयीपोटी कशा झाल्या ते सांगावे लागलेच.
अनेकदा शाळा-कॉलेजातील विद्यार्थी विषय वैचारिक किंवा बोधपर असेल तर अधूनमधून चुळबुळ करीत असतात, पण इथे मात्र तसे काही दिसून येत नव्हते. त्यामुळे उत्साहाने जातीबाहेर विवाह करणे हे वैज्ञानिकदृष्टय़ा कसे हितकारक आहे सांगितले. काही शास्त्र्ााrय अहवालांचे दाखलेही दिले की, त्यात विवाहसंबंधात istant blood का वापरावे हे तपशीलवार दिले होते.
स्टेजवर त्या कॉलेजातील काही प्राध्यापकही होते आणि विशेष म्हणजे महाविद्यालयाचे उपप्राचार्यही होते, पण आश्चर्य म्हणजे शेवटी शेवटी व्याख्यान संपायच्या आतच कॉलेजचे उपप्राचार्य स्टेज सोडून गेल्याचे मला दिसले.
व्याख्यान संपल्यावर नेहमीप्रमाणे प्राचार्यांच्या केबिनमध्ये चहापाण्याचा कार्यक्रम व गप्पा रंगल्या. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषयचा असा आहे की, त्यावर बोलावे तेवढे थोडे. चहापानाच्या कार्यक्रमातही उपप्राचार्य सामील झाले नव्हते. शेवटी तिथून बाहेर पडताना कॉलेजचे एक प्राध्यापक मला सोडायला कॉलेजच्या गेटपर्यंत आले. मी त्यांना बाजूला घेऊन विचारले, ‘‘उपप्राचार्य असे एकदम का निघून गेले? माझ्या कल्पनेप्रमाणे तेच या विषयावर व्याख्यान व्हावे म्हणून अधिक प्रयत्नशील होते.’’
ते प्राध्यापक काही क्षण स्तब्ध झाले आणि नंतर काहीशा सस्मित चेहऱयाने म्हणाले, ‘‘अहो सर, तुम्ही तर त्यांच्या वर्मावरच बोट ठेवलेत.’’
‘‘ते कसे काय?’’ मी गोंधळून विचारले.
‘‘अहो, शक्य तो आंतरजातीय विवाह करावा हे सांगताना तुम्ही विवाहात जवळचा रक्तसंबंध कटाक्षाने टाळावा असे सांगितले.
‘‘हो, मग बरोबरच आहे की?’’
‘‘हो, पण पुढे तुम्ही असेही म्हणालात की, आपल्या समाजात मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा आहे, ती अत्यंत चुकीची आहे आणि गंमत म्हणजे सगळय़ा कॉलेजला माहीत आहे की, सरांनी आपल्या सख्ख्या मामाच्या मुलीशी लग्न केलंय. तुमच्या विधानानंतर मुलांच्या नजरा अर्थातच सरांकडे वळल्या असणार आणि ते सहन न झाल्याने ते निघून गेले.
मला वाटतं, मी आधी म्हटल्याप्रमाणे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय हाताळणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. ‘सोडलं तर पळतं आणि धरलं तर चावतं’ अशी गत होते.
n [email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)




























































