साय-फाय – सायबर हल्ल्यांचा वाढता धोका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

‘सायबर हल्ले’ हे जगभरातील सर्व देशांसाठी एक मोठी डोकेदुखी बनत चालले आहेत. आभासी दुनियेत होणारे हे हल्ले आधी फक्त एखाद्या संस्थेच्या अथवा देशाच्या संगणक प्रणालीपुरते मर्यादित असायचे. ई-मेल हॅक करणे, डेटा चोरणे अशा प्रकारात हे हल्ले मोडत असत. मात्र तंत्रज्ञान बदलत गेले तसे हे हल्लेदेखील अधिक व्यापक बनत गेले. आभासी जगातील हे हल्ले आता प्रत्यक्षात नुकसान पोहोचवू लागले आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी इराणच्या एका स्टील उत्पादक पंपनीत लागलेली भीषण आग ही आपल्याच सायबर हल्ल्यामुळे लागल्याचा दावा एका हॅकर ग्रुपने केल्यावर थेट मानवी जीवनापाशी हे हल्ले येऊन धडकल्याची चर्चा जगभर जोरात सुरू झाली आहे.

‘प्रिडेटरी स्पॅरो’ (Predatory Sparrow) नावाच्या एका हॅकर ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. या स्टील उत्पादक पंपनीवर झालेल्या तीन सायबर हल्ल्यांपैकी एकामागे आपला हात असल्याचा त्यांचा दावा आहे आणि याच हल्ल्यामुळे आग लागली असे हा ग्रुप सांगतो. यासंदर्भातला एक व्हिडीओदेखील इंटरनेटवर टाकण्यात आला असून त्यामध्ये एका मोठय़ा यंत्रातून आगीचे लोट उसळत असून वितळलेले लोखंडदेखील दिसत आहे. काही लोक सैरावैरा पळताना, तर काही लोक या आगीवर पाणी मारताना दिसत आहेत. दुसऱया सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडीओमध्ये काही कामगार अग्निशमन दलाला पह्न करून मदतीसाठी बोलावताना दिसत आहेत. या हल्ल्याबरोबरच या हॅकर ग्रुपने पंपनीचा गीगाबाईट डेटा शेअर करत आपण या पंपनीचे गोपनीय ई-मेलदेखील चोरल्याचा दावा केला आहे.

ही पंपनी आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या अधीन आहे. मात्र निर्बंध असूनही या पंपनीने उत्पादन न थांबवल्याने आपण हा हल्ला केल्याचा दावा ‘प्रिडेटरी स्पॅरो’ने केला आहे. मात्र हा हल्ला करताना आपण निष्पाप लोकांच्या जीविताला कुठलाही धोका होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचेदेखील ‘प्रिडेटरी स्पॅरो’ने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. ‘प्रिडेटरी स्पॅरो’च्या या दाव्यानंतर सायबर सुरक्षा विश्वातील अनेक तज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. हा हल्ला केल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची ‘प्रिडेटरी स्पॅरो’ला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कारखान्याचा मजला रिकामा असताना हा हल्ला केला गेला. मात्र हा हल्ला पाहून ‘प्रिडेटरी स्पॅरो’कडे इतकी काळजी घेणारी आणि चोख अंमलबजावणी करणारी सुसज्ज टीम खरंच आहे का? असा प्रश्न हे सायबर तज्ञ करत आहेत. इतक्या कुशलतेने आणि योजनाबद्ध प्रकारे करण्यात आलेला हा हल्ला पाहता हे एखाद्या सामान्य हॅकर ग्रुपचे काम नसून त्यांच्या मागे एखाद्या देशाची यंत्रणा पाठबळ देत असावी अशी शंकादेखील काही सायबर तज्ञ व्यक्त करत आहेत.

आगीची ही घटना आणि तिचे स्वरूप अनेक मोठय़ा देशांच्या चिंतेत भर घालणारे आहे. भविष्यात कशा प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात याची ही एक झलक म्हणावी लागेल. अर्थात इराणवर यापूर्वीदेखील अशाच प्रकारचा सायबर हल्ला करण्यात आला होता. 2010 साली इराणच्या युरेनियम संवर्धन पेंद्रावर ‘Stuxnet’द्वारे हल्ला करण्यात आला होता (Stuxnet हा एक प्रकारचा संगणक व्हायरस आहे. त्याची नोंद पहिल्यांदा 2010 मध्येच झाली). हा हल्ला इतका प्रभावी होता की, त्याच्यामुळे या पेंद्रातील ‘सेंट्रिफ्यूज’ नष्ट झाला होता. या हल्ल्यामुळे इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रचंड मोठे नुकसान झाले. अर्थात, या हल्ल्याची तेव्हा फारशी चर्चा जगात झाली नाही.

पाणीपुरवठय़ात घातक रसायन मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेचा ताबा मिळवणे, सायबर हल्ल्याद्वारे वाहतुकीचे पूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करणे असे काही प्रयत्नदेखील यापूर्वी झालेले आहेत. अशा परिस्थितीत जगातील सर्वच देशांची अधिक सजग होण्याची आणि यंत्रणा अधिक सुरक्षित व मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे वारंवार समोर येत आहे. या घटनेनंतर हिंदुस्थान यातून काय बोध घेतो हे बघणे महत्त्वाचे!

– [email protected]