एटीएमचे फायदे अनेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे एटीएमचा वापर करून आपण रक्कम काढतो, पण त्याव्यतिरिक्तही एटीएमचे इतरही फायदे आहेत.

  • अकाऊंट बॅलन्स तपासा-  एटीएमद्वारे आपण मिनी स्टेटमेंट काढू शकतो.
  • क्रेडिट कार्ड पेमेंट- कोणत्याही व्हिसा क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करण्यासाठी एटीएमचा वापर करता येतो.
  • प्रीमियम पे करणे- कोणत्याही बँकेच्या एटीएमचा वापर करून आपल्याला प्रीमियम पे करता येतो. एलआयसी, एचडीएफसी लाइफ आणि एसबीआयसारखे विमा यूजर्स एटीएमद्वारे प्रीमियम पे करू शकतात. यासाठी पॉलिसी नंबरची आवश्यकता आहे.
  • कार्ड टू कार्ड व्यवहार- ग्राहक एका डेबिट कार्डद्वारे दुसऱया डेबिट कार्डवर पैसे पाठवू शकतो. ही विनाशुल्क फ्री सर्विस आहे. यातून ग्राहक 40 हजारांपर्यंतची रक्कम पाठवू शकतो.
  • चेकबुक मागवू शकता- कोणत्याही बँकेच्या शाखेत न जाता एटीएमद्वारे चेक बुकची ऑर्डर देऊ शकतो.
  • अकाऊंट टू अकाऊंट ट्रान्स्फर- एका खात्यातून दुसऱया खात्यात पैसे पाठवता येतात. एका कार्डद्वारे जास्तीत जास्त 16 खात्यांशी लिंक करता येते.
  • मोबाइल बँकिंगसाठी नोंदणी- एटीएमद्वारे मोबाइल बँकिंगसाठी नोंदणी करता येते.
  • एटीएमद्वारे पिन बदला- एटीएमद्वारे डेबिट कार्डचा पिन नंबर बदलता येतो.
  • डीसीसीची सुविधा – एचडीएसी बँकेच्या माहितीनुसार, डायनामिक करन्सी कन्वर्जन (डीसीसी) सर्विसद्वारे कार्डधारक आंतरराष्ट्रीय व्यापाऱयांसोबत खरेदी करू शकतो.