आरोग्यदायी उपवास

>> शर्मिला कुलकर्णी

उद्या घटस्थापना. बरेच जण नवरात्रीचे उपवास आवर्जून करतात. प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत निराळी असते. सध्याच्या कोरोनाच्या संकटात सर्वांनी खाण्यापिण्याची काळजी अधिक घेणे आवश्यक आहे. म्हणूनच उपवास असले तरी योग्य आहारकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पौष्टिक खाण्याकडे कल असायला हवा. योग्य पोषक घटक नाही मिळाले तर रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, अशक्तपणा येतो आणि म्हणूनच आरोग्यदायी उपवास कसा करावा याबाबत काही टिप्सः

  • शरीराला उपयुक्त आणि आवश्यक जीवन घटक यांची गरज असते त्यामुळे आहारातून कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व आणि खनिजे मिळायला हवेत.
  • उपवास असला तरी न खाता पिता उपवास करणे अयोग्य आहे. त्याच बरोबर उपवासात काय खावे किती खावे याचेही भान ठेवणे गरजेचे आहे.
  • नवरात्रीच्या दिवसांत उपवासाला चालणाऱया पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात करावा.
  • व्यवस्थित खाल्ले नाही किंवा पौष्टिक आहार खाल्ला नाही तर अशक्तपणा, पोटाचे त्रास, ऍसिडिटी, अपचन, थकवा, चिडचिड, कलकल अशा इतर अनेक समस्या उद्भवताना दिसतात.
  • सात्विक आणि हलका आहार घेऊन मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्राणायाम, योगा, स्तोत्र पर्याय निवडावे.
  • उपवासाच्या दिवसांत पाण्याचा समावेश अधिक करावा, यामुळे शरीरात उत्साह राहतो आणि मरगळ भरत नाही.
  • योग्य वेळ आरामही करावा. यामुळे मन शांत राहते, थकवा दूर होतो आणि उपवास आरोग्यदायी ठरतो.
  • उपवासाला लागणाऱया साहित्याची तयारी वेळेवर आधीच करून ठेवल्यास रोजच्या रोज आरोग्यदायी फराळ करणे सोपे जाते.

    आपण कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उपवासही आरोग्याला झेपतील असे केले पाहिजेत. याबाबत अधिक माहिती रोजच्या सदरात जाणून घेऊयात.

आपली प्रतिक्रिया द्या