विमुक्ता – अभी और जहां बाकी है…

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

स्त्री म्हटलं की, चौकटी आल्याच. बंधन आले, त्यांच्याभोवती रेखलेल्या लक्ष्मणरेखा आल्या. या सर्व चौकटी, वर्तुळं आणि लक्ष्मणरेखा ओलांडल्याशिवाय ती स्वत:चे अस्तित्व प्रकर्षाने सिद्ध करू शकली नाही हा इतिहास आहे. हा इतिहास केवळ हिंदुस्थानचाच नव्हे, तर जगभराचा आहे. या सदरात आलेल्या अनेक स्त्रियांनी आपल्या जीवनाला उद्देश दिला, हा उद्देश सिद्ध करताना सामाजिक, पारंपरिक, सांस्कृतिक, कौटुंबिक चौकटी मोडाव्या लागल्या. हे तर झाले स्त्राrच्या बाहेरचे जग, अनेकदा स्त्राrला स्वतच्याच शारीरिक, मानसिक क्षमतांच्या पलीकडे जावे लागले. त्याशिवाय तिला स्वतला सिद्ध करता येत नाही. ‘विमुक्ता’ या शब्दाचा अर्थच मुळी सर्व बंधनांतून मुक्त असलेली स्त्री.

देशोदेशीच्या दखलपात्र सामर्थ्यवान स्त्रियांची नोंद घेण्यासाठी ‘विमुक्ता’ हे सदर सुरू झाले त्याला आता एक वर्ष होत आहे. ‘विमुक्ता’ हे व्यासपीठ तमाम महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरले, त्यातल्या त्यात या सदरामध्ये चर्चा केलेल्या अनेक महिला या त्या त्या देशाच्या प्रमुख पदावर कार्य करणाऱया होत्या. त्यामुळे मराठी राजकीय स्त्रियांसाठी एक नवा आशावाद ‘विमुक्ता’ या सदरातून निर्माण करण्याचा उद्देशही आहेच. जगभरातील स्त्रियांच्या राजकीय नेतृत्वांचा, कर्तबगारीचा धांडोळा यानिमित्त आपण घेत आहोत.

जगभरातील प्रभावशाली स्त्रियांचा अभ्यास करण्याची ही संधी दैनिक ‘सामना’ने उपलब्ध करून दिली. एक व्यासपीठ महिलांच्या हक्काचे निर्माण झाले याबद्दल दै. ‘सामना’चे आभार मानले पाहिजेत. तसे तर महिलांना आता कोणतेही क्षेत्र अछूत नाही, सर्व पदांवर स्त्रिया आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडत आहेत. संशोधन, साहित्य क्षेत्रांत स्त्रिया अग्रेसर आहेत. या महान स्त्रियांची छोटी जीवनी येऊ घातलेल्या स्वप्नाळू मुलींना नवी स्वप्नं दाखवते, जगण्याचे ध्येय आणि प्रेरणा निर्माण करते. डोळ्यांसमोर उदाहरण मोठे असेल तरच मुली/ महिला मोठी स्वप्नं बघायला धजावतील यात काही प्रत्यवाय नसावा.
मुळात ‘ती’ जगात कुठे काय करते हे समजून घ्यायला त्याचे राजकीय, सामाजिक विश्लेषण करायला मला आवडते आणि त्यातच ‘विमुक्ता’ची संधी म्हणजे आनंद दुप्पट वाढला. जगभरातल्या प्रेरणादायी स्त्रिया मला नेहमीच खुणावत आलेल्या आहेत. याच विषयाचं माझे एक पुस्तक ‘सामर्थ्यशाली स्त्रिया’देखील आहे. हे सदर म्हणजे या पुस्तकाचीच वाढीव आवृत्ती म्हणता येईल. जगाच्या कानाकोपऱयातून अशा सामर्थ्यशाली स्त्रिया ‘विमुक्ता’ सदरासाठी शोधल्या. एका ठरावीक शब्दबंधन असलेल्या सदरासाठी लिहिताना त्या त्या देशाची राजकीय, भौगोलिक माहिती, ऐतिहासिक धांडोळा, तेथील वातावरण अशा अनेक गोष्टी सहजच येतात. सातशे शब्दांच्या एका सदरासाठी एक संपूर्ण देश तेथील राजकीय वातावरणासकट उभा करता येतो हे विशेष. अशी एक अत्यंत वेगळीच संधी ‘विमुक्ता’च्या निमित्ताने मला मिळाली.

या सदरात आलेल्या अनेक स्त्रियांनी आपल्या जीवनाला उद्देश दिला, हा उद्देश सिद्ध करताना सामाजिक, पारंपरिक, सांस्कृतिक, कौटुंबिक चौकटी मोडाव्या लागल्या. हे तर झाले स्त्राrच्या बाहेरचे जग, अनेकदा स्त्राrला स्वतच्याच शारीरिक, मानसिक क्षमतांच्या पलीकडे जावे लागले. ‘विमुक्ता‘ या शब्दाचा अर्थच मुळी सर्व बंधनांतून मुक्त असलेली स्त्री.

एक वर्षाचा टप्पा पूर्ण करताना जगाची एक सफर सुरू झाली. पहिलाच लेख सामोआ देशाची महिला पंतप्रधान फियामे नाओमी मता‘अफा ही पहिलीच महिला पंतप्रधान आहे हा होता. एक वेगळा देश, एक वेगळी परंपरा, एक वेगळा इतिहास असलेल्या देशाची पंतप्रधान एक स्त्राr असावी ही गोष्ट खरं तर खूप प्रेरणादायी आहे. त्याशिवाय कोरोना लस शोधणारी सारा गिल्बर्ट, कॅटरिना जॅकोब्सडोटीर, यंदाची साहित्याचे नोबेल विजेती लुईस ग्लुक, जॉर्जिया मेलोनी, ािढस्टालिना जॉर्जिवा, स्योमारा कॅस्ट्रो सिरमियाँटो, झुझाना कापितोव्हा अशा कितीतरी अगदी अनोळखी, पण ज्यांची माहिती असलीच पाहिजे अशा स्त्रिया या सदरात आल्या. हिंदुस्थानी सामाजिक कार्यकर्त्या इला भट, अर्थमंत्री निर्मला सीतारामनपासून ते जगाच्या एका कोपऱयात असलेल्या देश, समूहापासून अनेक प्रेरणादायी स्त्रिया या सदरात आपण वाचल्या. अमेरिकन वित्तमंत्री जेनेट येलेन, न्यूझीलँडची पंतप्रधान जासिंदा आर्डन, तैवानची पहिली पंतप्रधान स्त्राr साई इंग वेन. ही स्त्राr तर अत्यंत कर्तबगार आहे. चीनसारख्या बलाढय़ देशाला आव्हान देणारी साई इंग वेन ही खरोखरच धाडसी म्हणायला पाहिजे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच 2016 साली तिने तैवान या देशाचे वेगळे अस्तित्व जाहीर केले. केवढे धाडस? घर कामगार असलेली कृष्णवर्णीय स्त्राr कोलंबिया देशाची उपराष्ट्रपती ठरते. तिचा जीवन प्रवास अत्यंत विलक्षण होता. अशा अनेक महिलांचा अभ्यास करताना हे सदर याही वर्षी असेच सुरू राहील.

जेव्हा जगातल्या स्त्रियांचा अभ्यास करतो तेव्हा आपण अंतर्मुखही होत असतो. शासनामध्ये महत्त्वाच्या मंत्रीपदावर निर्मला सीतारामनसारखी कर्तृत्ववान स्त्री असणे आणि देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणेच एखादी स्त्री असणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हिंदुस्थानने दोन महिला राष्ट्रपती, पहिल्या माजी राष्ट्रपती सन्माननीय प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या सध्याच्या आदिवासी प्रतिनिधित्व करणाऱ्या द्रौपदी मुर्मू… मुर्मुजींची माहिती या सदरात आलेली आपल्याला आठवत असेलच. त्यानिमित्त महिलांना, त्यातल्या त्यात राजकारणातील महिलांना स्वतच्या अस्तित्वाची, कर्तृत्वाची नव्याने ओळख होणे आवश्यक आहे. स्वतला सिद्ध करत असताना अनेकदा पुरुष सहकाऱयांसोबत स्पर्धा करणे गरजेचे ठरते, मुत्सद्देगिरी ही स्त्रियांच्या अंगी आहेच. मुख्य म्हणजे जगभरातील सामर्थ्यवान स्त्रियांचा उल्लेख होत असताना कोणतेही पद स्त्राrसाठी अप्राप्य नाही हे समजून वाटचाल केली पाहिजे. गीता गोपीनाथनसारख्या हिंदुस्थानी कर्तृत्ववतींनी देशाच्या बाहेर आपले स्थान निर्माण केले. अशी संधी देशात मिळो. स्त्राrला तिच्या योग्यतेचे स्थान देताना लिंगभेदाचे सर्व अडथळे गळून पडोत. हिंदुस्थान उदार मतांचा पुरोगामी देश आहे, या देशातच स्त्रियांना त्यांच्या हक्काचे स्थान मिळो या आशांसह या वर्षीही ‘विमुक्ता’ प्रेरणादायी महिलांची उदाहरणे देत राहील.
[email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)