मुस्लिम खाटीक समाजाने विचारांची दिशा बदलावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सादिक खाटीक

मुस्लिम मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे आणि मुलींनाही तितकेच चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तरच ते आपल्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून राहणार नाहीत. जगण्याची प्रत्येक कला ते आत्मसात करतील. सर्वसामान्य मुस्लिम समाजाने एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगत करण्याची गरज आहे. याचा विचार समाजातील सर्व स्तरांतून तारतम्याने होईल अशी अपेक्षा बाळगतो. मुस्लिम खाटीक समाजाने विचारांची दिशा बदलली तर त्यांची आज जी दशा आहे ती निश्चितपणे बदलू शकेल.

मुस्लिम खाटीक हा महाराष्ट्रातील आणि देशातील एक पिचलेला समाज आहे. आज मुस्लिम खाटीक समाजात हुंडा देण्याची स्थिती नसल्याने मुलींचे खोळंबलेले विवाह, किरकोळ गैरसमजातून योग्य तोडगा न काढल्याने होणारे घटस्पह्ट यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. लग्न समारंभावरील खर्च आणि हुंडय़ाचे सावट खाटीक कुटुंबातील कर्त्या पुरुषासाठी अवघड आव्हान ठरू लागले आहे. समाजातील मूठभर लोकांना, तेही मोठय़ा शहरात मोठे व्यवहार करतात म्हणून रक्कम साठवून थोडेसे श्रीमंतीत जगता आले म्हणजे सारा समाज श्रीमंत झाला असे होत नाही. पण त्या अल्पशा श्रीमंत व्यक्तीने केलेला सण – समारंभाचा खर्च पाहून गावोगावचे समाजबांधव बिथरतात. आपल्या मुलांचे असेच लग्न झाले पाहिजे. मोठा हुंडा मिळाला पाहिजे यासाठी ते आग्रही असतात. मुलींचे लग्न करणे हेच मोठे आव्हान असलेला पिता आणि त्याचे कुटुंब या दबावाला बळी पडते आणि त्यांच्या हाल-अपेष्टांत अधिक भर पडते हे सामाजिक वास्तव आता शांतपणे समजून घ्यायची वेळ आली आहे. बऱयाच कुटुंबांत असे का होते त्याची कारणे ही वर दिल्याप्रमाणे आहेत. समाज त्यावर विचार करेल, पण कृती करायची ती प्रत्येक व्यक्तीलाच आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्री-पुरुषाने आपल्या मुला-मुलीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे जोडीदार स्वीकारले आणि आर्थिक प्रश्न लक्षात घेऊन विवाहांचे स्वरूप बदलले, हुंडा प्रथा संपविली तर प्रत्येक मुस्लिम खाटीक व्यक्ती स्वतःबरोबर आणखी एका मुस्लिम खाटीक परिवाराचे कल्याण करू शकेल.

अशीच परिस्थिती असणारे मुस्लिम समाजातले मुल्ला- मुलाणी, शेख, सय्यद, पठाण, मोगल, आतार, तांबोळी, बागवान, नदाफ, पिंजारी, शिकलगार, कळवात, फकीर, मेहतर, दरवेशी, काझी वगैरे जातींच्या उतरंडीतले सर्व समाज घटक अशा जातींमध्ये परस्पर बेटी व्यवहार होऊ लागले तर प्रत्येकाला खऱया अर्थाने समाजाच्या विस्तारास आणि स्वतःला आधार मिळविण्यास किंवा दुसऱयांचे आधार बनण्याचीही संधी मिळेल. एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेल्याशिवाय सर्वच मुस्लिम जातींना आता पर्याय राहिलेला नाही.

न्यायमूर्ती राजेंद्रसिंह सच्चर यांच्या नेतृत्वाखालील सच्चर आयोगाने देशातील सर्वच मुस्लिम समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्टय़ा किती रसातळाला पोहोचला आहे याच्या गंभीर नोंदी केल्या आहेत. ज्या समाजात एपीजे अब्दुल कलाम, मौलाना अबुल कलाम आझाद जन्माला आले, त्या समाजाची आजची अवस्था अशी होण्यामागे फक्त अन् फक्त शिक्षणाचा अभाव आणि चुकीच्या रूढी-परंपरा जपण्याचा हट्टाग्रह आहे. सच्चर आयोगाने जेव्हा मुस्लिम समाजातील स्त्र्ायांच्या मुलाखती घेतल्या आणि सरकारकडून तुम्हाला काय पाहिजे असे विचारले तेव्हा घराघरातील त्या महिलांनी एकच उत्तर दिले, ‘‘हमारे बेटी-बच्चों को अच्छी तालीम मिलनी चाहीए.’’ महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या शिष्या फातिमा शेख यांनी आपल्यासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले दांपत्य, फातिमा शेख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज इत्यादी महामानवांचे, त्यांच्या आदर्शाचे, विचारांचे आपण आपल्या सभा, समारंभात तरी स्मरण करतो का याचाही साकल्याने विचार झाला पाहिजे.

मी मांडतो ते प्रश्न आणि विचार बंडखोर नाहीत. जेवण्यापूर्वी आसपास कोणी उपाशी तर नाही ना हे पाहून त्यांच्या पोटाची सोय केल्याशिवाय तुम्ही जेवू नका असे सांगणाऱया प्रेषितांच्या विचारांशी माझे नाते आहे. माझ्या समाजातील एक धाडसी, अत्यंत हुशार मुलगी अफशा फारूक पुरेशी ही चांगले शिक्षण मिळाले म्हणून हिंदुस्थानी मुस्लिम समाजातील पहिली विमान पायलट बनली आहे याचा मला अभिमान आहे. आपल्या मुलींवर शैक्षणिक सोपस्कारांची जबाबदारी सोपविण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याची अपेक्षा मी व्यक्त करतो.

मुस्लिम मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे आणि मुलींनाही तितकेच चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तरच ते आपल्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून राहणार नाहीत. जगण्याची प्रत्येक कला ते आत्मसात करतील. वस्त्र्ाकलेबद्दल, चित्रकलेबद्दल, शेरोशायरी, साहित्य निर्मितीबद्दल, रेशमाच्या तलम धाग्याच्या निर्मितीपासून सोनेजडीत वस्त्र्ानिर्मितीबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानी मुस्लिम समाज प्रसिद्ध होता. कुंभारकामापासून विणकामापर्यंत प्रत्येक कला आणि व्यवसायात तो पारंगत होता. आज त्या कलांना जगात किंमत आली आहे, पण स्वातंत्र्यपूर्व काळात दारिद्रय़ात राहूनही ज्यांनी ही श्रीमंत कला जिवंत ठेवली, त्यांच्या आजच्या वंशजांना, अगदी जगाला गवसणी घालेल असे आधुनिक शिक्षण देऊन याच कलेतून आर्थिकदृष्टय़ा उन्नत बनविणे शक्य आहे. पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱया मुली, महिला यांच्या कारागीरीला वाव देण्याची गरज आहे. मार्पेटिंगची तंत्रे शिकवून त्यांच्या पंपन्या उभ्या करण्यासाठी साथ देण्याची गरज आहे.
ज्या आत्मीयतेने आपण मशिदी, दर्गे उभारण्यासाठी पैसा उभा करतो तसाच पैसा शाळा, कॉलेज, अभ्यासिका, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे उभारण्यासाठी खर्च केला पाहिजे. मुस्लिम समाजात एक मोठा गुण आहे. मृताच्या जनाजाला खांदा देणे. हातातले कामधंदे सोडून पळून पळून खांदा देणारे बांधव सर्वत्र मोठय़ा संख्येने आढळतील आणि आपण त्याला पुण्य मानतो, पण आज वास्तवात सर्वसामान्य मुस्लिम समाजाने एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगत करण्याची गरज आहे. याचा विचार समाजातील सर्व स्तरांतून तारतम्याने होईल अशी अपेक्षा बाळगतो. मुस्लिम खाटिक समाजाने विचारांची दिशा बदलली तर त्यांची आज जी दशा आहे ती निश्चितपणे बदलू शकेल.