
>> मृणाल घनकुटे
पावसाने नुकतीच जोरदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे उन्हाचा तडाखा काहीसा सौम्य झाला आहे. हे सगळं असलं तरी इतर ऋतूंप्रमाणेच पावसाळय़ात त्वचेसंदर्भातील काही समस्या उद्भवू शकतात. त्वचा तेलकट होऊ लागते. अशा वेळी तेलकट त्वचा असलेल्यांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी, याबद्दल त्वचा स्किन क्लिनिकच्या स्किन स्पेशालिस्ट डॉ. हेमांगी आंग्रे यांनी दिलेल्या टीप्स…
नेमकी कारणे काय?
पावसाळय़ात उष्मा आणि सूर्यप्रकाशापासून दिलासा मिळत असला तरी या ऋतूत वातावरणातील आर्द्रता वाढते. त्यामुळे त्वचा तेलकट होऊ शकते. यामध्ये प्रमुख कारणे अशी की, तणाव, हार्मोन्समध्ये बदल, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, स्ट्रीट फूडचा मारा अशी प्रमुख कारणे असू शकतात. तेलकट त्वचेची काळजी न घेतल्याने मुरूम, पुटकुळय़ा होतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला आर्द्रतेचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वचेवर घाम येणे हे सामान्य असते. ज्यामुळे पिंपल्सची समस्यादेखील वाढते. त्वचेवर वारंवार व्हाईट हेड्स दिसणं, पिंपल्स येणं , चेहरा तेलकट दिसून तो काळवंडलेला वाटणं अशा अनेक तक्रारी ऑईली स्किनबाबत असतात.
– टोनरचा वापर करा
स्क्रबिंग केल्यानंतर टोनरचा वापर करा. चेहरा धुतला की तो काही काळ फ्रेश दिसतो, पण नंतर पुन्हा त्यावर तेल जमायला सुरुवात होते. चेहऱयाला असं अतिरिक्त तेल सुटू नये यासाठी दररोज टोनर लावणं गरजेचं आहे. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते.
– सनस्क्रीन वापरा
पावसाळय़ातही तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रिन अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक जणी त्वचा आणखीनच चिकट, ऑईली दिसते म्हणून सनस्क्रिन लावणं टाळतात. पण यामुळे त्वचेवर पिंगमेंटेशन येणं, त्वचा काळी पडणं असा त्रास होतो. त्यामुळे सनस्क्रिन लावा.
– मेकअप करणे टाळा
पावसाळय़ात पाणी आणि ओलाव्यामुळे चेहरा चिपचिप होऊ शकतो. त्यातच तुम्ही जर मेकअप वापरला तर तो त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन ती बंद करू शकतात. छिद्र बंद झाल्यास त्वचेमधून जास्त तेल निघतं आणि चेहऱयावर मुरमे आणि पह्ड येऊ शकतात, तसेच डागही पडू शकतात. म्हणून मेकअप करणे टाळा.
फेसमास्कचा वापर करा
पावसाळय़ात त्वचेमधलं तेल पंट्रोल करण्यासाठी आठवडय़ातून एकदा चेहऱयाला फेसमास्क लावावा. मुलतानी माती किंवा चंदनाचा फेसपॅक ऑईली त्वचेसाठी सगळय़ात चांगला आहे. बाजारातून इतर दुसरे फेसपॅक घेणार असाल तर त्यामध्ये Kaolin and eBntonite clay असणारे फेसमास्क घेण्यास प्राधान्य द्या. कारण असे फेसमास्क त्वचेतलं अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करतात.
स्क्रबिंग करा
पावसाळय़ात तापमानात वारंवार बदल होत असल्याने चेहरा तेलकट होऊ शकतो. स्क्रबिंग किंवा एक्सपहलिएशन ही अशी प्रक्रिया आहे, जी मृत त्वचा आणि त्वचेवरील अतिरिक्त तेलाचा थर काढून टाकते. स्क्रबिंग केल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल काही प्रमाणात निघून जाईलच, पण त्यासोबतच त्यावरची धूळदेखील स्वच्छ होईल आणि यामुळे व्हाईटहेड्सचा त्रासही कमी होईल. फक्त स्क्रबिंग करताना त्वचा खूप जोर लावून रगडू नका. हळूवार स्क्रब करा. स्क्रबिंग अतिशय गरजेचं आहे. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त सेबम आणि डेड स्किन निघून जाते. त्यामुळे पिंपल्स, अॅक्ने, व्हाईट आणि ब्लॅक हेड्सचे प्रमाण कमी होते.
























































