
>> मनमोहन रोगे
वेद, उपनिषदआणि प्राचीन भारतीय विज्ञान अशा आगळ्या विषयात संशोधन करणारे डॉ. प. वि. वर्तक यांचे नाव संशोधनक्षेत्रात आदराने घेतले जाते. जवळ जवळ 55-60 वर्षे हिंदूंचे ग्रंथ, पुराणे, उपनिषदे आणि वेदांचा अभ्यास करून हे हिंदूंचे ग्रंथ विज्ञानावर कसे आधारलेले आहेत हे जगासमोर सिद्ध करत आगळा सिद्धांत त्यांनी मांडला. खगोलीय ग्रहांच्या स्थितीवरून प्राचीन ग्रंथांच्या काळनिश्चितीबाबत त्यांनी अनुमान केले. अशी विलक्षण प्रतिभा लाभलेल्या डॉ. प. वि. वर्तक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अजोड संशोधनकार्याचा वेध घेणारा हा लेख.
हिंदूंच्या क्षात्रतेजाचा वयाच्या 82 वर्षांनंतर प्रचंड अभ्यास करून ‘हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा हिंदूंच्या देदीप्यमान विजयी परंपरांचा, हिंदूंच्या जेतेपणाचा सत्य इतिहास सांगणारा ग्रंथ लिहून हिंदूंचा इतिहास दास्याचा, पराभवाचा असे निखालस खोटे ‘खरे’ आहे असे भासवण्याचा प्रयत्न करणाऱया विद्वानांना जसे स्वा. सावरकरांनी चोख उत्तर दिले आणि हिंदूंचा गौरवशाली इतिहास जगासमोर मांडला तसेच किंबहुना, त्यापेक्षाही अधिक अभ्यास स्वतः वैद्यकीय डॉक्टर, निष्णात सर्जन असणाऱया पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तक यांनी जवळ जवळ 55-60 वर्षे हिंदूंचे ग्रंथ, पुराणे, उपनिषदे आणि वेदांचा अभ्यास करून हे हिंदूंचे ग्रंथ विज्ञानावर कसे आधारलेले आहेत, नव्हे त्यात विज्ञान कसे ठासून भरले आहे हे अनेक ग्रंथ लिहून जगासमोर सिद्ध केले. रामायण, महाभारत या काल्पनिक कथा आहेत असे मानणाऱयांना आणि तो घडलेला इतिहास आहे, पण त्याच्या काळावरून वैचारिक गोंधळ घालणाऱयांना त्या त्या ग्रंथातील ग्रहस्थितीच्या वर्णनावरून खूप कठीण खगोल गणिते करून रामायण, महाभारताचा काळ त्यांनी निश्चित केला. इतकेच नव्हे तर रामायण, महाभारतातील अनेक घटनांचे दिनांक त्यांनी निश्चित केले आणि महत्त्वाचे म्हणजे विज्ञानातील अत्याधुनिक संगणकांच्या सहाय्याने अभ्यास केला असता डॉक्टरांनी दिलेला काळ आणि तारखा या खऱया असल्याचे सिद्ध झाले.
अवकाशयाने मंगळावर जाण्यापूर्वी आपल्या आध्यात्मिक तपोबळावर ध्यानातून काही मिनिटांत एकदा नव्हे तर दोन वेळा 35 कोटी मैल दूर असलेल्या मंगळ ग्रहावर लिंगदेहाने भ्रमण करून तेथील वातावरणात दिसलेल्या अनेक गोष्टींचे वर्णन त्यांनी करून ठेवले व पुढे मंगळयानाने पाठवलेल्या माहितीशी त्यातील 20 मुद्दे तंतोतंत जुळले. पुढे अकरा वर्षांनी 21वा मुद्दाही जुळला. डॉ. वर्तक हे दिव्य दृष्टीचे ज्ञान प्राप्त झालेले भारतवर्षातील आधुनिक ऋषी होय. त्यांनी मंगळ ग्रहभ्रमणाप्रमाणेच गुरू, शनी इत्यादी ग्रहांवरही भ्रमण केले होते. या दोन्ही ग्रहांवरील त्यांनी दिलेली माहिती खरी ठरलीच, पण आश्चर्य म्हणजे आपल्या जवळच्या एका सूर्यमालेतील एका ग्रहावर जाण्याचाही पराक्रम त्यांनी केला. त्या ग्रहावर डॉक्टरांना मनुष्य दिसल्याचे त्यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे. असे हे जगावेगळे साक्षात्कारी दिव्य पुरुष आपले अवतारकार्य संपवून आताच दि. 29 मार्च 2019 रोजी पंचत्वात विलीन झाले. त्यांचे अनेक विज्ञाननिष्ठ निबंध प्रसिद्ध आहेत. त्यातील ‘शिवलिंग – एक विज्ञान प्रतीक’ हा निबंध प्रचंड गाजला. शिवलिंगाबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. लिंग म्हणजे खूण. शिवलिंगाबाबतची शास्त्राrय माहिती जी डॉ. वर्तकांनी विस्ताराने व शास्त्राrय पद्धतीने सांगितली आहे तशी अन्य कुणी सांगितलेली नाही. आताच्या काळात काल्पनिक वाटतील, अविश्वसनीय वाटतील अशा हिंदू ग्रंथांमधील कथा या कशा खऱया आहेत हे त्यांनी शास्त्राrय पुरावे देऊन सिद्ध केले आहे. तसेच या ग्रंथांमध्ये नंतर घुसवलेल्या काही लोकप्रिय कथा कशा खोटय़ा आहेत, मूळ ग्रंथात त्यांचा कसा कुठेही उल्लेख नाही हेही दाखवून दिले आहे. आपले पूर्वज, ऋषीमुनी किती विज्ञाननिष्ठ होते, हिंदुस्थान विज्ञानात किती प्रगत होता, जगाला आज लागलेले शोध हे आपल्या पूर्वजांना ज्ञात होते, त्यांचा हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, इतकेच नव्हे तर पूर्वीचे काही शोध आजच्या सायन्सला अजूनही अवगत नाहीत याची शेकडो उदाहरणे देऊन डॉ. वर्तकांनी दाखवून दिले आहे. क्लोनिंगची निर्मिती ऋभूंनी केली होती. त्यांनी यंत्रमानव व यांत्रिक राक्षसही बनविले होते. इ. स. पूर्व 6000 या काळी उपनिषदांमध्ये गुरुत्वाकर्षणाची माहिती होती, इतकेच नव्हे तर गुरुत्वाकर्षणाविना देह अंतराळात कुठेही फेकला गेला असता असे त्यांनी लिहून ठेवले आहे. गुरुत्वाकर्षणाचा देहावरील परिणाम न्यूटनला माहीत नव्हता. टेस्ट टय़ूब बेबी महाभारतात आढळतात. 1897 साली परमाणूचा शोध लागला, पण त्यापूर्वी 4000 वर्षे भागवताने परमाणूचे ज्ञान लिहून ठेवले आहे. अंतराळ प्रवासाने आयुष्य वाढते हा आइन्स्टाईनचा सिद्धांत व्यासांना ज्ञात होता. वीज अगस्तींना ज्ञात होती. पाश्चात्त्यांपूर्वी शेकडो वर्षे शल्यचिकित्सेचे ज्ञान महर्षी सुश्रुतांनी जगाला दिले. आपल्या जुन्या ग्रंथांतील अशा शेकडो गोष्टी डॉ. वर्तकांनी आपल्या साहित्यात नोंदलेल्या आहेत. त्यांचे ‘स्वयंभू’, ‘वास्तव रामायण’, ‘पुनर्जन्म’, ‘गीता – विज्ञाननिष्ठ निरूपण’, ‘उपनिषदे – विज्ञाननिष्ठ निरूपण भाग 1 व 2’ , ‘वैदिक विज्ञान व वेदकाळ निर्णय’ इत्यादी व इतर ग्रंथ वाचल्यास त्यांच्या अभ्यासाची व ज्ञानाची कल्पना येते. त्यांच्या अगाध ज्ञानास महासागराचीच उपमा देता येईल. डॉक्टरांनी 1975 मध्ये योग आणि अध्यात्म या विषयांवर संशोधन करण्यासाठी ‘अध्यात्म संशोधन मंडळा’ची स्थापना केली व प्राचीन हिंदुस्थानी विज्ञान शोधण्याकरिता 1976 मध्ये ‘वेद विज्ञान मंडळ’ स्थापन केले. त्या माध्यमातून डॉक्टरांनी भरपूर संशोधन केले. पाताळ म्हणजे आजची ‘अमेरिका’ हे डॉक्टर वर्तकांनीच आपल्या अभ्यासातून, संशोधनातून जाणले व सर्वप्रथम सांगितले. डॉ. वर्तक जवळपास 150 विषयांवर व्याख्यान देत. देश–विदेशात त्यांची पाच सहस्रांपेक्षा जास्त व्याख्याने झाली. सामान्य जनांना न कळणाऱया भाषेतील हिंदूंचे ग्रंथ डॉक्टरांनी वाचून, अभ्यासून त्यातील विज्ञानाने आणि सत्याने ते भारावून गेले. या ग्रथांमधील ज्ञान सामान्यांना मिळावयास हवे, तो त्यांचा हक्क आहे आणि ज्ञानी मनुष्यांतूनच हिंदूंचा आणि हिंदुस्थानचा अभ्युदय होणार हे ओळखून त्यांनी त्या त्या ग्रंथांत आपल्या अनुभवाची, ज्ञानाची भर घालून ते ज्ञान सामान्यांच्या पदरात टाकले आहे.
‘आपले वेद व पुराणे’ यातील हिंदूंचा इतिहास आपण अभ्यास करून शोधला पाहिजे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न डॉ. वर्तक यांनी साकारलं आहे. जगात फक्त हिंदू धर्मालाच 25 सहस्र वर्षांचा इतिहास आहे. बाकीच्यांचा इतिहास हा फक्त 2 सहस्र वर्षांचा. या प्राचीन, वैभवशाली इतिहासाचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. या ग्रंथांचा अभ्यास न करताच इतरांचे ऐकून हिंदू धर्माला दोष देणे, निंदा करणे योग्य नव्हे. फक्त हिंदू धर्मातच काळानुरूप बदल झालेत. हिंदू धर्म हा कुणा एका व्यक्तीने स्थापन केला नाही, तो सनातन आहे. हिंदू धर्मात जगाच्या सुखाचा विचार केला जातो तसा तो इतर धर्मात केला जात नाही. म्हणून हिंदू धर्म हा वैश्विक म्हणावयास हरकत नाही. पुण्य आणि पैसा या दोहोंमध्ये पुण्यच जास्त महत्त्वाचे असते. कारण ते मेल्यावर उपयोगी पडते. मेल्यावर पैशांचा काहीच संबंध उरत नाही. पुण्य गाठीशी असेल तर बाकीचे ‘प’ ही प्राप्त होतात. पदवी, पराक्रम, पैसा, पत्नी, पुत्र, पुस्तक, प्रसिद्धी, पुरुषार्थ इत्यादी. असे सांगून डॉ. वर्तक म्हणतात, हिंदु धर्मात कर्मफळाचे महत्त्व सांगितले आहे. चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ मिळते. त्यामुळेच पाप-पुण्यातील फरक ओळखून सत्कर्मच करायला हवे. असे ज्ञान देणारे ब्रह्मर्षी आता होणे नाही.
























































