आपलं अंतराळ स्थानक

>> डॉ. अभय देशपांडे, मानद समन्वयक, खगोल मंडळ 

अंतराळवीरांना विविध प्रयोग करता येणार आहेत. तसेच त्यांच्या राहाण्याचीही सोय होणार आहे. कारण आता हिंदुस्थानचं लवकरच स्वतःच स्पेस स्टेशन असणार आहे.

अंतराळ स्थानक आपल्या पृथ्वीच्या जवळची कक्षा असते त्याला आपण पृथ्वी समिप कक्षा (लो अर्थ ऑर्बिट) असे म्हणतो. खरंतर या कक्षेमध्ये हे स्थानक पृथ्वीभोवती फिरत असतं. या स्थानकामध्ये काही लोकांची काही दिवसांसाठी राहण्याची सोय आपण करू शकतो. उदा. आय.एस.एस. जे आहे, चीनचे टीयाँगाँग आहे. या स्थानकात अंतराळयात्री जे असतात ते राहू शकतात. पृथ्वीवरून माणसांना पाठवायचे असेल तर आपण त्या अंतराळ स्थानकात नेऊन ठेऊ शकतो आणि ते त्यांचे जे ठरलेले दिवस असतील तेवढे दिवस त्या ठिकाणी राहू शकतात. त्याचा मुख्यत्वे उपयोग स्पेस ऍकोमेडेशनसाठी होतो. म्हणजे माणसाला आकाशात जायचे असेल, चंद्रावर जायचे असेल किंवा उद्या मंगळावर जायचे असेल तर त्याला अंतराळात राहायची सोय कशी करू शकू आपण, त्याची तिथे टिकावणी कशी होईल, ट्रेनिंग होऊ शकेल का या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे हा एक भाग. दुसरे असे की, अंतराळ यात्रींना स्पेसमध्ये काही विशेष प्रयोग करायचे असतील तर शून्य गुरुत्वाकर्षणाच्या अनुषंगाने अशा स्पेस स्टेशनच्या मदतीने करू शकतात.

यामुळे आपली दळणवळणाची साधने, संवादाची नवी साधने तसेच पृथ्वीचे निरीक्षण करता येऊ शकते. हे स्थानक चोवीस तास, 365 दिवस आकाशात असणार आहे. शिवाय आपल्याला जर एखादा नवीन प्रयोग अंतराळात करायचा असेल तर परदेशात आय.एस.एस. किंवा अन्य साधन वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतात. आपलं स्थानक असेल तर आपण ते विनामूल्य वापरू शकतो.

कोणतंही अंतराळ संशोधन केंद्र हे केवळ अंतराळाचं संशोधन करतं असं नाही, तर पृथ्वीचे निरीक्षण करणं, हवामानाचे निरीक्षण करणं, सॅटेलाईल कम्युनिकेशन दळणवळण करणं, टेलिव्हिजन चॅनल दाखवणे अशी कामंही केली जातात. गेल्या साठ वर्षांतील मिशन पाहता आपण शंभरपेक्षा जास्त सॅटेलाईट आकाशात पाठवले आहेत. चंद्रयान, मंगळयान आणि ऍस्ट्रोसॅट हे तीन सोडले तर बाकी सगळी यानं नियमित दळणवळण, हवामानशास्त्र्ा यासाठी गेलेली आहेत.

चंद्रावर माणूस पाठवणे ही इस्रोची 2021ची महत्त्वाकांक्षा आहे. अपोलो यानाच्या श्रेणीनंतर कुणीही मानव चंद्रावर पाठवलेला नाही, चांद्रयान ज्यावेळी 2018च्या सुमारास गेले त्यानंतर त्या यशामुळे लोकं पुन्हा चंद्राकडे वळायला लागली आहेत. आपल्या दृष्टीने हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर जाईल तो अतिशय महत्वाचा टप्पा ठरेल. कारण त्याच्यामुळे जी नवीन साधनं, संशोधनं आपण करू त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होऊ शकतो.

तर अंतराळात पर्यटनही शक्य…
अवकाश स्थानक हे लोकांचे मधले हायब्रिड मानले जाते. त्याचा उपयोग निरीक्षणासाठी, प्रयोगासाठी केला जाणार आहे. अंतराळ स्थानक असले की अंतराळयात्री हा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. अंतराळ भ्रमण करणं हे ज्यांना करायचे असते त्यांना स्थानक असणं अतिशय महत्वाचं असतं. आपलं मोठं स्थानक झालं तर आपण अंतराळात पर्यटनही करू शकतो.

इस्रो स्पेस स्टेशनचे वैशिष्टय़
– जमिनीपासून 400 किलोमीटर उंचीवर साधारणपणे 20 टन वजनाचे अवकाश स्थानक आहे.
– स्थानकामध्ये अंतराळवीरांना 15 ते 20 दिवस राहता येईल.
– सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी अवकाश स्थानकाचा उपयोग होईल.
– हे अवकाश स्थानक पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर उभारण्यात येणार आहे.
– हे प्राथमिक पद्धतीचे स्टेशन आहे, पण आपण हा टप्पा पार पाडला तर त्या अनुभवावर अतिशन मोठं स्टेशन करु शकतो.

– abhaypd@gmail.com