शिरीषायन – वादळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

माझ्या ज्योतिषी मित्रानं मला बजावलं, ‘लवकरच तुझ्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे.’

मोठं वादळ? अरे, म्हणजे सासूबाई येणार असतील. त्या आणि त्यांची गोजिरवाणी लेक मिळून चक्रीवादळ निर्माण करतात. घराची वाट लावून टाकतात. दोघी एकाच वेळी बोलत असतात; ऐकतं कोण? घर आणि मी. घराची वाताहत दिसते व माझी दिसत नाही एवढंच.

मी कानात घालायचे कापसाचे बोळे आणून ठेवले आणि कुठे बघायचे ते न उमगून टेलिफोनकडे विषण्णपणे बघत बसलो, तोच नवीन ‘मेसेज’ आला. हेच ते वादळ असेल हे माझ्या ध्यानीमनी नव्हतं. डी.पी.वर फाकडू फोटो असलेल्या माताभगिनीनं ‘व्हॉटस्ऍप’वर मला ‘हाय’ केलं होतं. हे रोजचंच होतं. अशा ‘हाय’ मी वरच्या खिशात ठेवून फिरतो. पण या अनोळखी रमणीची ‘हाय’ मला लागेल हे मला कसं कळावं? रिवाजाप्रमाणे मी तिला कॉमन प्रश्न विचारला,- ‘तुम्ही कोण?’ कळायला नको का? वाचिका आहे की कोण आहे हे कळल्याशिवाय पुढील संवाद कसा शक्य होता? ती मात्र पुनः पुन्हा माझ्यावर केवळ ‘हाय’चे शर सोडत होती.

काही केल्या ती तिचं नाव व ओळख सांगायला राजी नाही हे लक्षात येताच मी ‘व्हॉटस्ऍप’वरून तिला ढकलून देण्याच्या बेतात होतो. तोच तिचा नवा ‘मेसेज’ आला- ‘आय लव्ह यू, डियर!’

आँ? आँ? आँ? उभ्या आयुष्यात हे विधान कोणीही, कधीही, कुठल्याही भाषेत माझ्यापाशी केलेलं नाही. आमच्या सुलताननं कदाचित केलं असतं, पण त्याला भाषेचा फार मोठा प्रॉब्लेम होता. तो चतुष्पाद प्राणी कुत्रा होता. काही तथाकथित माणसांना बोलता येत असून, बोलण्याला निमित्त असून बोलावंसं वाटलं नाही, ही गोष्ट विचारात घेण्यासारखी होती. बरं, ओळखपाळख नसताना मी हिचा ‘डियर’ कधी व कसा झालो, का झालो, हे तर आहेच. वयाच्या एWशीव्या वर्षी प्रेम हे असं अनोळखी व्यक्तीकडून, दुडक्या चालीनं माझ्या मनमंदिरात हुतूतू खेळेल असं मला का वाटावं?

पण या (डी.पी.वरून) देखण्या, तरुण, उफाडय़ाच्या महिलेला माझ्यात काय भावलं असेल? पोटाच्या वाढत्या घेरामुळे वाढत असलेलं माझं वजन तिच्या डोळय़ांत भरलं असेल का? माझ्या पंचाहत्तरीच्या समारंभात माझी ‘पुस्तक-तुला’ करण्यात आली होती, पण मी बसलेलं पारडंच जड ठरत होतं. शेवटी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले उद्धवजी ठाकरे म्हणाले, ‘त्यांच्या शर्टाचं पेन काढा. सगळं वजन त्या पेनचंच आहे.’ या रमणीला माझं पेन हवं असेल का? तिला माझी नक्कल करून लिहायचं असेल का? अनेक जण करतात. ते माझ्या पेनसाठीही थांबत नाहीत.

तिनं ‘एंजॉय मी’ अशीही मला दयाळू ‘ऑफर’ दिली. मी या वयात आइक्रीम ‘एंजॉय’ करू शकत नाही, हे तिला कुठं सांगत बसू?

अखेर तिनं मला एक व्हिडीओ पाठवला. त्यात ती कॅमेऱयाच्या (म्हणजेच पर्यायाने माझ्या) जवळ येऊन जिभल्या चाटत होती. बछडय़ाशी खेळताना वाघीण चाटते तशी, खिमा पॅटिस पाहून आपण चाटतो तशी, पैसे खायची संधी दिसल्यावर सरकारी अधिकारी चाटतो तशी. त्या दिवशी ‘जिभल्या’ हा शब्द माझ्या आयुष्यातून बाद झाला. कारण यापुढे जिभल्या म्हटल्यावर माझ्या नजरेसमोर तेच महिलेचं अक्राळविक्राळ नरमांसभक्षक रूप येत राहील.
माझी कढी पातळ झाली होती. मी एका मित्राकडे सल्ला मागितला. वाचा आमच्यातला संवाद-

मित्र- आपल्या वकील मित्राला विचार.
मी- नको. तोच तिच्या नादी लागेल.
मित्र- बायकोला विचार.
मी- नको. ती म्हणेल कायमचे तिच्याकडे जा व मला सुखात जगू द्या.
मित्र – मुलांना विचार.

मी- नको. ते म्हणतील प्रॉपर्टीला आणखी एक वाटेकरीण आली वाटतं.

मी सरळ उठलो व माहिम पोलीस स्टेशनला गेलो. मी त्यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रार दिली.
‘तुम्ही एक करा.’ अधिकारी जरबेच्या आवाजात म्हणाला.

‘करू?’ मी किंचाळलो. लग्नाच्या दिवशी नवऱया मुलाला विष प्यायला सांगितलं तरी तो एवढा किंचाळला नसता.
‘घरी असल्यासारखं ओरडू नका.’ अधिकारी ओरडला.

‘बायकोच्या घरात तोंडही उघडायला परवानगी नसते.’ मी भिजल्या मांजरीसारखा म्हणालो. महिला पोलीस हसल्या. वर्दी नसतानाही दहशत कशी ठेवावी हे त्या शिकत होत्या.

‘काही झालं तरी त्या बाईला पैसे देऊ नका.’

‘छे हो!’ मी म्हणालो, ‘सोसायटीचे चार्जेसदेखील मी नाइलाज झाल्याशिवाय देत नाही. शेंगदाण्याच्या पुडीचे पैसेही चुकवतो.’
घरी आल्यावर रात्री मी नवीन शर्ट घातला, पांढरे केस वळणदारपणे विंचरले व फोनकडे बघत बसलो. फोन व बायकोचं तोंड वाजायचे थांबत नाहीत म्हणे…

– [email protected]