एटीएममधून विनाकार्ड काढा रोख रक्कम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समजा तुम्ही एटीएमवर रोख रक्कम काढायला गेलात आणि तुमच्या लक्षात आले की, डेबिट कार्ड जवळ नाही… काही हरकत नाही. कारण विनाएटीएम कार्ड तुम्हाला रक्कम काढता येईल. या सुविधेचे नाव कार्डलेस पॅश विड्रॉल असे आहे. याअंतर्गत यूपीआय पेमेंट अॅपच्या मदतीने क्यूआर कोड स्पॅन करून एटीएममधून रक्कम काढता येते. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अशी करा प्रक्रिया…

– यूपीआय ऑप्लिकेशनमध्ये नोंदणीकृत कुणीही व्यक्ती यूपीआय-एटीएमचा उपयोग करू शकते.
– सर्वात आधी एटीएम मशीनवर जाऊन UPI Cardles Cash/QR Cash हा पर्याय निवडा.
– त्यानंतर तुमची रक्कम नोंदवा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

– रक्कम टाकल्यानंतर एटीएम मशीनवर एक क्यूआर कोड येईल.
– हा क्यूआर कोड मोबाइलमध्ये असलेल्या GooglePay, Paytm, PhonePe वा अन्य अॅपच्या मदतीने स्पॅन करा.
– त्यानंतर यूपीआय पिन टाका. प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला रोख रक्कम मिळेल.