
>> मेधा पालकर
रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. त्यांचे निधन सर्वांनाच चटका लावून गेले. कीर्ती शिलेदार यांचा जन्म 16 ऑगस्ट 1952 रोजी झाला. अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाटय़ संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहील अशी कामगिरी त्यांनी केली.
अभोगी (गगनगंधा), एकच प्याला (सिंधू), कान्होपात्रा (कान्होपात्रा), द्रौपदी (द्रौपदी), भेटता प्रिया (महाश्वेता), मंदोदरी (मंदोदरी), मानापमान(भामिनी), मृच्छकटिक (वसंतसेना), ययाती आणि देवयानी (शर्मिष्ठा), रंगात रंगला श्रीरंग (माधवी), रामराज्यवियोग (मंथरा), रूपमती (रूपमती), विद्याहरण (देवयानी) शाकुंतल (शकुंतला), शारदा (शारदा), श्रीरंग प्रेमभंग (राधा), संशयकल्लोळ (रेवती), सौभद्र (कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा), स्वयंवर (रुक्मिणी), स्वरसम्राज्ञी (मैनाराणी) ही काही त्यांची गाजलेली नाटके आणि त्यातील काही भूमिका रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत. अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी), एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर), एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी), कशी केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी), दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला), नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर), नाही मी बोलत (संगीत एकच प्याला), नृपकन्या तव जाया (संगीत स्वयंवर), पांडवा सम्राट पदाला (संगीत द्रौपदी), पावना वामना या मना (संगीत सौभद्र), पाही सदा मी (संगीत मानापमान), बलमा आये रंगिले (संगीत स्वरसम्राज्ञी), भक्ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग), मम सुखाची ठेव (संगीत स्वयंवर), येतील कधी यदुवीर, रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी), लाजविले वैऱयांना (संगीत द्रौपदी), सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग), हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग) ही त्यांची ध्वनिमुद्रित झालेली नाटय़गीते आणि त्या नाटकांची नावे आहेत. कीर्ती शिलेदार यांना 2014 सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार तसेच दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्र्ााrय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे या हेतूने त्यांनी ‘स्वर ताल शब्द संगती’ या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्र्ााrय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकलं. त्यांचं शास्त्र्ााrय संगीताचं उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झालं. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेची पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर चार हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. ‘संगीत कान्होपात्रा’सह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्र्ााrय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्णयुगाची आठवण यावी, अशा एकरूपतेनं कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीतं रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हाच त्यांच्या आईवडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आईवडिलांचा संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थानं बिनीच्या शिलेदार होत्या. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्टय़पूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्तानं हिंदुस्थानभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. विदेशात त्यांनी शास्त्र्ााrय आणि उपशास्त्र्ााrय संगीताच्या मैफली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्यानं त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केलं होतं. ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.





























































