
>> संजय करकरे
राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील 8 तर विदर्भातील 3 अशा 11 नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच राज्य वन्यजीव मंडळाद्वारे घेण्यात आला. ‘जॉयनिंग द डॉट’ या शब्दाचा खरा अर्थ आता या संवर्धन क्षेत्राला मान्यता देऊन पूर्ण झाला असेच म्हणावे लागेल.
राज्य वन्यजीव मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 11 संवर्धन राखीव क्षेत्रे व एक अभयारण्य जाहीर केले गेले. राज्यातील वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी उचललेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयाबद्दल ठाकरे सरकारचे अभिनंदन करावे लागेल. सोबतच याचा पाठपुरावा करणाऱया मंडळाच्या सदस्यांचे व वन्यजीव विभागाचेही कौतुक करावे लागेल. 1986 ला पश्चिम घाट बचाव मोहिमेच्या वेळी महाबळेश्वर ते गोव्यातील रामनाथीपर्यंत जंगलातून चालत गेलो होतो. यावेळी सह्याद्रीतील एकसंध जंगलाचे महत्त्व समजले होते. घाटातून चालत असताना त्यावेळी सह्याद्रीच्या या जंगलातील किती समस्या आहेत याची कल्पना आली होती. यानंतरही नंतरच्या काळात या जंगलातून कितीतरी वेळा पायपीट केली. जोपर्यंत या चिंचोळय़ा पट्टय़ातील जंगलांना जोडले जात नाही तोपर्यंत त्याचे महत्त्व टिपून राहणार नाही हे समजले होते. ‘जॉयनिंग द डॉट’ या शब्दाचा खरा अर्थ आता या संवर्धन क्षेत्राला मान्यता देऊन पूर्ण झाला असेच म्हणावे लागेल. पश्चिम घाट बचाव मोहिमेला आता खऱया अर्थाने इतक्या प्रदीर्घ वर्षांनंतर यश आले असे वाटते. सह्याद्रीचा विचार केला तर खळखळ वाहणाऱया नद्या, धडकी भरवणाऱया पर्वतरांगा, हिरवेपंच जंगल, त्यातील थक्क करणारी समृद्ध जैवविविधता नजरेसमोर येते. या वैशिष्टय़पूर्ण जैवविविधतेमुळेच युनेस्कोने जगातील ‘हॉट स्पॉट’मध्ये या पर्वतीय शृंखलेचा समावेश केला आहे.
या पश्चिम घाटातील जैवविविधतेवर, तेथील प्रदेशनिष्ठ प्रजातीवर नजर टाकली तर या ‘हॉटस्पॉट’चे महत्त्व अधोरेखित होते. सात हजारांहून अधिक सपुष्प वनस्पतींनी हे जंगल नटलेले आहे. आंबोलीच्या घाटमाथ्यावर गेल्यावर तेथील उभयचर व सरीसृपांची विविधता तर अचंबित करून जाते.
सव्वाशेहून अधिक सस्तन प्राणी, 525 हून अधिक पक्ष्यांच्या जाती, कीटक, गोडय़ा पाण्यातील माशांची दुनिया हे सर्व खूप अनोखे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येथील जंगलातून वाहणाऱया नद्यांचे जाळे बघितले तर त्याची महती अधिक स्पष्ट होते. अरबी समुद्रावरून येणाऱया खाऱया वाऱयांना थोपवणारी सह्याद्रीची ही पर्वतरांग मग धो धो पाणी बरसवून पूर्व व पश्चिम दिशेने वाहणाऱया नद्यांना सुरुवात करून देते. येथे कोल्हापूर जिह्याचे उदाहरण देता येईल. येथून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून 23 नद्या उगम पावून पूर्वेकडील सपाट भूभागाकडे वाहत जातात. दक्षिण महाराष्ट्रातील सिंचनाला व एपूणच पृषी अर्थव्यवस्थेला त्यामुळे कशी चालना मिळते हे येथे बघायला मिळते. लक्षावधी लोकांचे जीवन समृद्ध करणाऱया या नद्यांचे महत्त्व वादातीत आहे. ‘जंगल नदी की माँ है’ येथे पदोपदी अनुभवायला मिळते. त्यामुळे सह्याद्रीतील जंगल सलग राहण्यासाठी, प्राण्यांचे भ्रमणमार्ग सुरक्षित राखण्यासाठी जाहीर झालेले संवर्धन प्रकल्प मोलाचे ठरणारे आहेत.
महाराष्ट्रात सध्या 7 संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. नाशिक वनवृत्तातील भोरगड हे 2008 मध्ये जाहीर झालेले राज्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve) होते. गेल्या जूनमध्ये सह्याद्रीतील तिलारी (सिंधुदुर्ग) हे क्षेत्र सातवे संवर्धन क्षेत्र होय. कोलामारका (गडचिरोली), मुक्ताई (जळगाव), ममदापूर (नाशिक), तोरणमाळ (नंदुरबार), अंजनेरी (नाशिक) ही अन्य संवर्धन क्षेत्रे असून या संपूर्ण वनक्षेत्राचे एपूण क्षेत्रफळ 490 चौ. किमी. होते.
महाराष्ट्रात सध्या 6 राष्ट्रीय उद्याने व 49 वन्यजीव अभयारण्ये आहेत. आता नव्याने जाहीर झालेले कन्हाळगाव अभयारण्य धरून संरक्षित क्षेत्राची संख्या 56 वर गेली आहे, जे अत्यंत प्रशंसनीय आहे. जेवढी संरक्षित क्षेत्रे अधिक तेवढी त्याला कायद्याची कवचपुंडले प्राप्त होतात अशी आजची स्थिती आहे. नव्याने जाहीर झालेल्या सह्याद्रीतील संवर्धन राखीव क्षेत्रात सर्वात उत्तरेकडील महाबळेश्वरच्या कुशीतील जोर-जांभळी (सातारा) आहे. महाबळेश्वर-पाचगणी पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला (ESZ) जोडलेले हे क्षेत्र अतिशय संवेदनशील आहे. या क्षेत्रात दुर्मिळ बिबट मांजर बघायला मिळते. यावरून या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होते. हे क्षेत्र 65 चौ. किमीचे असून सभोवताली 17 गावे वसली आहेत. या क्षेत्राला लागून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र असून जे सातारा, सांगली व कोल्हापूर जिह्याच्या सीमेपर्यंत येते. यानंतरचे असलेले कोल्हापूर जिह्यातील विशाळगड संवर्धन क्षेत्र आता जाहीर झाले आहे. हे क्षेत्र 92 चौ. किमी. असून याच्या सभोवताली 22 गावे येतात. सह्याद्री व्याघ्रप्रकल्प व त्याच्या दक्षिणेकडे नव्याने अस्तित्वात आलेले पन्हाळगड संवर्धन राखीव क्षेत्र विशाळगड संवर्धन क्षेत्राला जोडण्यात आल्याने जैविकदृष्टय़ा हे क्षेत्र महत्त्वाचे ठरले आहे.
नव्याने जाहीर झालेल्या अन्य संवर्धन राखीव क्षेत्रात गगनबावडा (105 चौ.किमी.), छत्रपती शाहूमहाराज आजरा भुदरगड (246 चौ.किमी.) दोडामार्ग आंबोली (56 चौ.किमी.), चंदगड (225 चौ.किमी.) संवर्धन क्षेत्रांचा समावेश आहे. ही सर्व क्षेत्रे सह्याद्रीतील जंगलांना जोडत गोव्याच्या सीमेवरील तिलारी संवर्धन क्षेत्राला जोडण्यात आली आहेत. साधारणपणे 860 हून अधिक चौ.किमीचा सह्याद्रीतील मोठा पट्टा या संवर्धन साखळय़ांद्वारे जोडण्यात आला आहे, ज्यामुळे जोर-जांभळी ते तिलारीपर्यंतचे जंगल एकसंध करण्याचा प्रयत्न झाला आहे. वाघापासून हत्तीपर्यंत तर गव्यापासून रानपुत्र्यांपर्यंतच्या जंगलाची सलगता यामुळे संवर्धित झाली आहे. यापूर्वीही हे क्षेत्र सलग होते, पण त्याला आता संरक्षित क्षेत्राच्या कायद्याच्या चौकटीत आणले गेल्याने त्याचे संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने होणे शक्य होणार आहे.
दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे, जाहीर झालेली संवर्धन क्षेत्रे केवळ कागदावर राहू नयेत. पूर्वी जाहीर झालेल्या सहा संवर्धन क्षेत्रांना पुरेसा निधी नसल्याने त्यांची स्थिती समाधानकारक नाही. यावेळच्या मंडळाच्या बैठकीत कॅम्पातून 20 कोटी रुपये देण्याचे वनमंत्र्यांनी जाहीर केले आहे. निधीचा योग्य पुरवठा राहिला तरच या संवर्धन क्षेत्रांना चांगले दिवस येऊ शकतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या क्षेत्रांना स्थानिक ग्रामस्थांचा पाठिंबा असणे. स्थानिकांना या क्षेत्राचे महत्त्व समजावून सांगताना, प्रत्यक्ष मिळणाऱया फायद्यांची बेरीज सांगणेही महत्त्वाचे आहे. हे झाले तरच वन्यजीव संघर्षाला उत्तर देता येऊ शकेल. तसेच खाणी, महामार्गाचे जाळे, नव्याने होणारी धरणे यांसारखी जंगलांना हानी करणारी विकासकामे रोखणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्राव्यतिरिक्त सातारा जिह्यातील मायणी, नागपूर जिह्यातील मोगरकसा, मुनिया व अमरावती जिह्यातील महेंद्री संवर्धन क्षेत्रांनाही मान्यता देण्यात आली आहे. काही क्षेत्रांना निसर्गप्रेमींनी विरोध दर्शवून या क्षेत्राला अभयारण्याच्या कक्षेत घेण्याची विनंती केली आहे. आश्रयस्थानांचे व्यवस्थापन, संरक्षण उपाययोजनांचे बळकटीकरण, उपजीविका कार्यक्रम, जल-चारा संवर्धनासारखी कामे या संवर्धन क्षेत्रात झाली पाहिजेत. ही सर्व कामे तातडीने झाली तरच या संवर्धन क्षेत्राच्या जाहीर होण्याला महत्त्व आहे.
(लेखक बीएनएचएस संस्थेच्या नागपूर केंद्राचे सहाय्यक संचालक आहेत.)





























































