
>> विनायक
1990 पासून जगभरच्या लोकांना एडविन हबल यांचं नाव माहीत झालं. त्याचं कारण म्हणजे हबल यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण अवकाश निरीक्षण आणि संशोधन. ‘विज्ञानरंजन’मध्ये त्यांच्यावर लिहिण्याचं कारण म्हणजे काही शब्द पिंवा संज्ञा आपण व्यावहारिक बोलण्यात सहज वापरतो. त्यानुसार ‘हबल’ हे नाव आपल्याला त्यांच्याच नावाच्या आणि अवकाशाचा कधी नव्हे एवढा धांडोळा घेऊन दृष्टीआडचं विश्व उलगडण्याचा ‘पराक्रम’ ही दुर्बीण करतेय. आता तिला ‘जेम्स वेब’ या दुसऱ्या शक्तिशाली अवकाश दुर्बिणीची साथ मिळतेय. ‘हबल टेलिस्कोप’च्या कर्तृत्वाविषयी आपण ‘आभाळमाया’ सदरातून अनेकदा वाचलं असेल. त्याची तांत्रिक माहितीही बऱयापैकी घेतलीय. इथे फक्त त्या यशस्वी दुर्बिणीला पस्तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संशोधकांचं अभिनंदन आणि त्याअनुषंगानेच अवघ्या त्रेसष्ट वर्षांचं जीवन लाभलेल्या या महान संशोधकांविषयी थोडंस.
एडविन हबल हा उमदा आणि रसिक माणूस असावा असा त्यांचा ‘पाइप’चा आस्वाद घेतानाचा हसरा फोटो आठवतो. त्यांच्या बहुतेक पह्टोत ‘पाइप’ आहेच. आता इथे तसे लोक फार दिसत नाहीत आणि तंबाखू, सिगारेट, चिरूट अथवा पाइप या कोणत्याही प्रकारे वापरणे हे आरोग्याला हितावह नाही हे जगाला हळूहळू कळतंय, परंतु एकेकाळी इंग्लंडमध्ये ‘पाइप’ ओढणं प्रतिष्ठsचं मानलं जायचं.
…तर हबलच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही अशी एरवी शास्त्र्ाज्ञ म्हटले की, धीरगंभीर मुद्रा नजरेसमोर येते तसे एडविन हबल यांचे व्यक्तिमत्त्व वाटत नसे. मात्र त्यांचं ‘अवकाशाशी जडलेलं नातं जगाला भरपूर काही (ज्ञान) देऊन गेलं. त्यांच्यामुळेच ‘सेफिड व्हेरिएबल’ रूपविकारी दूरस्थ ताऱयांची माहिती जगापुढे आली. शंभर इंच व्यासाचा आरसा असलेल्या शक्तिशाली दुर्बिणीतून त्यांनी आपल्या आकाशगंगेपलीकडच्या दूरस्थ ताऱयांचा आणि दीर्घिकांचा सतत शोध घेतला. आता ते काम त्यांच्याच नावाची गुणी दुर्बीण थेट अवकाशात राहूनच करतेय.
अमेरिकेतील मिसुरी राज्यात 1889 मध्ये एडविन हबल यांचा जन्म झाला. 1900 मध्ये हबल कुटुंब इलियॉनिस राज्यातल्या व्हिटन येथे स्थायिक झालं.
एडविन तरुण वयात अॅथलेट (कसरतपटू) होते. अमाप उत्साह असलेल्या एडविन यांना त्यामध्ये आणि फुटबॉल, बास्केटबॉल असे दमवणारे खेळ खेळण्यात अधिक रस असायचा. त्याशिवाय धावण्याच्या शर्यतीत ते बालवयापासून भाग घेत असत. या सगळय़ा खेळांमध्ये त्यांना सात वेळ पहिला नंबर लाभला. शिकागो विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाचे ते पॅप्टन होते. त्यात या संघाला 1907 मध्ये पहिलं बक्षीस मिळालं.
खेळाबरोबरच गणित हासुद्धा त्यांच्या आवडीचा विषय. अभ्यासाचे विषय छंदासारखे वाटू लागले तर त्यामुळे पंटाळा येत नाही आणि नवनवीन शिकण्याची उर्मी वाढते. भौतिकशास्त्र्ा शिकत असताना नंतरच्या काळात नोबेल पुरस्कार मिळालेले रॉबर्ट मिलिकन यांचे सहाय्यक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मिलिकन यांना, त्यानंतर काही काळ एडविन यांना कलाक्षेत्रातील (आर्ट्स) अभ्यासाने भुरळ घातली. वडिलांच्या अखेरच्या क्षणी ‘आपण कायद्याचा अभ्यास करू’ असं दिलेलं वचन पाळलं आणि त्यांनी इंग्लिश साहित्यासह स्पॅनिश भाषेचाही अभ्यास केला.
तरीसुद्धा एडविन यांना भौतिकशास्त्र्ा, गणित आणि खगोलशास्त्र्ासुद्धा खुणावत होतं. शेवटी त्यांची पावले आवडीच्या अभ्यासाकडे वळली. एडविन यांनी खगोल अभ्यास करण्यासाठी थर्क्स वेधशाळेत प्रवेश मिळवला आणि त्यात पीएच.डी. प्राप्त केली. पहिल्या महायुद्धात ते अमेरिकन सैन्यातही दाखल झाले. युद्ध संपल्यावर पुन्हा खगोलशास्त्र्ााचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी पेंब्रिज विद्यापीठात नाव नोंदवलं.
त्यानंतर मात्र अमेरिकेत पॅलिपहर्नियातील माउन्ट विल्सन वेधशाळेतील आधी उल्लेख केलेल्या 100 इंची आरशाच्या परावर्ती हूकर टेलिस्कोपद्वारे ‘विश्वा’वर नजर रोखली. तोपर्यंत संपूर्ण विश्व आपल्या आकाशगंगेपर्यंतच सीमीत आहे असं संशोधकांना वाटत होतं. हबल यांना त्यापलीकडच्या देवयानी, ट्रन्ग्युलम इ. दीर्घिकांचं ‘दर्शन’ झाले. प्रथम ते केवळ तेजोमेघ वाटले. पण नंतर त्या स्वतंत्र आणि विराट दीर्घिका असल्याचं लक्षण आलं. विज्ञान अभ्यास करणाऱयांचाही कधी-कधी ‘स्थितीवादी पंथ’ तयार होतो. हबल यांचं म्हणणं अनेक संशोधकांना पटलं नाही, परंतु शेवटी हबल यांचंच संशोधन खरं ठरलं आणि माणसाचं विश्व विस्तारलं. ‘हबल दुर्बिणी’च्या पस्तीशीनिमित्त एडविन हबल यांची माहिती एवढय़ासाठी दिली की, सामान्य परिस्थितीतून वर येऊन या रसिक माणसाने अक्षरशः विश्वव्यापी संशोधन केले!