
>> वरद चव्हाण, [email protected]
अभिनेता गौरव घाटणेकर. व्यायाम त्याच्या घरातच. स्वतःचे डाएट तो स्वतः ठरवतो आणि कोणत्याही Cheatingbm भुलत नाही.
मराठी हीरो आणि चॉकलेटी लुक हे मिश्रण तसे दुर्मिळच आहे, नाही का? आपल्या मराठी सिनेसृष्टीत कलावंताच्या दिसण्यापेक्षा त्याच्या अभिनयास जास्त महत्त्व दिलं जात होतं, पण आता काळ बदलला आहे. चांगला अभिनय व चॉकलेट लुक्सचं पॅकेज जेवढं दुर्मिळ तेवढंच मौल्यवान.
गौरव घाटणेकरबरोबर मी दोन प्रोजेक्टमध्ये काम केलंय. आम्ही ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ नावाचा चित्रपट केला होता. त्याशिवाय सध्या आम्ही ‘ललित 205’ नावाच्या मालिकेत काम करतोय. गौरवबरोबर काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तो त्याच्या आहाराबद्दल अत्यंत चोखंदळ असतो. मी काय खाल्लं पाहिजे? किती खाल्लं पाहिजे? काय खाल्लं की मला प्रोटिन्स, फॅट्स, कार्ब्स योग्य प्रमाणात मिळतील? ही गणितं सतत त्याच्या डोक्यात चालू असतात. 2008 साली गौरवने ‘मास्टर इन ऑक्टिंग’चा कोर्स पूर्ण केला. मुंबईतील ‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये ज्येष्ठ नट नसिरुद्दीन शाह यांच्याकडून त्याने अभिनयाचे धडे घेतले. फेब्रुवारी 2009 ला अनेक फिल्म फेस्टिव्हल्स गाजवलेली फिल्म ‘रुस्तम की दास्तां’ या फिल्ममधून त्याचं पदार्पण झालं. मराठीत ‘तुजविण सख्या रे’ या मालिकेतून तो पहिल्यांदाच मराठी प्रेक्षकांच्या समोर आला. गौरववर नसिरुद्दीन शाह यांचा खूप प्रभाव आहे. त्यांच्याच ‘मोटली’ नावाच्या नाटय़ संस्थेत गौरव इंटर्न म्हणून काम करत होता. गौरवची अभिनय क्षमता पाहून शाह यांनी त्यांच्या नाटय़ संस्थेत व्यवसायिक अभिनेत्याचा दर्जा दिला. त्या संस्थेत गौरव अजूनही ऑक्टिव्ह आहे. व्यायामाची परंपरा गौरवच्या परिवारातच आहे. गौरवचे बाबा मर्चंट नेव्ही ऑफिसर होते. आता ते निवृत्त झालेत. बाबांच्या व्यतिरिक्त गौरवचे काकासुद्धा एअरफोर्स पायलट होते. त्यामुळे फिटनेस म्हणजे काय हे गौरवने लहानपणापासून अनुभवले आहे. बाबा आणि काकांबरोबरच नसिरुद्दीन शाहसुद्धा व्यायामाला तेवढेच प्राधान्य द्यायचे. त्यांचं म्हणणं होतं की, ऍक्टर नेहमीच फिट असला पाहिजे. ते गौरवला नेहमी सांगायचे की, ‘‘मैं ये नही कहता की जिम जाके लोहा उठाव’’, पण प्रत्येक कलाकाराने फिट असणे खूप गरजेचे आहे. ते स्वतः अजूनही टेनिस खेळतात. गौरव स्वतः खेळाचा चाहता आहे. त्याला प्रामुख्याने वाटते की, तुम्ही लहानपणापासून कुठलाही खेळ खेळलात तर एक कलाकार म्हणून ते तुम्हाला खूप उपयोगी पडते. खेळ खेळून तुमचे शरीरयष्ठाr डौलदार होते. तुमचे खांदे कधीही उतरत नाहीत. सध्या त्याला नियमितपणे स्क्वॉश हा खेळ आवडतो. हा एक मल्टिपर्पज खेळ असून त्यात तुमचा स्टॅमिना, लोअर बॉडी, शोल्डर, फोरआर्म्स या सगळय़ा स्नायूंचा व्यायाम होतो. या खेळाव्यतिरिक्त त्याला सायकलिंग व हॉर्स रायडिंग करायला आवडते. हॉर्स रायडिंगचे गौरवने प्रशिक्षणसुद्धा घेतलंय. त्याच्याच बिल्डिंगमध्ये असलेल्या जिममध्ये तो नियमित जातो. शूट नसताना मात्र गौरवचा संपूर्ण दिवस व्यायामासाठी असतो. 7.30 ते 8 ला उठतो. मग 9.30 ते 10 ला जिम. साधारण 45 मिनिटांचा व्यायाम. मग 30 मिनिटे स्विमिंग. दुपारचे जेवण झाल्यावर थोडी झोप. कारण झोपसुद्धा तेवढीच आवश्यक आहे आणि संध्याकाळी 6 नंतर मित्रांबरोबर स्क्वॉश. त्याच्या रुटिनमध्ये कार्डिओला जास्त महत्त्व आहे. गौरवचा कोणीही पर्सनल ट्रेनर किंवा डाएटिशियन नाही. त्यानं स्वतः खूप अभ्यास करून स्वतःचा एक डाएट चार्ट व व्यायामाचं वेळापत्रक तयार केलंय. गौरवला या गोष्टींचं इतकं ज्ञान आहे की, समजा अजून 4-5 दिवसांनी त्याला ओपन बॉडीशूट करायचे असेल तर कुठल्या गोष्टी खाणं कमी केल्या पाहिजेत, कुठल्या वाढवल्या पाहिजेत हे त्याला अचूक माहीत आहे. गौरवला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा स्पोर्टस् म्हणजेच स्क्वॉश, सायकलिंग, हॉर्स रायडिंग जास्त आवडतं, पण स्क्रीनवर फिट दिसण्यासाठी तो व्यायाम आवर्जून करतो, जेणेकरून त्याचे बॉडी पोश्चर चांगले दिसले पाहिजे. गोड खाणं म्हणजे पाप आहे असं त्याला वाटतं. इंटरमिजिएट फास्टिंग म्हणजेच 16 तास काहीही न खाणं हा त्याच्या आहाराचा एक भाग आहे. म्हणजे तो रात्री 9.30-10 ला जेवला तर तो मध्ये काहीही न खाता सरळ दुसऱया दिवशी दुपारचे जेवण जेवतो. त्यानंतर 2-2 तासांनी खातोच असे नाही, पण भूक लागलीच तर हिरव्या भाज्या खातो. आज जवळ जवळ 4 महिने मी गौरवबरोबर काम करतोय. सेटवर बऱयाच वेळा असं चमचमीत जेवण असतं किंवा आम्ही कलाकार मिळून बाहरचे फास्ट फूड मागवतो. ज्यामुळे आपल्याला आपले डाएट एक दिवस चीट करून जेवणावर ताव मारू असे वाटते, पण गौरवचे स्वतःवर इतकं नियंत्रण आहे की, तो त्या जेवणाकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. गौरवसाठी हॉटेलमधून येणारी पार्सल्स म्हणजे चिकन सॅलॅड, रोस्टेड चिकन, ज्यामुळे शरीरातले फॅट्स वाढणार नाहीत असं असतं. त्याचं जेवण बघून आम्हीच बऱयाच वेळा कपाळावर हात मारतो. बाहेरून मागवूनसुद्धा हे काय मागवतो हा! पण त्याचबरोबर तो त्याच्या प्रोफेशनसाठी स्वतःच्या भुकेवर कसा ताबा मिळवतो याचे कौतुकदेखील वाटते. गौरवच्या बॅगमध्ये तुम्हाला दोन गोष्टी आवर्जून मिळतील. एक म्हणजे रेझिस्टन्स बॅण्ड आणि दुसरी म्हणजे ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफीचे अनेक फायदे आहेत- त्याने तुमचे पोट साफ राहते, वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते, शरीर डीटॉक्सिफाय होतं.
तुम्ही व्यायाम करण्याआधी जर ब्लॅक कॉफी प्यायलात तर तुमचा व्यायाम चांगला होतो. आज जिममधले अनेक प्रशिक्षक तुम्हाला जिमला येण्याआधी ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला देतात. प्रत्येक सीननंतर जसा वेळ मिळेल तसा गौरव स्वतःचा रेसिस्टन्स बॅण्ड उचलतो आणि 30-40 मिनिटे टोटल बॉडी वर्कआऊट करतो. रेझिस्टन्स बॅण्डने आपण कोणकोणते व्यायाम करू शकतो याची माहिती तुम्हाला यूटय़ूबवर मिळेल. मला एक गमतीचा किस्सा सांगावासा वाटतो. एकदा आमच्या मालिकेच्या दिग्दर्शकांनी आमचं शूट सुरू असताना शॉर्ट कट केला आणि ते गौरवला म्हणाले, ‘‘गौरव, असा नको उभा राहूस, तुझं पोट दिसतंय’’ हे वाक्य गौरवनं इतकं मनावर घेतलं की, पुढचे काही दिवस तो स्ट्रिक्ट डाएटवर होता आणि सतत (ऍबचे) पोटाचे व्यायाम करताना आम्हाला दिसायचा. माझं पोट दिसलं म्हणजे माझं करीअर संपलं या मताचा तो आहे आणि साधारण महिनाभरात त्याने त्याचं पोट कमी केलं. एखादी व्यक्ती त्याच्या करीअरबद्दल किती डेडिकेटेड आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. गौरव हार्डकोअर मांसाहारी आहे. मासे, चिकन, मटणसाठी तर तो वेडा आहे. त्याला फिश फ्राय खूप आवडते, पण त्यासाठी तो ऑलिव्ह ऑईल किंवा कोकोनट ऑईलचा वापर करतो. आजच्या त्याच्या वयोगटातील मित्रांना त्याला सांगावंसं वाटतं की, तुम्ही मानसिकदृष्टय़ा व्यायामासाठी तयार असाल तरच व्यायाम करा. जर तुमच्या मेंदूतून शरीराला नीट सिग्नल नाही गेले तर तुमची बॉडी कधीच पंप नाही होणार आणि जर तुम्ही प्रोटिन शेक घेणार असाल तर पाण्यातूनच घ्या. दुधातून घेणं टाळा. खरं तर प्रौढावस्थेमध्ये आल्यानंतर आपण दूध घेऊच नये. माणूस ही एकमेव अशी जात आहे, जो वयाच्या साठीतसुद्धा दूध पितो, जे अत्यंत चुकीचे आहे. गौरवने प्राण्यांचे उदाहरण देत सांगितले की, प्रत्येक प्राणी एक ठरावीक वयापर्यंतच दूध पितो. तसंच आपल्यालासुद्धा आयुष्यभर दुधाची गरज नसते. सतत दूध पिणंसुद्धा हानीकारक आहे. गौरवबद्दलचा हा लेख वाचल्यावर तुम्हाला त्याच्या मानसिकतेचे कौतुक वाटलं नाही तर नवलच आहे. एखाद्याने आपल्या प्रोफेशनसाठी स्वतःच्या मनावर व भुकेवर मिळवलेल्या नियंत्रणाचे उत्तम उदाहरण म्हणजेच आपला चॉकलेट हीरो गौरव घाटणेकर. कोणालाही आदर्श न मानता स्वतःच स्वतःचे स्टॅण्डर्ड रेझ करणारा गौरव तुम्हालासुद्धा नक्कीच प्रेरणा देईल अशी अपेक्षा करतो.
























































