लेख – साथीचा आजार नव्हे; जैविक युद्ध!

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन   

कोरोना साथीचा आजार नसून जैविक युद्धआहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने जलदगतीने संसर्गाने पसरणाऱया व्हायरसचा वापर केला आहे. ‘जैविक युद्धहे अणुयुद्धापेक्षाही घातक आहे. यामुळे राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळला आहे. हे महायुद्ध अजून अनेक वर्षे चालेल. ते तुमच्याआमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले आहे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. युद्धतंत्र बदलत आहे. यापुढे रात्रच नाही, तर दिवसही वैऱयाचा आहे.

हिंदुस्थानात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा प्रकारची लाट किंवा देशाचे होणारे नुकसान शंभर वर्षांतून फक्त एकदाच होते. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात आतापर्यंत आलेले हे सर्वात मोठे बायलॉजिकल किंवा जैविक महासंकट आहे. ही चायनीज व्हायरसची लाट आपोआप आली की चीनमुळे आली, याविषयी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ञ चर्चा करत आहेत. हे स्पष्ट आहे की, मागच्या वर्षी ज्या वेळेला चिनी व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान प्रांतामधून झाली होती. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ हे चीनच्या हाताखाली काम करणारं मांजर आहे. त्यांनी हे सगळ्या जगापासून लपवून ठेवलं.

आता आलेली दुसरी लाट ही हिंदुस्थानात आलेली आहे. सर्वांना चकित करणारी बाब ही आहे की, चिनी व्हायरस हिंदुस्थानी उपखंडाच्या इतर देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भुतानमध्ये पसरला नाही. हे सगळे देश त्यांची जमीन, भौगोलिक स्थिती, हवामान, वातावरण अगदी हिंदुस्थानप्रमाणेच आहे. परंतु ते देश सुरक्षित राहिले आणि परिणाम हा फक्त हिंदुस्थानवर कसा झाला?

चिनी व्हायरसमध्ये जनुकीय बदल (Virus mutation) होत आहेत. परंतु त्यामुळे व्हायरस कमजोर व्हायच्या ऐवजी त्याचे झालेले दुसरे, तिसरे जनुकीय बदल हे पहिल्या व्हायरसपेक्षा जास्त ताकदवान आहेत. जनुकीय बदल झालेला व्हायरस हा पहिल्या व्हायरसपेक्षा कमी ताकदवान असतो. यामुळे शंका येते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून चीनकडून कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल केले जात आहेत का? मागच्या दशकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅम बनवणारे सायंटिस्ट हे अल्गोरिदम तयार करायचे आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी दिलेल्या अल्गोरिदमप्रमाणे काम करायचे. आता मशीन लार्ंनग नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. यात मशीन स्वतःहून शिकत असते. एकदा का आपण मशीनला ही परवानगी दिली, एक काम दिले तर ते सुपरव्हिजनशिवाय आपली बुद्धी वापरून आपले काम करू शकते. मशीन स्वतःहून शिकत असते. चिनी व्हायरस ज्या वेळेला व्हॅक्सीन घेतलेल्यांना किंवा तरुणांना भेटतो त्या वेळेला यात नक्कीच जनुकीय बदल हे होतात. परंतु आता हा व्हायरस एक प्रोग्रॅम केल्याप्रमाणे मशीन लार्ंनगमुळे स्वतःहून विचार करून ताकदवान होत आहे. यामागे चीनचा हात आहे असे अनेक शास्त्र्ाज्ञांचे म्हणणे आहे.

परंतु एवढे नक्की की, जनुकीय बदल हा प्रकार अमानवीय आहे. जगातल्या शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या विषयावर संशोधन करायला परवानगी असते. परंतु संशोधन असे असावे ज्यामुळे मानव जातीला फायदा होईल आणि रोगांना समोर जायची ताकद वाढेल. पण चीन चांगले संशोधन करायच्या ऐवजी आपले लक्ष मानव जातीला धोका असलेल्या संशोधनावरती केंद्रित करत आहे. कारण त्यांना हे संशोधन जगाच्या विरुद्ध एक मोठे शस्त्र म्हणून वापरायचे आहे.

चीनशी पुष्कळ वाटाघाटी केल्यानंतर ज्या वेळेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे शास्त्रज्ञ चीनमध्ये गेले, मात्र त्यांना चीनकडून कुठलीही माहिती पुरवण्यात आली नाही. म्हणजेच त्यांची भेट पूर्णपणे वाया गेली. एक ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ या टीमचा भाग होता आणि त्याने महत्त्वाची माहिती जगाच्या मीडियाकडे पोहोचवली आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हायरस नव्हेंबरपासून चीनमध्ये पसरत होता, परंतु जगापासून ही माहिती लपवण्यात आली. एवढेच नव्हे तर चीनने हा व्हायरस पसरू नये म्हणून चीनमध्ये देशाच्या आतली विमानसेवा पूर्णपणे बंद केली. मात्र त्याच वेळेला लाखो चिनी जगभरामध्ये काम, शिक्षण, टुरिस्ट आणि इतर कारणांमुळे जाऊन हा व्हायरस पसरवत होते. म्हणजेच चीनने देशाच्या आतली विमानसेवा बंद केली मात्र आंतरदेशीय सेवा वाढवली आणि व्हायरसचा प्रसार केला.

कोरोनावर मात करण्यात अपयश येत असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शोधकर्त्यांच्या एका टीमने दावा केला आहे की, चीनच्या वुहानमध्ये सध्याच्या कोरोनापेक्षाही धोकादायक करोना व्हायरस सापडला आहे. चीन पुन्हा एकदा जगाला अडचणीत आणू शकतो. हा व्हायरस जास्त धोकादायक असू शकतो. शास्त्रज्ञांनी म्हटले की, चीनच्या वुहान आणि अन्य शहरातील कृषी प्रयोगशाळेत (Agricultural Labs) व्यक्तींना नुकसान पोहोचवणारे अनेक धोकादायक व्हायरस उपलब्ध आहेत. जर याला सुरक्षितपणे कंट्रोल केले गेले नाही तर संपूर्ण जगाला अडचणीत आणले जाऊ शकते. वेगाने पसरणाऱया या करोनाच्या प्रादुर्भावामागे विषाणूचे दुहेरी म्युटेशन (दुहेरी जनुकीय बदल) कारण आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत हिंदुस्थानात चिनी व्हायरसवर पूर्णपणे विजय मिळवण्यात आला होता आणि देशाचे लक्ष हे व्हॅक्सीन डिप्लोमसी आणि आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यावर केंद्रित होते. परंतु अचानक पुढच्या एक महिन्यात सगळेच उलटे झाले. अचानक कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आणि सध्याची परिस्थिती आणीबाणीची आहे. आता हिंदुस्थान व्हॅक्सीन निर्यात करायच्या ऐवजी आयात करत आहे. मात्र या कठीण समयी युरोप आणि अमेरिका हिंदुस्थानला मदत करायला तयार नव्हते. उलट अमेरिकेतल्या फार्मा कंपनी म्हणत होत्या की, व्हॅक्सीन फॉर्म्युला हिंदुस्थानबरोबर शेअर केला जाऊ नये. हिंदुस्थानने जगाची फार्मसी बनू नये, म्हणून युरोप आणि अमेरिकेने व्हॅक्सीन तयार करण्याकरता लागणाऱया कच्च्या मालावर बंदी घातली. कारण आर्थिक होते. या फार्मा कंपनीचा सहा अब्ज डॉलरचा व्यापार हिंदुस्थानातल्या कंपन्यांनी हस्तगत केला होता. स्मशानभूमीची चित्रे हजारो रुपयांना विकण्याकरिता इंटरनेटवर ठेवण्यात आली. हिंदुस्थानातल्या चिनी हस्तकांनी मदत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानला बदनाम करण्याचा भयंकर प्रयत्न केला. आता अमेरिका आणि युरोपियन देशांनी हिंदुस्थानला मदत करणे सुरू केले आहे.

कोरोना साथीचा आजार नसून ‘जैविक युद्ध’ आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने जलदगतीने संसर्गाने पसरणारा व्हायरसचा वापर केला आहे. ‘जैविक युद्ध’ हे अणुयुद्धापेक्षाही घातक आहे. यामुळे राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळला आहे. हे महायुद्ध अजून अनेक वर्षे चालेल. ते तुमच्या-आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले आहे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. युद्धतंत्र बदलत आहे. यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱयाचा आहे. त्यामुळे यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱया कठीण प्रसंगांना एक नागरिक, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो यावरच आपल्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या