
>> पूजा तावरे
फॅशन कधी कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. सध्या फॅशन जगतात देखण्या गाऊन्सची चलती आहे. दिसायला सुंदर… फॅशनला सोपे… आणि परिधान करायला आरामदायी!
गाऊन म्हटलं की, आपल्याला मोस्टली पार्टीवेअर गाऊनच समोर दिसतो. मात्र सध्याच्या फॅशनमध्ये सुटसुटीत, आरामदायी अशा कॅज्युअल गाऊन्सची चलती दिसून येत आहे. फॉर्मल कॅज्युअल ड्रेसिंग बऱयाचदा बोअर वाटत असते. मात्र सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या कॅज्युअल गाऊन्सची फॅशन दिसून येत आहे. कॅज्युअल गाऊन्समध्ये डार्क, पेस्टल शेडस् ट्राईप्स, चेक्स या प्रकारातील डिझाईन्स पाहायला मिळतात. या प्रकारच्या गाऊन्समध्ये ए लाइन एम्पायर किंवा बॉल गाऊन्सचा पर्याय असतो. यामध्ये फुल, नी लेंग्थचे गाऊनदेखील उपलब्ध आहेत. तसेच उंच मुलींना टी लेंग्थचे गाऊनदेखील छान दिसू शकतो. कॅज्युअल गाऊन्समध्ये इंडो-वेस्टर्न, अनारकली फॅन्सी प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये बऱयाचदा गाऊनवर दुपट्टा आणि सूट होणारी ऍक्सेसरीज वापरली तर ती जास्त उठून दिसते. विविध आकर्षक रंगांत हे गाऊन सर्वत्र उपलब्ध आहेत.
फॉर्मल क्लोदिंगसाठी हे गाऊन छान वाटतात. विविध प्रकारच्या फॅब्रिक आणि पॅटर्न प्रकारांमध्ये हे गाऊन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ऑफ शोल्डर ते कोल्ड शोल्डर, डीप नेक, शियर गाऊन हायलो असे अनेक पॅटर्न आहेत.
हे गाऊन्स फॅशनेबल आणि आकर्षक राहण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहेत. ऑफिस गोइंग वुमन, कॉलेज युवतींसाठी हे कॅज्युअल गाऊन म्हणजे कम्फर्ट, स्टाईल, लुक्स, कलर्स, डिझाईन आणि पॅटर्नचे भन्नाट कॉम्बिनेशन आहे.
फ्लोरल्स, अबस्ट्रक्ट, ऑनिमल प्रिंट, प्रिंटेड, डिझाईन असलेले हे गाऊन अत्यंत सुंदर दिसतात. शक्यतो यामध्ये ब्राईट कलरचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. तसेच काही गाऊन्सला यामध्ये लेस, बटन, बेल्टने सजविण्यात येते. यावर जुन्या सुंदर बॉर्डर असलेल्या कॉटन, ब्लॉक प्रिंट असलेल्या साडीचा गाऊन शिवू शकता. बऱयाचदा या गाऊन्सवर डेनिमचे जॅकेटदेखील छान दिसू शकतात. कॉलेज युवतींमध्ये फ्रिल्स असलेल्या गाऊन्सला पसंती मिळत आहे. या गाऊनमधील विविध डिझाईन्समुळे एथनिक आणि एलिगंट लूक प्राप्त होतो. हे गाऊन शॉर्ट, लॉंग स्लीव्जमध्ये उपलब्ध आहेत.
गाऊन हे महिलांसाठी लॉंग फ्लोविंग गार्मेंट असून सामान्यतः लग्नसमारंभ, पार्टी आणि उत्सव यांसारख्या औपचारिक कार्यक्रमांसाठी परिधान केले जाते. हिंदुस्थानी फॅशन लाइनमध्ये गाऊन हे अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. गाऊनमुळे एक हटके लूक मिळतो. तसेच हिंदुस्थानी समृद्धी आणि पाश्चिमात्य सुरेखतेच्या योग्य मिश्रणामुळे गाऊनला वेगळा लूक प्राप्त होतो.
सॅक गाऊन
गाऊन प्रकारांमध्ये सॅक गाऊनलादेखील मागणी दिसून येत आहे. सॅक गाऊन हे महिला घरात अथवा गरोदर महिला वापरताना दिसून येतात. 17 व्या व 18 व्या शतकात हा गाऊन प्रकार फॉर्मल ड्रेस म्हणून वापरत असे. आता मात्र हे फिटेड, लॉंग फुल स्कर्टस् आणि लॉंग बॉक्स प्लीटेड पीस ऑफ फॅब्रिक या स्वरूपातदेखील उपलब्ध आहेत.
लेखिका फॅशन डिझायनर आहेत.




























































