ध्यास पर्यावरणाचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनघा सावंत

पर्यावरणाला विळखा घालणाऱया प्लॅस्टिकच्या भस्मासुराला रोखण्यासाठी ‘ध्यास फाऊंडेशन’ ही संस्था गेली सहा वर्षे अविरतपणे झटत आहे.

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून ‘ध्यास फाऊंडेशन’ची स्थापना झाली.

प्लॅस्टिकचा होणारा अमर्याद वापर यासंबंधी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार वसईच्या कीर्ती शेंडे यांच्या मनात आला. केवळ विचार करत न बसता त्वरित त्यांनी आपल्या काही समविचारी मित्रमैत्रिणींना एकत्रित करून 9 डिसेंबर 2017 रोजी वसई येथे या संस्थेची स्थापना केली.

कचरा निर्मिती आणि प्लॅस्टिकबद्दल लोकांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनात हळूहळू बदल घडवून आणण्यास सुरुवात करण्याचे आम्ही ठरवले. सर्वप्रथम सुक्या कचऱयाचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सर्वात पहिली ‘प्लॅस्टिकमुक्त वसई’ ही मोहीम आम्ही हाती घेतली. त्याअनुषंगाने येणारी स्वच्छता मोहीम, प्लॅस्टिक संकलन, वृक्षारोपण याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. घरोघरी तसेच चर्च, विविध संस्था, शाळा आणि महाविद्यालयांतून प्रबोधन केले. सध्या वसई येथे 20, तर विरार येथे 24 प्लॅस्टिक संकलन पेंद्रे आहेत. हीच आमच्या कामाची पोचपावती आहे, अशी माहिती संस्थेच्या खजिनदार सुरेखा कुळकर्णी यांनी दिली.

लँडफिल कचरा एकत्रितपणे कमी करणे, शहराचा कायापालट करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा वर्गीकरण आणि वाहतूक नियमांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि तरुण मनांना पर्यावरण शिस्तीचे प्रशिक्षण देणे अशी संस्थेची उद्दिष्टे आहेत.

संस्थेत 45 सभासद कार्यरत असून अध्यक्ष कीर्ती शेंडे, सचिव वासुदेव फलटणकर आणि खजिनदार सुरेखा कुळकर्णी संस्थेचा कार्यभार सांभाळत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांचा या कामात मोलाचा सहभाग आहे.

संस्थेचे उपक्रम प्रत्येक महिन्याला विविध प्रकारचे प्लॅस्टिक, ई-कचरा, टेट्रापॅक, थर्माकोल, पुठ्ठे इ. गोळा करणे आणि रिसायकल करणे (विरार, नालासोपारा येथे तिसऱया रविवारी आणि वसई येथे दर महिन्याच्या चौथ्या रविवारी).

वसईमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. पेपर कप, प्लॅस्टिक चमचे यांसारख्या डिस्पोजेबल वस्तूंचा वापर टाळण्यासाठी संस्थेने भाडय़ाने देण्यासाठी ‘स्टील प्लेट बँक’ विकसित केल्या आहेत.

याव्यतिरिक्त साडय़ा, पेपर, वह्या, मासिकांची रद्दी इत्यादी जमा करून त्यापासून बचत गटांकडून कापडी आणि कागदी पिशव्या बनवून घेऊन त्यांचेही वितरण संस्थेतर्फे केले जाते.

पालघरच्या ग्रामीण भागातील वंचित मुलांना संस्था पौष्टिक आहाराचे वितरण करते. संस्थेची ही कार्ये निश्चितच अनुकरणीय आणि काwतुकास्पद आहेत.

संस्थेचा आणखी एक उपक्रम म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर फळांच्या सालीपासून बनवलेले बायो-एंझाईम नैसर्गिक द्रव क्लीनर तयार करणे.

गणेशोत्सवात पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी फुले आणि इतर

प्लॅस्टिकच्या वस्तू वेगळ्या करणे. जुने बूट आणि पिशव्या यांसारख्या पुन्हा वापरता येण्याजोग्या वस्तूंचे संकलन करणे