उत्तेजकविरोधी व्याप्ती वाढविण्याची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल देवकाते

मुंबईचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि नाशिकची धावपटू संजीवनी जाधव उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याच्या दोन घटना अलीकडे घडल्या आहेत. अजाणतेपणामुळे हे दोघेही खेळाडू डोपिंगमध्ये दोषी सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्रीडाक्षेत्राला डोपिंगच्या विळख्यातून सोडविण्यासाठी उत्तेजकविरोधी चळवळीची व्याप्ती आणखी सशक्त करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील उत्तेजकविरोधी चळवळ किती मर्यदित राहिली आहे, हेच यातून स्पष्ट होते.

आपली कधीही डोपिंग टेस्ट होऊ शकते हे माहीत असूनही खेळाडू उत्तेजक का सेवन करतात? असा प्रश्न साहजिकच पडतो. याचे पहिले उत्तर आहे अजाणतेपणा. कारण सर्दी-खोकल्यासारख्या अनेक औषधांमध्ये उत्तेजक पदार्थांचा समावेश असतो आणि खेळाडू त्याबद्दल अनभिज्ञ असतात. दुसरे उत्तर आहे कामगिरी उंचावण्याच्या ईर्षेपोटी निवडलेला शॉर्टकट मार्ग. या दुसऱ्या प्रकारात प्रशिक्षक आणि पालकच खेळाडूला उत्तेजक सेवनासाठी प्रोत्साहित करत असतात. आणखी एक उत्तर आहे ते म्हणजे कटकारस्थान. कधी कधी कुरघोडी करण्यासाठी खेळाडूवर आहारातून किंवा औषधांच्या माध्यमातून डोपिंगमध्ये अडकवण्यासाठी ‘उत्तेजकप्रयोग’ केला जातो. मुंबईचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि नाशिकची धावपटू संजीवनी जाधव उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याच्या दोन घटना अलीकडे घडल्या आहेत. अजाणतेपणामुळे हे दोघेही खेळाडू डोपिंगमध्ये दोषी सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्रीडाक्षेत्राला डोपिंगच्या विळख्यातून सोडविण्यासाठी उत्तेजकविरोधी चळवळीची व्याप्ती आणखी सशक्त करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.

खोकल्यासाठी कफसिरप घेतल्याने पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी आढळला, तर आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यामुळे संजीवनी जाधव उत्तेजकांच्या कचाटय़ात सापडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये खेळाडू अनभिज्ञतेमुळे डोपिंगमध्ये अडकले हे सिद्ध झाले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील उत्तेजकविरोधी चळवळ किती मर्यदित राहिली आहे, हेच यातून स्पष्ट होते. स्वतःचा काहीही दोष नसताना पृथ्वी शॉ व संजीवनी जाधव यांच्यावर डोपिंगचा डाग लागलाय. या दोघांनाही आता नियमानुसार अनुक्रमे आठ महिने व दोन वर्षांच्या शिक्षेला सामोरे जावे लागत आहे.

उत्तेजक म्हणजे काय?
साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर नैसर्गिक क्षमतेला कृत्रिम पद्धतीने वाढविण्यासाठी जो पदार्थ किंवा औषध सेवन केले जाते त्याला उत्तेजक म्हणतात. खेळातील कौशल्य वाढविण्यासाठी इंजेक्शन, गोळ्या किंवा आहारातून उत्तेजके घेतली जातात. प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सरस ठरण्यासाठी या उत्तेजक सेवनाचा फायदा होत असतो.

उत्तेजक चाचणी कशी होते?
खेळाडूची प्रशिक्षण शिबिरात किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यापूर्की अचानक ही उत्तेजक चाचणी घेतली जाते. यात खेळाडूच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने घेतले जातात. तपासामध्ये यात उत्तेजक द्रव्ये आढळून आल्यास खेळाडूवर बंदी घातली जाते. त्यानंतर खेळाडू ‘ब’ चाचणीसाठी आव्हान देऊ शकतो, मात्र दुसऱ्या चाचणीतही पॉझिटिव्ह आढळल्यास खेळाडू स्पर्धेतून बाद केला जातो. विश्व डोपिंग संस्था (वाडा) आणि राष्ट्रीय डोपिंग संस्था (नाडा) यांच्याकडून खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेतली जाते.

मार्गदर्शक वर्ग बंधनकारक
मेक्सिको ऑलिम्पिक वेळी 1968मध्ये पहिल्यांदाच हिंदुस्थानात डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. दिल्लीच्या रेल्वे स्टेडियमकर कृपालसिंहने मैदान सोडून पळ काढला होता. त्याकेळी कृपालसिंहने नशा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डोपिंगची इतर प्रकरणे उघडी होत गेली. ‘वाडा’ आणि ‘नाडा’च्या उत्तेजक प्रतिबंधक शक्तिवर्धकाच्या यादीत इतक्या रासायनिक पदार्थांचा समावेश आहे की, यातील बऱ्याच घटकांबाबत डॉक्टरही अनभिज्ञ असतात. त्यामुळे खेळाडूंना याबाबत माहिती असणे शक्यच नाही. त्यामुळे खेळाडूंनी कोणत्याही गोष्टींचे सेवन करण्यापूर्की क्रीडावैद्यकतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. याचप्रमाणे उत्तेजकविरोधी चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही स्पर्धेच्या दरम्यान खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि संघटकांसाठी उत्तेजक पदार्थांसंदर्भात मार्गदर्शन वर्ग बंधनकारक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ऍथलेटिक्स स्पर्धेतून खेळाडूंनी काढला होता पळ
हिंदुस्थान ऍथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी उत्तेजक चाचणी संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या राज्य ऍथलेटिक्स स्पर्धेतून पुण्यातील काही खेळाडूंनी डोपिंगमध्ये सापडण्याच्या भीतीपोटी मैदानावरून पळ काढला होता. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय स्पर्धेत हे खेळाडू पहिल्या तीनमध्ये होते व राज्य स्पर्धेतही पदकाचे दावेदार होते. स्पर्धेतून ऐनवेळी खेळाडूंनी अमूक कारणामुळे माघार घेतली, अशा फायली रंगवून त्या बंदीही केल्या जातील. सांगायचा मुद्दा म्हणजे क्रीडाक्षेत्राला डोपिंगने किती मोठा विळखा घातला आहे यासाठी हे उदाहरण अतिशय बोलके आहे.

खेळाडूबरोबर प्रशिक्षकावरही कारवाई
खेळाडू जेव्हा डोपिंगमध्ये दोषी आढळतो, तेव्हा तो गोंधळून जातो. आपण कसे काय डोपिंगमध्ये सापडलो? हे त्यालाच कळत नाही. नकळत त्याच्याकडून ही चूक घडलेली असते व त्याला बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. मात्र खेळाडूपेक्षा त्याचे प्रशिक्षक या घटनेला अधिक जबाबदार असतात. प्रतिबंधित शक्तिवर्धके कोणती आहेत? याबद्दल प्रशिक्षकाला माहिती हवी. खेळाडू घडविताना प्रशिक्षकांनी त्यांना डोपिंग संदर्भात वेळोवेळी माहिती द्यायला हवी. आपला खेळाडू उत्तेजक सेवनात दोषी सापडणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचे कामही प्रशिक्षकाचे आहे. त्यामुळे यापुढे खेळाडू डोपिंगमध्ये सापडल्यास त्याच्याबरोबर त्याच्या प्रशिक्षकांवरही कारवाई होण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्रालयात हालचाली सुरू आहेत. क्रीडाखात्याचा हा प्रस्ताव स्वागतार्ह असून लवकरच त्याची अमंलबजावणी होण्याची गरज आहे.

[email protected]