
>> मलिका अमरशेख
माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाच्या अनेक भावनांपैकी एक म्हणजे भय. विज्ञानालाही न उलगडलेलं असं हे भयाचं कोडं आपल्या मनात ठाण मांडून बसतं ते कायमचंच. मानवी आयुष्यात नकरसाला फार मोठं स्थान आहे. यातल्याच भयाचा सध्या जगाच्या रंगमंचावर प्रवेश झाला आहे. हा भयानक रस सर्वत्र लाव्हय़ाप्रमाणे पाझरू लागलाय.
जगाच्या रंगभूमीवर सध्या भयाचा प्रवेश झालेला आहे…! मानवी आयुष्यात नवरसाला फार मोठं स्थान आहे. वीर, करुण, रौद्र, बीभत्स, शृंगार, हास्य, शांत, अद्भुत आणि भयानक. यातला हा भयानक रस सर्वत्र पाझरू लागलाय लाह्याप्रमाणे…
जगण्याचं भय – मृत्यूचं भय… औषधोपचार न मिळण्याचं भय… राजसत्ता ते नोकरी, शिक्षण, ऍडमिशन ते अन्न न मिळण्याचं भय इतकी भयग्रस्त स्थिती सर्व जगभरात कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या वाटय़ाला आलेली… सत्तांतराची इतकी दहशत की, गाडीच्या टपावर बसावं तसे विमानावर बसलेले लोक पाहिले की, मृत्यू समोर दिसला की, बुद्धी भ्रमिष्ट होते…नपेक्षा विमानावर किंवा पंखाच्या आत लपून बसणे हे ठार वेडा भ्रमिष्टच करू धजेल. खूप लहानपणी मी मांजर पाळलेली – एक छोटा उंदीर भिंतीवरच्या एका कोपऱयात उंचावर वायर किंवा पाइपवर तुरतुरत चाललेला…मनीनं पाहिलं. मात्र तिनं चपळाईनं खुर्चीवरून टेबलावर, टेबलावरून कपाटावर न् कपाटावरून थेट पवित्रा घेतला… उंदराला पळायला जागा होती, पण तो थिजून तिथेच त्याचे इवले लुकलुक डोळे साक्षात मृत्यूला बघत होते. दुसऱयाच क्षणी तिने झेप घेऊन त्याला तोंडात घेऊन उडय़ा मारत बाहेर पळाली.
पण हल्ली मात्र यूटय़ूब वगैरेवर मी भलतंच बघतेय. एकाच वाटीत उंदीर मांजर खातात काय… कधी तो उंदीर चक्क मांजरीच्या मागे न् मांजर पळतेय. अरे, आपापल्या भूमिका विसरलेत की काय?
काही जण मात्र हे भय पण विकतात न् काही जण ते विकतही घेतात. जगभरात बहुसंख्य लोक भुतांचे पिक्चर बनवतात न् ते बघणारे चक्क पैसे मोजून घाबरण्यासाठी फिल्म बघतात.
प्रसिद्ध लेखक वि. स. वाळिंबेंचं एक वाक्य आहे, ‘जगात शुभंकराकडे जसं आकर्षण आहे तसेच भयंकराकडे पण त्याचं असं वेगळं आकर्षण आहे.’ आपल्याला महाभयंकर वाटणारे स्टंट जगभरात काही मॅड लोक करतात. उंच इमारतीवरून, विमानातून उडी घेत पायाला दोर बांधून खाली झेपावणं – भयानक लाटांवरून खेळणं… सुप्त ज्वालामुखीच्या तोंडावर बसून खाली पाहणं… वाघ, सिंह, अस्वल यांच्या जवळ जाऊन कुत्रामांजरीगत त्यांना जवळ घेणं…
कदाचित काही लोकांची काळिजं वाघाची, तर काहींची सशाची असावीत किंवा तारुण्यात तुम्ही कशालाच भित नाही, तर म्हातारपणी तुम्हाला कुणी भित नाही. बरं, हास्यरस फक्त माणसाकडेच आहे, तर भयरस हा सगळय़ाच सजीवांना! सशापासून अगदी लाजाळूच्या झाडापर्यंत. स्पर्श होतात म्हणून काही ती लाजत नाहीत, तर ती घाबरून स्वसंरक्षणार्थ मिटवली जातात.
भय हे घातक हत्यार आहे. भय दाखवून समाजाला धर्मसत्ता, राजसत्ता यापुढे नमायला लावतात. मेल्यानंतरच्या नरकाचं भय दाखवून जिवंत असतानाच तुम्हाला भयानं अर्धमेलं करतात. भय दाखवून स्त्र्ायांवर बलात्कार केले जातात. एकीकडे कल्पना चावलासारखी स्त्र्ााr निर्भयपणे अवकाशात झेप घेऊन अंतराळात पाऊल रोवते, तर दुसरीकडे शहर-गावातली स्त्र्ााr थरथरत ‘सातच्या आत घरात’ पोहोचते. घर, चूल, बिछाना ते उंबऱयाबाहेर सतत भयाचा सामना करणारी स्त्र्ााr, तर पुरुषही यातून सुटलेले नाहीत. घराबाहेर बॉस हा मानसिक, वैचारिक, भावनिक बलात्कारच करीत असतात, पण ते हा बलात्कार मानत नाहीत. मनाविरुद्ध पोटासाठी न पटणाऱया गोष्टी दुसऱयाला करायला भाग पाडणे हा बलात्कारच असतो. मग तो विवाह असो, धर्मांतर असो वा सत्तांतर असो.
भयाला पुढे अनेक मुलंबाळं होतात. मूल झालं नाही तरी भय, मूल झालं तरी भय. नोकरी लागली तर ती कधीही जाण्याचं भय, तर नोकरी नसली तर जगायचं कसं याचं भय. जोपर्यंत जीव आहे तोवर भयही जिवंत आहे.
आपल्याकडे तर कोकणात झाडाझाडांवर भयाची भुतं बसलेली असतात. तिकडल्या भुतांना स्मशानात राहायला फारसं आवडत नसावं. कुठल्या तरी पडक्या वाडय़ात किंवा कुठल्या तरी पिंपळावर-झाडांवर राहायला त्यांना आवडतं. पहा, म्हणजे भुतांनाही भीती असावी. नपेक्षा तेही दिवसाढवळय़ा आपल्यासारखेच वावरत असते ना!
भुतांचे चित्रपट, भयपट वा मालिका पाहताना एवढंच कळलं की, उलट आपल्यापेक्षा ती (भुतं) जास्त संवेदनाक्षम असतात. त्यांना राग येतो. ती उजवं-डावं करू शकतात. आपली-परकी त्यांना कळतात. नॉर्मल चित्रपटात किंवा मालिकांमधील पात्रं बघा कशी ठोकळेबाज असतात. नायक म्हणजे सद्गुणांचा पुतळा, तर नायिका म्हणजे सर्वांगसुंदर सोशीक, त्यागबिग करणारी, वेळोवेळी रडणारी आणि खलनायक, नायिका, चरित्र नायिका म्हणजे कोळशाची खाणच, पण भुतांचं तसं नाही. ती त्यांच्या स्वभावासारखीच कधी चांगली, कधी वाईट वागतात. म्हणजे माणसांसारखीच! उलट माणसं कधी कधी भुतापेक्षा किंवा त्यांचा राजा सैतानापेक्षा वाईट वागतात.
माणसानं किमान नीट वागावं यासाठी माणसानंच किती प्रयत्न केलेत. देव निर्माण केले, धर्म निर्माण केले, जाती निर्माण केल्या, भुतांना जन्माला घातलं, समाजमान्यता ही एक नवी पिलावळ जन्माला घातली, वेगवेगळय़ा भयांना जन्माला घातलं, दहशतवादाला जन्माला घातलं, अण्वस्त्र्ां निर्माण केली की, त्या भयानं तरी शेजारच्या राष्ट्रानं आपल्याशी नीट वागावं, पण नाही. त्याच भयाचा आधार घेत माणूस निसर्गाला न् एकदुसऱयाला खाऊ लागलाय.
माणसाचा अधाशीपणा वाढू लागलाय. असं म्हणतात, इतकंही भय कुणाला दाखवू नये की, शेवटी मृत्यूचंसुद्धा भय वाटणार नाही. मग ती चालती बोलती भुतंच होतात.
मग भुतांना भय दाखवायला मांत्रिक बोलवा. मग त्या मांत्रिकाला पण कायद्याचं भय असतंच की, म्हणजे एका भयावर कुरघोडी करणारं दुसरं भय… अशी फौजच भयाची.
भयाच्या भुताची पावलं नेहमी उलटी असतात. आपल्याच आतल्या गुहेत फिरणारी. भयाचं भूत फक्त चिकित्सक बुद्धीपुढेच नमतं घेतं, पण दहशतवादाची भुतं तर तीही मानत नाहीत.
त्याला वश करणारा कुणी नवा मांत्रिक येवो एवढंच गाऱहाणं आपण घालू शकतो.





























































