3X3 महत्त्वाचे!

>> डॉ. सतीश नाईक (मधुमेहतज्ञ)

कोरोनाच्या लढाईतील सर्वात महत्त्वाचे शस्त्र म्हणजे मास्क. आज फॅशनच्या नावाखाली अनेक रंगीबिरंगी मास्क परिधान केले जात असले तरी N 95 हा मास्क वापरणे सर्वात योग्य. आपल्या चेहऱयावरील 9 इंचाचा हा चौकोन सर्वात महत्त्वाचा असतो.

कोरोना विषाणू श्वसनामार्फत शरीरात प्रवेश करतो. श्वास आतमध्ये घेताना आपल्याला दोनच जागा असतात. नाक आणि दुसरे असते तोंड. त्यामुळे हा विषाणू केवळ याच मार्गाने शरीरात प्रवेश करू शकतो. आतापर्यंत असं दिसून आलं आहे की, बाहेरून खाणं मागवलं किंवा बाहेरून काही आणलंय तर आधी हात स्वच्छ धुतो. आपण जे काही करतो त्यामागे एकच उद्दिष्ट असतं. हाताला लागलेला विषाणू नाकापर्यंत पोहोचू नये, पण कधी कधी अनवधानाने कुठे स्पर्श झाला, कुठे तोंडाला खाज आली आणि तोच हात नाकाला लागला तर हातामार्फत विषाणू शरीरात प्रवेश घेऊ शकतो. तसे होऊ नये यासाठी सर्वात आधी नाकाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला हवेत.

पहिली गोष्ट म्हणजे हा विषाणू श्वसन यंत्रणेतल्या दोनच गोष्टींना चिकटतो. ज्याला चिकटतो त्याला आपण रिसेप्टर म्हणतो. म्हणजे पेशींच्या वर आलेली प्रोटिनची टोकं असतात, ज्याला रिसेप्टर म्हणतात. हा विषाणू दोन प्रकारच्या पेशींना चिकटतो. एक म्हणजे ज्याच्यातून आपण वास घेतो ते म्हणजे नाक. ज्याच्यामार्फत गंध घेण्याचे आणि त्याची ओळख पटवण्याचे काम होते. त्या नाकातून वास घेणाऱया चेतातंतूंना तो चिकटतो आणि दुसरा एसीईटू नावाचा रिसेप्टर आहे. म्हणून लोकांना वास येत नाही. दुसरं असतं बऱ्याच लोकांची तोंडाची चव पण जाते. या दोन गोष्टी त्या विषाणूमार्फत होतात. एसीईटू हा विषाणू चिकटल्यावर तो त्या पेशीमध्ये आतमध्ये इंजेक्ट करतो. मग एकदा हे विषाणू आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये शिरले की, त्या पेशीपेंद्रामध्ये जातात आणि पेशीपेंद्रात गेल्यावर आपल्यासारखे असंख्य विषाणू तयार करतात. ज्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव होतो, त्या वेळेला तीन-चार दिवसांत पहिली गोष्ट होते ती म्हणजे वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला वास येत नाही, चव लागत नाही. हे युनिक कोरोनाचे लक्षण आहे. एरवी आपल्याला नाक बंद असल्यावर वास येत नाही, पण नाक मोकळं असताना वास न येणं किंवा अचानक वास येणं बंद होणं हे केवळ कोरोनामध्ये दिसतं. ज्या वेळेला हे विषाणू फुप्फुसांच्या छोटय़ा भागात शिरतात, त्यावेळी एसीईटू रिसेप्टर फुप्फुसांमध्ये भरपूर असतात. तिथल्या पेशींमध्ये शिरले की, त्या पेशींमधून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते आणि माणसांना दम लागायला लागतो. एकदा तो विषाणू पेशींमध्ये शिरला की, मग इन्फेक्शन तयार करतो आणि त्यामुळे घसा दुखणं, ताप येणं, सर्दी होणं असं सगळं सुरू होतं. हे भरपूर प्रमाणात विषाणू तयार झाले की, विषाणूंना विरोध करायला शरीरातली रोगप्रतिकारशक्ती सक्रिय होते. ती सक्रिय झाली की, पुढचा बवाल सुरू होतो. सक्रिय झाल्यावर त्या पेशींना मारायला म्हणून सायटोकाईन तयार करतं. सायटोकाईन ही एक प्रकारची प्रोटिनची रसायनं असतात आणि ही रसायनं मोठय़ा प्रमाणात तयार झाली की, सायटोकाईन स्टॉर्म तयार करतात. अचानक आलेलं एक प्रकारचं त्या रसायनांचं वादळ. हे रसायनांचं वादळ. मग तिथे प्रश्न सुरू होतो. वेगवेगळ्या पेशींवर ते परिणाम करायला लागतं. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे अवयव बाधित होतात, त्याच्यामध्ये पहिलं असतं हृदय, दुसरं असतं मुत्रपिंड आणि तिसरं असतं मेंदू. या तीन ठिकाणांवर कमीअधिक परिणाम झालेला दिसतो. सगळ्यात जास्त हृदयावर घाला होतो आणि नंतर पुढचे प्रश्न सुरू होतात. रक्तपुरवठा कमी होतो, श्वासाचा त्रास होतो, मग त्याला आपण आयसीयूत दाखल करतो. हे सगळं सुरू होतं हा त्यातील नेमका सिक्वेन्स आहे. आपण काय करतो, स्टिरॉईड देतो आणि सायटोकाईन स्टॉर्म जे आहे ते सांभाळायचा प्रयत्न करतो, आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. सायटोकाईन स्टॉर्म आवाक्यात आलं की, माणसांना त्या विषाणूचा तेवढा धोका राहत नाही. बाहेर होतो आणि काही काळानंतर शरीर रोगप्रतिकारशक्ती बनवायला सुरुवात करते.

आतापर्यंत अशी कुठेही केस दिसलेली नाही की, बाहेरून काही पार्सल मागवलं, त्याचं अन्न खाल्लं आणि त्यांना कोरोना झाला. याच्यामध्ये जे आपल्याला काटेरी दिसतं ते असं तेलाचं कव्हर असतं. त्याला आमच्या भाषेत लिपिड कव्हर असे म्हणतात. लिपिड म्हणजे मेद. निरनिराळ्या पेशींमध्ये त्यांचे प्रमाण कमी जास्त असून शरीराच्या विविध कार्यासाठी मेद आवश्यक असतात. हे मेद आपल्या नाकाच्या आतल्या बाजूला चिकटतं आणि साबणाने मेद धुतलं जातं. म्हणून त्याच कारणासाठी तज्ञ सांगतात, तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुवा.

मास्क वापरताना
शेवटी आपण तिन्ही गोष्टी करताना काय करतो की, सोशल डिस्टन्सिंग, नाकावर असणारे मास्क आपण फक्त नऊ चौरस इंच एवढी जागा ही बंद करतो. गेट्स घट्ट बंद करतोय म्हणजे त्याला जागा आत शिरायला मिळणार नाही. हा जर नीट मास्क वापरला तर बऱ्याचदा मास्कचे इलॅस्टिक लूज होते आणि ते लूज झाल्यावर मास्क खाली येतो. त्यामुळे एन95 मास्क वापरावा. त्याच्यावर एक पट्टी असते, त्यात प्रत्येकाचे नाक वेगवेगळ्या आकाराचे असल्याने ती पट्टी नाकावर नीट दाबून बसवा. ती वरून कुठूनही विषाणू आत शिरायची शक्यता शून्य असते. जेव्हा दुसऱया व्यक्तीच्या समोर आहात तेव्हा त्याच्यापासून दूरच रहा, पण कमीत कमी एक मीटर असलं पाहिजे. एवढं सांभाळलं तर फारशी समस्या येणार नाही. मास्क काढण्याचेही टेक्निक असते. शेवटी काय असतं की, मास्क काढताना बाहेरच्या बाजूला विषाणू असतील तर ते पुन्हा हाताला लागतील म्हणून इलॅस्टिक, दोरीच्या बाजूनं मास्क काढावे असं म्हटलं जातं. हात स्वच्छ धुऊन मास्कला हात लावा. घरी आल्यावर मास्क इकडे तिकडे न टाकता तो कोणाचाही हात लागणार नाही असा एका बाजूला ठेवावा. डिस्पोज करताना प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकावा.

आपली प्रतिक्रिया द्या