
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
कॉन्टय़ुरिंग म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱयातील विशिष्ट आकारांना कमी-जास्त करताना तुमच्या चेहऱयाला पाहिजे तसा लुक देणे. मेकअप करताना फाऊंडेशन कॉन्टुर आणि हायलाइट या तीन स्टेप्स तुमच्या मेकअपमध्ये सुंदरता आणतात.
फाऊंडेशन हा मेकअपचा बेस तयार करतो, तर कॉन्टुर हे चेहऱयाला एका विशिष्ट आकारात बसविण्याचे काम करते व हायलाइटर तुमच्या चेहऱयातील उंच जागांना हायलाइट करण्याचे काम करत. कॉन्टय़ुरिंगमध्ये तुम्ही चेहऱयामध्ये एक डेफिनेशन ऍड करू शकता. चेहऱ्याचा जो पार्ट हायलाइट करायचा आहे व जो पार्ट बारीक करायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तो दाखवू शकता. चेहऱयाला एक नवीन आकार देण्याचे काम कॉन्टय़ुरिंग करत. यामध्ये जास्त वयाच्या व्यक्तीचे वय तुम्ही कमी दाखवू शकता. तसेच चेहऱयाला पाहिजे तो शेप व पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता.
कॉन्टय़ुरिंग मेकअप करताना त्याची सुरुवात परफेक्ट बेसने होते. त्यामध्ये तुम्ही तुमच्या शेडचे फाऊंडेशन घेऊन ते व्यवस्थित पसरवून कॉन्टय़ुरिंगसाठी दोन किंवा तीन शेड डार्क फाऊंडेशन घेऊन त्याचा वापर करून चेहऱयाला आकार दिला जातो. त्यासाठी तुम्हाला प्रथम स्किन टोन परफेक्ट घेऊन तो नीट ब्लेंड करणे आवश्यक असते. तसेच कॉन्टय़ुरिंगमध्ये हायलाइटलाही जास्त महत्त्व असते. काही भाग लपवताना काही भाग हायलाइट करण्याचीही तेवढीच आवश्यकता असते. त्यासाठी चेहऱयाच्या काही विशिष्ट भागावर उदाहरणार्थ नाकावर, हनुवटीवर, गालाच्या हाडांवर हायलाइटचा वापर केला जातो.
कॉन्टय़ुरिंग केल्यानंतर काही भाग हायलाइटरने हायलाइट करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. यामध्ये तुमच्या चेहऱयातील नाक, जॉलाइन, चिकबोन्स, हेअरलाइन यांना उभारी मिळते.
वेगवेगळय़ा चेहऱयाच्या आकाराप्रमाणे…
l अंडाकृती चेहरा (ओव्हल फेस) हा मेकअपसाठी योग्य असा चेहऱयाचा आकार आहे. तरी बऱयाच वेळा ओव्हल फेसमध्ये फोरहेड मोठे असते. त्यामुळे त्याला तुम्हाला कॉन्टुर करून थोडेसे कमी करावे लागते. तसेच फोरहेडवर ब्लेंडिंग करताना तुम्हाला हेअरलाइन जवळ नेट ब्लेंड करावा लागते. तसेच जर एखाद्याचे नाक अपरे असेल किंवा छोटे, फार जाड असेल तर त्याला तुम्हाला कॉन्टुर करावे लागते. जॉलाइनखाली हलकेसे कॉन्टुर करताना ते व्यवस्थित ब्लेंड करणे.
l गोल चेहरा (राऊंड फेस) – या चेहरेपट्टीत फोरहेड मोठे असते तेव्हा फोरहेडच्या आयब्रोच्या मध्यापासून कॉर्नरपर्यंत सी शेपमध्ये कॉन्टुरिंग करण्याची गरज असते व चीक बोन्सवर तुम्ही ट्रँगल शेप करून ते ब्लेंड करू शकता. नंतर नाक छोटे किंवा बारीक दाखवण्यासाठी नाकाच्या दोन्ही साइडला कॉन्टुरिंग करत ब्लेंड करा. त्यामुळे नाक सरळ व बारीक दिसेल तसेच गोल चेहऱयामध्ये गाल जास्त मोठे असल्यामुळे गालावर शॅडो क्रिएट होऊन तुमचे गाल स्लिम कसे दिसतील यासाठी तुम्हाला कॉन्टुर करण्याची आवश्यकता असते.
l आयताकृती चेहरा (लॉन्ग फेस) – या चेहऱयामध्ये कपाळपट्टी लांब असते व हनुवटीदेखील लांब असते. त्यामुळे कपाळपट्टी व हनुवटीवर कॉन्टय़ुरिंग करताना कपाळपट्टीच्या अगदी आयब्रोपर्यंत न नेता कपाळपट्टीपर्यंत कॉन्टय़ुरिंग करण्याची आवश्यकता असते. तसेच ते ब्लेंडिंग करताना वरच्या साइडला ब्लेंड करण्याची आवश्यकता असते. तसेच हनुवटी छोटी दाखविण्यासाठी हनुवटीच्या खाली कॉन्टय़ुरिंगची शेड लावून व्यवस्थित ब्लेंड केल्यास हनुवटीदेखील छोटी भासेल व चेहऱयाचा आकार अंडाकृती चेहराप्रमाणे भासेल.
l चौकोनी चेहरा (स्क्वेअर फेस) – यामध्ये कपाळपट्टी व चीकबोन्सच्या साइडला जास्त ब्रॉडनेस असतो. त्यामुळे फोरहेड व चीकबोन्सचे ब्रॉडनेस कमी करताना जॉलाइनच्या बाजूला हाड थोडे बाहेर आलेले असते. त्यावरही कॉन्टुर करून म्हणजेच डार्क शेडचीची लाइन्स क्रिएट करून ती ब्लेंड करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तुमचा चेहरा निमुळता भासून तो थोडा ओव्हल शेपसारखा दिसेल.
l हार्ट शेप चेहरा – या फेस शेपमध्ये फार काही करण्याची गरज नसते. हा फेसशेप जवळ जवळ ओव्हल फेसच्या जवळ जाणार असतो. फक्त यामध्ये हनुवटी जास्त निमुळती असते, तर ती जर कधी जास्त निमुळती किंवा लॉन्ग असेल तर त्याच्यावर कॉन्टुरिंग करण्याची गरज असते आणि बाकी नेहमीप्रमाणे नाकावर आणि तुमच्या गालांच्या हाडांच्या बाजूला तुम्ही अगदी हलकेसे कॉन्टुरिंग करू शकता.
– मेकअप करत असताना तुम्हाला जर कॉन्टय़ुरिंग किंवा हायलाइटर यांचा वापर करायचा असेल तर मात्र तुम्हाला चेहऱयाचा अभ्यास असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळेच तुम्ही चेहऱयाचा आकार ओळखून, त्यातील उणिवा ओळखून त्या चेहऱयाला विशिष्ट आकारात आणून त्यात सुंदरता निर्माण करण्याचे काम अगदी योग्य प्रकारे करू शकता.





























































