भविष्यातील ग्रंथपाल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स

627

सध्या जगभरातील सर्वच क्षेत्रांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक कामे सोपी करणे आणि विविध शोधांत या ‘एआय’चा वापर करून घेणे हे नित्याचेच झाले आहे. आता लायब्ररीसारख्या ठिकाणीदेखील या आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून ग्रंथपालांचे काम अधिक सुकर करणे आणि मुख्य म्हणजे अनेक ऐतिहासिक आणि दुर्मिळ फोटोंचा सहजपणे शोध घेणे आणि त्यांचे जतन करणे शक्य होणार आहे. लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील संगणक शास्त्रज्ञ सध्या मशीन लर्निंगचा उपयोग करून डिजिटल वृत्तपत्र संग्रहणामधून ऐतिहासिक प्रतिमा (फोटो) वेगळ्या करण्याचा प्रयोग राबवत आहेत. या प्रयोगाला NEWSPAPER NAVIGATOR असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पात हस्तलिखित किंवा टेक्स्ट बेस अक्षरांचे शोधण्यायोग्य दस्तऐवजात रुपांतरित करण्यासाठी ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन अल्गोरिदमचा वापर केला जातो. मशीन लर्निंगची ही प्रक्रिया स्वयंचलित आहे. वॉशिंग्टन डीसीमधील लायब्ररी ऑफ काँग्रेसद्वारे हा प्रयोग सुरू आहे. वर्तमानपत्रातून ऐतिहासिक प्रतिमा शोधून वेगळ्या काढण्यासाठी संशोधक विशेष अल्गोरिदम वापरत आहेत. डिजिटल स्कॅनद्वारे हे आधीपासूनच करता येणे शक्य होते. मात्र आता हे नवे अल्गोरिदम दुर्मिळ व ऐतिहासिक प्रतिमांचे विश्लेषण, कॅटलॉग आणि संग्रहणदेखील करणे सहज शक्य होणार आहे. याद्वारे सोप्या शोधात प्रतिमा शोधू शकणाऱया तब्बल 16 दशलक्ष वृत्तपत्र पृ…ांचा एक विशाल डेटाबेस तयार केला जाणार आहे. लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये नवनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले बेन ली आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करणारे पदवीधर विद्यार्थी या न्यूजपेपर नेव्हीगेटर प्रयोगावर काम करत आहेत. या प्रयोगाचे डेटासेट ‘ण्प्rदहग्म्त्ग्हु Aसग्म्a’ नावाच्या एका विद्यमान प्रोजेक्टमधून आले आहे. ‘chronicaling america’ प्रोजेक्टमध्ये 1789 ते 1963 यादरम्यानच्या वर्तमानपत्रांना डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवण्यात आले आहे. या प्रयोगात एकूण 16,358,041 वृत्तपत्र पृष्ठ तपासण्यासाठी या प्रणालीला सुमारे 19 दिवसांचा वेळ लागला. त्यापैकी केवळ 383 पृष्ठांवर ही प्रक्रिया राबवण्यात प्रणाली अयशस्वी ठरली.
– स्पायडरमॅन

आपली प्रतिक्रिया द्या