
>> श्रीकांत आंब्रे
कर्ज देताना बँका ताळेबंदाचे विश्लेषण कोणत्या पद्धतीने करतात याची माहिती देण्याचा प्रयत्न ‘वेध ताळेबंदाचा’ या पुस्तकात लेखकाने केला आहे. लेखक डॉ. अभय मंडलिक हे ज्येष्ठ बँकिंग तज्ञ असून त्यांच्या अनेक बँकांतील अनुभवाचा ठेवा या पुस्तकासाठी उपयुक्त ठरला आहे. आपल्या देशातील एकूहा व्यवसायाचा आर्थिक आरसा असतो. पारदर्शक व्यवहार असतील तर ताळेबंददेखील सुदृढ झालेला दिसतो. त्यामुळे तो नीटनेटका कसा राहील, बँकांच्या दृष्टिकोनातून तो कसा असावा यावर भाष्य करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. बँकांना ताळेबंदावरून कर्जाचे निर्धारण करताना, तसेच उद्योजकांना व्यवसाय सुरू करताना, व्यवसायासाठी कर्ज घेताना या पुस्तकातील माहितीचा नक्कीच उपयोग होईल. नागरी सहकारी बँकांना सध्या मोठय़ा संकटातून जावे लागत आहे. व्यवसायावर परिणाम होत आहेच; त्याचबरोबर बँकेची नफा क्षमता वाढविण्याचीदेखील गरज आहे. केंद्र सरकारने बँपिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये केलेल्या बदलांचा विचार करता आता सर्वच बाबतीत सहकारी बँकांचा ताळेबंद सक्षम असण्याची गरज आहे. बँकांबरोबरच कर्जदार व्यावसायिकांचा ताळेबंददेखील समजून घेऊन बँकांना आपले कर्जधोरण सुधारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पुस्तकात ताळेबंदाचे विश्लेषण अधिक चोखपणे करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याचा बँकांनाही निश्चित फायदा होईल. पुस्तकात एकूण 10 प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणात शीर्षक विषयाची सविस्तर मांडणी विषयाची वर्गवारी करून सोप्या भाषेत केली आहे. भारतीय बँपिंग प्रणाली आणि बँकांच्या कर्जप्रकाराची माहिती, बँकांकडून कर्ज घेण्यापूर्वी…, आर्थिक पत्रके ः ताळेबंद म्हणजे काय? ताळेबंदाचे महत्त्व आणि पॅश-फ्लो खेळत्या भांडवलाचे परिचालन चक्र, ताळेबंदाची पुनर्रचना आणि ताळेबंदाच्या विश्लेषणासाठी महत्त्वाचे रेशोज, खेळत्या भांडवलाचे निर्धारण, दीर्घ मुदतीच्या कर्जाचे निर्धारण, उद्योजकाचा ताळेबंद कसा असावा?, बँक आणि कर्जदार संबंध, परदेशी व्यापाराचे थोडक्यात नियम इत्यादी उपयुक्त माहिती निश्चित मार्गदर्शनपर ठरेल.
वेध ताळेबंदाचा
लेखक – डॉ. अभय मंडलिक
प्रकाशक – सहकार सुगंध, पुणे
पृष्ठ- 156, मूल्य – रुपये 200/-




























































