लेख – कोरोनामुळे बदलणारे रोजगाराचे चित्र

658

>> कौस्तुभ सोनाळकर 

कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या सध्याच्या स्थितीत रोजगाराचे नियम आणि स्वरूप बदलेल. गेल्या दशकभरात ज्या पद्धतीने दिशाहीन आणि एकसुरी वाढ उद्योगजगात झाली ती स्थिती बदलून लवकरच बहुआयामी विकास या क्षेत्रात दिसून येईल. उद्योगजगतात नवीन संशोधन आणि बदल यांचा गेल्या काही आठवड्यांतील वेग लक्षणीय आहे. कोरोना महामारीच्या गडद काळोखात चंदेरी ‘संधीकिरणं दडलेली आहेत, जी संधीच्या शोधात अस्वस्थ असलेल्या तरुणांना, उद्योगजगताला एका नवीन दिशेने नेण्यास मदत करेल.  

सध्याच्या अनिश्चितता आणि गोंधळाच्या परिस्थितीत पदवीधर स्वत:च्या नोकरीचे पर्याय कसे निर्माण करू शकतात याबाबत  आपण विचार करणार आहोत. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे नोकर्‍या तसेच उद्योगव्यवसाय याबाबत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आता हळूहळू उद्योगव्यवसाय सुरू होत आहेत. तथापि अर्थचक्राला वेग येण्यासाठी अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल.  शिवाय कोरोनाचे साईडइफेक्टस् उद्योग जगतावरही पुढील काळात जाणवत राहणार आहेत. परिस्थिती सध्या बिकट असली तरी त्यातही तरुणवर्गाने रोजगाराची संधी शोधली पाहिजे. कोरोनाच्या काळोखात रोजगाराच्या अनेक संधी दडल्या आहेत. त्याचा शोध घेतला पाहिजे.

कोरोना महामारीमुळे झालेल्या अनपेक्षित बदलातून बाहेर पडण्यासाठी सर्वात आधी मन आणि मेंदू यांना आधी कार्यान्वीत केले पाहिजे. तरच संभाव्य नुकसान टळू शकेल. कोव्हिड -19 महामारीचा परिणाम कंपन्यांच्या एकंदरीत कामकाजावर झाला आहे तसाच तो कंपन्यांमध्ये होणार्‍या नोकरभरतीवरही झाला आहे. लाखो लोकांनी या काळात त्यांचे जॉब गमावले आहेत किंवा काहींना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात आले आहे. वेगवगळ्या कारणांनी नोकरी गमावलेल्या कंपन्या या बदलत्या काळात नवीन लोकांची भरती करीत आहेत. त्यादेखील नोकरभरतीच्या नवीन परिभाषा तयार करत आहेत. ज्यामध्ये कंपनीच्या भवितव्यासोबत कर्मचार्‍यांची सुरक्षितता आणि हिताचाही विचार करण्यात येणार आहे. तथापि कोरोनामुळे बदललेल्या वातावरणात आसपास नोकरी किंवा कामाच्या संधी ओळखणे आणि स्वत:साठी ती सुसंधीत परिर्वितत करणे हे पदवीधरांसाठी खरं आव्हान असेल. त्यासाठी सर्वप्रथम पदवीधरांना ‘व्हर्च्युअली’ (ऑनलाईन) उपलब्ध असणारे काम आणि इंटर्नशिपच्या (कार्यानुभव) संधी शोधाव्या लागतील. सध्या ‘घरातून काम’ हे कॉर्पोरेट जगतातील ‘न्यूनॉर्मल’ आहे.

एका वेगळ्या पद्धतीने विचार केला तर या तरुणांनी नवीन जगाशी जोडणारे कौशल्य शिकण्याची हीच वेळ आहे. ज्याने त्यांच्या रेझ्युमलादेखील थोडे वजन प्राप्त होईल. करिअर निवडताना भविष्याचं स्पष्ट चित्र डोळ्यासमोर असणे हेदेखील या काळात महत्त्वाचे झाले आहे. महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिास्थितीपुरताच नाही तर भविष्यात येणार्‍या अशा प्रकारच्या संकटांचा विचार करून तरुणांनी उद्योग-धंद्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. `मेक इन इंडिया’ प्रॉडक्टची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होईल. फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यापैकी कशात उडी घ्यायची याबाबत तरुणांनी आधीच सारासार विचार केला पाहिजे. कोरोना महामारीमध्ये प्रामुख्याने विस्तारित जाणार्‍या व्यवसायांपैकी एक आहे ई- लार्निंग आणि कोचिंग उद्योग. ज्यामध्ये नोकरीच्या संधीदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. आयुर्वेदासारखे काही विभाग आहेत ज्यातील रोजगाराच्या संधी कमी होणार नाहीत.

भविष्याचा पुर्निवचार करून तो नव्याने मांडण्यांची संधी या आपत्तीने तरुणांना दिली आहे. ज्या प्रक्रियेमध्ये पुढील काळात तग धरून ठेवण्यासाठी पूरक अशा अचूक स्थळाबरोबर वेळ आणि पैशाची योग्य बचत करणार्‍या नवीन कल्पना आणि टेक्नॉलॉजीचा समावेश असलेल्या उपायांचा स्वीकार करण्यासाठी कंपन्या तयार आहेत. `वर्क फ्रॉम होम’मुळे टेलिकम्युनिकेशन उद्योगांना अचानक उभारी मिळाली आहे. बाहेर पडून खरेदी करण्याचा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढत नाही तोपर्यंत डिजिटल पेमेंटच्या पद्धती आणि गेटवे यांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे. नोकरीच्या संधी असलेल्या नवीन क्षेत्रांमध्ये सायबर सिक्युरिटी आणि तरुणांना आर्किषत करणार्‍या ऑनलाईन गेम क्षेत्रांत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील.

या नवीन क्षितिजावर यशस्वी होण्यासाठी लागणारे नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा अत्यंत पूरक काळ आहे. सध्या तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्या अनुषंगाने नवीन डिजिटल कौशल्य किंवा नवीन सॉफ्टवेअर शिकून समजून घेतल्यास तुमच्या रेझ्युमेमध्ये त्याचा समावेश करता येईल. जर तुमच्या सध्याच्या नोकरीत डिजिटल कौशल्यांची आवश्यकता नसेल तर तुम्ही नेहमी उपयुक्त ठरणारं संवाद कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकता. याव्यतिरिक्त वैयक्तिक विकासासाठी कार्यक्रम आखून त्याचे पालन करू शकता. ज्याचा फायदा करिअराभिमुख रेझ्युमेमध्ये अशा वैयक्तिक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची निवड करणार्‍या व्यक्तींवर प्रभाव पडतो.

 सल्लागार, गुरू यांच्याबरोबर संवाद सुरू करा आणि त्या माध्यमातून व्हच्र्युअल नेटवर्किंग इव्हेंट्स आणि चॅटमध्ये सहभागी व्हा. तसेच संधीच्या शक्यतांची माहिती मिळवा. सोशल माध्यमांवर जर प्रोफेशनल ग्रुप्स जॉईन करत असाल तर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी मदत होईल. आंधळेपणाने कोणताही ग्रुप जॉईन करण्यापेक्षा चांगल्या संधींपर्यंत पोहोचवणारे किंवा त्याबाबत माहिती देणारे ग्रुप जॉईन करण्यावर भर द्या.

कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या सध्याच्या स्थितीत रोजगाराचे नियम आणि स्वरूप बदलेल. गेल्या दशकभरात ज्या पद्धतीने दिशाहीन आणि एकसुरी वाढ उद्योगजगात झाली ती स्थिती बदलून लवकरच बहुआयामी विकास या क्षेत्रात दिसून येईल. उद्योगजगतात नवीन संशोधन आणि बदल यांचा गेल्या काही आठवड्यांतील वेग लक्षणीय आहे. कोरोना महामारीच्या गडद काळोखात चंदेरी ‘संधी’किरणं दडलेली आहेत, जी संधीच्या शोधात अस्वस्थ असलेल्या तरुणांना, उद्योगजगताला एका नवीन दिशेने नेण्यास मदत करेल.

[email protected]

(लेखक एस्सार समूहाचे एचआर अध्यक्ष आणि एस्सार फाऊंडेशनचे पीईओ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या