अनुशास्त्रज्ञांचे आयुर्वेदिक संशोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

अभ्यास आणि संशोधन या दोन गोष्टींच्या आधारे प्रत्येक विज्ञान साध्य होते. अणुविज्ञान ते आयुर्वेद हा प्रवास रोचक आणि रंजक. दोन्ही विज्ञानाचा वापर केवळ लोककल्याणार्थ.

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अणुशास्त्रज्ञ डॉ. अकल्पिता परांजपे. होमियोपॅथी आणि आयुर्वेदावरही त्यांनी संशोधन केले आहे. अनेक आजारी, गरजू रुग्णांना मोफत औषधे देतात. विशेष म्हणजे ही औषधं त्यांनी स्वतःच तयार केलेली असतात. नुकतेच त्यांनी कमरेची हाडे फॅक्चर झालेल्या वृद्ध गृहस्थांना केवळ औषधं आणि विश्रांती घ्यायला सांगून बरे केले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात तर त्यांनी कडुलिंबाची पाने, गुळवेल, ज्येष्ठमध, गूळ यापासून बनवलेल्या गोळ्या आणि काढा यांनी प्रतिकारशक्ती वाढते हे सिद्ध करून दाखवले आहे.

आयुर्वेदिक औषध लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी. डॉ. अकल्पिता परांजपे सांगतात की, लोक मला विचारतात, कोरोनासाठी तुमच्याकडे काय औषधं आहेत. तर मी कोरोनाकरिता औषध देत नाही. रोग्याला जुलाब होतायत, तोंडाला चव नाही, अंग दुखतंय, ताप येतोय त्यावर औषध देणार. प्रत्येकाला एकच औषध असं देता येत नाही, मात्र यासाठी आता आपण थेट लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. याकरिता जुलै महिन्यापासून फेसबुकवर पोस्ट लिहायला सुरुवात केली. यामध्ये व्हायरल इन्फेक्शन, कोरोना संसर्ग आणि पारंपरिक औषधांविषयी सतत माहिती देत राहिले. तेव्हा बरेच लोक संपर्का येऊ लागले.

कडुलिंब आणि हळद कितीही वापरले तरी त्याचा ऱहास होणार नाही. गावागावांत आढळतात. घरोघरी सापडते. यांचा उपयोग सगळ्यांना नक्कीच होईल. काही लोक स्वतःहून माझ्याबरोबर काम करायला आवडेल असं सांगून जोडली गेली. स्वयंसेवक म्हणून ते आज काम करत आहेत.

ताप चांगला आहे…
विषाणूंचा प्रादुर्भाव झाली की ते स्वतःची संख्या वाढवतात. याचवेळी आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती तापमान वाढवते. हे तापमान जर वाढू दिलं तर या विषाणूंचा किंवा कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव फार लवकर कमी होतो. कारण त्यांची संख्या किंवा प्रादुर्भाव नष्ट करण्याकरिता तापमान वाढलं की विषाणूंवरील प्रथिनांचं विघटन होतं त्यांना काहीच कार्य करता येत नाही. शिवाय या विषाणूंमुळे जागोजागी ज्या मृतपेशी पडलेल्या असतात त्यांचं विघटन करण्याकरिता आपल्याच शरीरातले जिवाणू जातात. त्यांना स्वच्छता कामगार म्हणूया. तेसुद्धा शरीर रक्ताद्वारे बाहेर फेपून देतं. या काळात हळद आणि कडुलिंब या पारंपरिक औषधांचा खूप उपयोग होतो,

कोरोना प्रतिबंधक वनौषधी
– अडुळसा 50ग्रॅम, तुळस 50 ग्रॅम, ज्येष्ठमध 25 ग्रॅम, पिंपळी 10 ग्रॅम, दालचिनी 5 ग्रॅम, वेलदोडा 5 ग्रॅम, रुईची फुले 5 ग्रॅम, काळेमिरे 5 ग्रॅम. या सर्वांची पूड करून अर्धा चमचा दोन कप पाण्यात घालून अर्ध्या कपापर्यंत आटवावे. सकाळ- संध्याकाळ चहासारखे घ्यावे. दमा – खोकला फुफ्फुसांचा आजार बरा होतो. पचनक्रिया सुधारते श्वसनाचा त्रास कमी होतो.

– तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध, चिमूटभर आल्याचा रस, दालचिनी चिमूटभर, मिरपूड मधात एकत्र करून चाटण करून ठेवावं. कोरडा खोकला आल्यावर थोडं थोडं चाटावं.
– रक्तस्त्राव, मुका मार आणि रक्ताच्या गाठींवर हळद उत्तम काम करते. शुद्धी क्रिया हळद करते. हळदीचा अर्प किंवा गोळ्या दररोज सकाळ, संध्याकाळ गरम पाण्यासोबत घ्या.
– कोरोना रुग्णांना इतर औषधांबरोबर कडुलिंबाची 40 पाने दिली तर रुग्ण बरा होईल.
– सकाळी – संध्याकाळी कडुलिंबाच्या पानांची गुळात केलेली गोळी चावून खा.
– कडुलिंब आणि हळदीचा अर्क कोरोनासंबंधीच्या तक्रारी बऱया करतो.

महत्त्वाचे…
– पहिल्या दिवसापासून ऑण्टिबायोटिक दिले जातात.
– ऑक्सिजन कमी झाला की व्हेंटिलेटर लावतात. यामुळे प्रेशराईज ऑक्सिजन दिला की आधीच अशक्त रक्तवाहिन्या आणखी अशक्त होतात. असं सगळं होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी पारंपरिक आयुर्वेदिक औषधं आणि काढे घ्या.