
>> वैश्विक, [email protected]
विश्वनिर्मितीच्या पहिल्या तीन मिनिटांतच त्याचं प्रसारण ज्या विलक्षण वेगाने झालं त्याची कल्पनाही करणं अशक्य. त्याच ‘काळा’त लक्षावधी दीर्घिकांची निर्मिती झाली. खरं तर अब्जावधी… आणि प्रत्येक दीर्घिकेत (गॅलॅक्सीमध्ये) सुमारे 100 ते 200 अब्ज तारे. त्यातले काही आपल्या सूर्यासारखे, काही त्याहून लहान, तर काही विराटाकार वाटणारे. परंतु एकूण विश्वाचाही ‘मर्यादित’ म्हणजे अवघ्या चार टक्के पसाऱ्यातलं हे सारं वैभव. त्यातलेच एक वैश्विक परिमाणात नगण्य, परंतु विश्वाचं आकलन होण्याची बुद्धी असलेले आपण. अर्थात ते आकलन करून घेण्याची इच्छा मात्र हवी. अनेकदा रोजची अगतिकता पिंवा अहंकारात आपण एवढे बुडालेले असतो की, विश्वाचा विचार कोण करतो? काही खगोल अभ्यासक मात्र तो नेमाने करतात. त्यात आमच्यासारखे अव्यावसायिक, परंतु खगोलीय उत्सुकता असणारे असतात. ‘त्या’ तीन मिनिटांत जे विश्व आकाराला आलं त्याविषयी स्टीव्हन वेइनबर्ग यांच्या ‘फर्स्ट थ्री मिनिट्स’ या पुस्तकात माहिती मिळते. गुगलवरून थोडा अंदाज घेता येतो. त्याच काळात आपली आकाशगंगा (मिल्की वे) निर्माण झाली. या सगळय़ाचं ‘वय’ 13.7 अब्ज वर्षे असं आज सांगितलं जातं. सखोल अभ्यासाने अधिक स्पष्ट पुरावे सापडले तर ते बदलू शकते. अशा बदलात आनंद मानतं ते विज्ञान. म्हणूनच ते स्थितीवादी नव्हे, तर प्रवाही असतं.
आपली आकाशगंगा निर्माण झाली त्याच वेळी किंवा ती निर्माण होत असतानाच ‘लार्ज मॅजेलॅनिक’ आणि ‘स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड’ नावाच्या दोन छोटय़ा दीर्घिकाही अस्तित्वात आल्या. याच त्या आकाशगंगेच्या जुळ्या बहिणी. एकूण बेरीज केली तर एका मोठ्या बहिणीच्या याही दोन जुळ्या. मात्र त्या परस्परांच्या जुळ्या नव्हेत. त्या आपल्या आकाशगंगेभोवती फिरतात एवढाच त्याचा अर्थ.
तसा आपल्या आकाशगंगेसह तिच्या शेजारणींचा एक गटही आहे. मॅड्रोमिड ट्रन्गुलम, मिल्की-वे आणि मॅजेलॅनिक क्लाऊड याचा अर्थ या एलएमसी आणि एसएमसी म्हणजे लार्ज आणि स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड नावाच्या आपल्या उपदीर्घिका या गटात चौथ्या क्रमांकावर येतात. यापैकी लार्ज मॅजेलॅनिक क्लाऊड ही आपल्या आकाशगंगेसारखीच ‘स्पायरल’ दीर्घिका. तिचे ‘आर्म’ आपल्या आकाशगंगेमुळे आणि लघू मॅजेलॅनिक क्लाऊडमुळे थोडे विस्कळीत झाले असं मानलं जातं. याचं निरीक्षण 964मध्ये पर्शियन (आताचा इराण) संशोधक शिटाली पिंवा अॅपॉझीने केलं होतं.
या दोघी ‘सॅटेलाईट’ दीर्घिका आपल्या दीर्घिकेपासून सुमारे 16 लाख प्रकाशवर्षे दूर आहेत. त्यांचं साद्यंत निरीक्षण 1519मध्ये फर्निनॅन्ड मॅजेलॅन यांनी केलं. त्यांना प्रथमतः स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड (एसएमसी) ही दीर्घिका सापडली. नंतर या दोन्ही दीर्घिकांना त्यांचेच नाव मिळाले. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील 28 अक्षांशावर म्हणजे आपल्या उत्तर गोलार्धाच्या तुलनेत विषुववृत्तापासून साधारण दिल्लीपर्यंतचे अंतर, दक्षिण गोलार्धात गेल्यावर जी जागा आहे ती. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामधील सॅन्ता फे शहर या अक्षांशावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा मध्यभाग येतो. तिथून या आपल्या आकाशगंगेच्या सॅटेलाईट दीर्घिका नेहमी स्पष्ट दिसतात. आमच्या खगोल मंडळाच्या स्थापनेच्या वेळी सुहास माडकर हे मरीन इंजिनीअर कार्यरत होते. पुढे त्यांना मर्चंट नेव्हीत संधी मिळाली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या टोकावरून बोटीच्या डेकवर उभं राहून लार्ज आणि स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड पाहिल्याचा विलक्षण आनंद झाला. तो त्यांनी पत्र पाठवून व्यक्त केला. आजही ते पत्र माझ्या संग्रही आहे. आपल्यापैकी कुणीतरी एलएमजी-एसएमजी पाहिल्याचं समाधान आम्हा सर्वांनाच वाटलं होतं. त्यानंतर आजचे अनेक सभासद या ना त्या कारणाने परदेशी, दक्षिण गोलार्धात गेले तेव्हा त्यांनीही या ‘जुळय़ा बहिणी’ पाहिल्या. लगेच त्यांचे पह्टो आणि वर्णन पाठवले. ते नवतंत्रज्ञानाच्या युगात क्षणात मिळालं, पण 1987मधलं ‘पत्र’ काही वेगळाच आनंद देणारं होतं. 2006मध्ये हबल दुर्बिणीने या दोन्ही दीर्घिका आपल्या आकाशगंगेभोवती वेगाने फिरत असल्याचं सांगितलं. 1986मध्ये चिली येथील दुर्बिणीला त्यात ‘सिफिड वेरिएबल’ तारेही सापडले. त्याविषयी पुढच्या एखाद्या लेखात.
आपल्या दीर्घिकेच्या या जुळय़ा बहिणींपैकी स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून दिसणाऱया कारंडव किंवा टय़ुकाना तारकासमूहात येतो. हे एका पक्ष्याचे नाव असून 1603 मध्ये जोहॅन बायरने ते दिले. मराठी नाव बाळशास्त्र्ााr जांभेकर यांनी दिले आहे. स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊडचा व्यास 210 प्रकाशवर्षे तर अंतर 15 हजार प्रकाशवर्षे असून आपल्यापासून ती दोन लाख प्रकाशवर्षे अंतरावर आहे. लार्ज मॅजेलॅनिक क्लाऊड डॉरॅडो म्हणजे असिदंष्ट्र आणि मेन्सा पिंवा त्रिकूट या तारकासमूहात असून त्याचे कन्याकुमारी येथून दर्शन होते.





























































