
>> प्रवीण धोपट
बदल हा सृष्टीचा नियम आहे. बदलाला सामोरे जाण्याची तयारी आणि ताकद ठेवायला हवी. ट्रेडिंगमधील बदलत्या तंत्राविषयी जाणून घेऊ या.
अनिश्चित, अनपेक्षित आणि धोकादायक असा स्वभाव असलेले मार्पेट गेल्या पावणेदोनशे वर्षांपासून सुरू आहे याचा अर्थ त्यात टिकून राहण्याची क्षमता आहे. मार्पेटमधल्या व्यवहाराची रीत एक असली तरी त्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असते. काही वर्षांपूर्वी मार्पेटमध्ये काम करणाऱया माणसांना आजचे मार्पेट 100 टक्के बदललेले दिसते. त्या बदलांना कवेत घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये नाही तो आपोआपच मार्पेटमधून बाहेर फेकला जाईल यात शंका नाही.
काळ बदलतो तसे तंत्रज्ञान बदलते. तंत्रज्ञान नुसते बदलत नाही, तर ते अधिक प्रगत होत जाते. प्रगत होणारे तंत्रज्ञान काही माणसांचा व्यवहार सोपा करते, तर काही माणसांचे जगणेच कठीण करते. या बदलाला सामोरे जाण्याची तयार ठेवली पाहिजे. ट्रेंड बदलतो, प्रॉडक्ट बदलतात, व्यवहार बदलतात. या बदलांचा परिणाम मार्पेटवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दिसतो. या परिणामांशी जुळवून घेण्याची तयारी दाखवावी लागते.
1. अल्गोरिदमिक ट्रेडिंग – आज मार्पेटच्या व्यवहारामध्ये ‘अल्गोरिदमिक ट्रेडिंग’ हे तंत्रज्ञान आले आहे आणि अल्पावधीतच त्याने सर्व क्षेत्र व्यापले आहे. मार्पेट एका ठरावीक पॅटर्नमध्ये चालत असते. त्या पॅटर्ननुसार अनेक इंडिकेटर तयार झाले आहेत. ब्रोकर आपल्या क्लायंटला इंडिकेटर मोफत वापरायला देतात. क्लायंट आपल्या अकलेनुसार इंडिकेटरचा वापर करतात. त्यात कधी फायदा होतो तर नफा. कारण प्रत्येक माणसाचा वेग आणि समज वेगवेगळी असते. इथेच अल्गोरिदम तंत्रज्ञान कामाला येते. ज्याचा वापर सर्वांसाठी सारखा असतो. इंडिकेटरचा वापर करून अल्गोरिदमिक ट्रेडिंग सिस्टीम डेटा अनॅलिसीस करते, चार्टवर तयार झालेले पॅटर्न आयडेंटिफाय करते आणि स्वतः ट्रेड करते.
अल्गोरिदमिक ट्रेडिंगची गती वेगवान असते. अल्गोरिदमिक ट्रेडिंग भावनाशून्य असते. ट्रेडिंग करताना, ट्रेडचे निर्णय घेताना व्यक्ती ज्या चुका करील त्या चुका अल्गोरिदमिक ट्रेडिंगमध्ये संभवत नाहीत. कारण अल्गोरिदमिक ट्रेडिंग एक प्रकारे मशीन ट्रेडिंग असते. संधी येऊनही व्यक्ती ज्या ठिकाणी विचार करीत राहील तिथे मशीन ट्रेड एक्झिक्यूट करून मोकळी होते.
2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स- दुसरे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जाते. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे ट्रेडिंग सुरू झाले आहे. इथे ट्रेडिंगसाठी माणसांची गरज लागत नाही. डेटा अनॅलिसीस करण्यापासून मार्पेटचा ट्रेंड ओळखणे, ट्रेडिंगच्या संधी ओळखणे, रिस्क मॅनेज करणे, निर्णय घेणे आणि व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्ण करते.
3. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी-
‘ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ हा शब्द आता अधूनमधून कानावर पडायला लागला आहे. क्रिप्टो करन्सीमधले व्यवहार ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित असतात. हल्ली बँकांचे व्यवहारसुद्धा ब्लॉकचेन
टेक्नॉलॉजीचा भाग बनत आहेत. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिसेंट्रलाईज प्लॅटफॉर्म असतो. इथे कुणी एक व्यक्ती किंवा सिस्टीम निर्णय घेत नाही. येणारा काळ हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा आहे. याचा वापर ट्रेडिंगमध्ये व्हायला वेळ लागणार नाही.
(लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट
प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)


























































