
>> प्रसाद कुळकर्णी
कौतुक करताना, मुलांचे हट्ट पुरवताना पालकांनी त्यांच्यावर आपल्या सुसंस्कारित वागणुकीमधून संस्कार करत त्यांच्या आयुष्याची घडण सुंदर करणं गरजेचं आहे. वाचन, मनन आणि वैचारिक मंथन या साऱयातूनच एक सुसंस्कारित नागरिक आणि अशा नागरिकांतून एक स्बुद्ध, सुजाण आणि सुयोग्य समाज घडणार आहे. दोन दिवसांनी (27 जुलै) होणाऱया राष्ट्रीय पालक दिनी प्रत्येक पालकाने याचा विचार करण्याची गरज आहे.
आजच्या पिढीचं वाचन कमी झालंय किंवा आज मुलं वाचतच नाहीत, वाचाल तर वाचाल याचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मोबाईलच्या अधीन ही पिढी होत चाललीय अशी हाकाटी सर्वत्र सुरू असते, परंतु याला सर्वस्वी फक्त ही पिढीच जबाबदार आहे का? तर माझ्या मते नाही. आज मुलांच्याही आणि बऱयाचशा त्यांच्या पालकांच्याही आवडी, अग्रक्रम बदलले आहेत. आपल्या मुलांना वाचन संस्कृतचे धडे देण्यात पालक आणि काही प्रमाणात शाळाही कमी पडतायत. मुलांचा अभ्यासक्रमच इतक्या गोष्टींनी भरलेला असतो की, त्यामधून डोकं वर काढून अवांतर वाचनासाठी त्यांना वेळच मिळत नाही आणि मिळालाच तर त्यासाठी त्यांना कुणी प्रोत्साहितही करत नाही.
मोबाईल किंवा अगदी कोणतंही ‘गॅजेट’ संपूर्णपणे वाईट नसतंच, पण त्यामधलं जे चांगलं आहे ते मी घेणार आहे का? मोबाईल उघडताच अनेक गोष्टी क्षणभरात तुमच्या समोर उघडय़ा होतात. आज मुलांचे आईवडील दोघंही दिवसभर घराबाहेर असतात आणि आपल्या पाल्याशी संपर्प साधायला (वेळ मिळालाच तर) मोबाईलशिवाय पर्याय नसतो. बरं, तो फक्त संपर्प साधण्यापुरता नसतो, तर अत्यंत आधुनिक दर्जाचा मोबाईल त्याच्या हातात दिलेला असतो. आजची पिढी निश्चितच हुशार आहे, त्यांची आकलन शक्ती अफाट आहे. ही ‘गॅजेटस्’ आपलीशी करायला त्यांना फार वेळ लागत नाही. आपल्या मुलांचं काैतुक करायलाच हवं, परंतु मोबाईलवर खेळण्यापेक्षा खऱ्याखुऱ्या शस्त्रांनी सीमेवर आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्याची वर्णनात्मक माहिती असलेली पुस्तकं त्यांना द्यायला हवी, स्वसंरक्षण, प्रतिकारासाठी शस्त्र उचलणं आणि शस्त्रांचा निरागस जनतेवर होणारा अनिर्बंध वापर आणि त्याचा धाक यातला फरक त्यांना कळायला हवा. लहानपणापासून त्यांना हे जग अनेक सुंदर, आनंददायी गोष्टींनी भरलेलं आहे तसंच अनेक दुःख, वेदनांनीसुद्धा भरलेलं आहे याची जाणीव व्हायला हवी. पैसा हे सर्वस्व नसून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग वंचितांसाठी यथाशक्ती करणं हे आपण माणूस असल्याचं द्योतक आहे हेही त्यांना समजून सांगायला हवंय. यासाठी पालकांनी स्वतःची समज वाढवणं, आणि आपली प्रगल्भता वाचनातून मोठी करणं याची आज अत्यंत गरज आहे.
स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी यात कुणी डावं-उजवं नसतं. या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज अक्षरशः प्रत्येक क्षेत्र आपल्या हुशारीने काबीज करणाऱया स्त्रियांनी, मग ते शिक्षण, क्रीडा, कला, संशोधन, साहस, संरक्षण किंवा आणखी कोणतंही असो. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसठशीत ठसा उमटवला आहे याचीही जाणीव मुलांना लहानपणापासून पालकांनी करून द्यायला हवी. कोणतंही काम लहान नसतं. घरातलं प्रत्येक काम हे मुलगा, मुलगी या दोघांनाही यायला हवं हे त्यांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. तरच पुढे जाऊन पुरुषप्रधान संस्पृती, स्त्राr स्वातंत्र्य या गोष्टी संपुष्टात येतील. कारण त्या वेळी स्त्राr, पुरुष दोघंही समान पातळीवर राहून एकमेकांना समजून घेत असतील.
आपल्या मुलांच्या जन्मदिनी एखाद्या मोठय़ा हॉटेलमध्ये किंवा वातानुकूलित हॉलमध्ये भरपूर पैसा खर्च करून, महागडा केक कापून, उधळपट्टी करण्यापेक्षा आपल्या पाल्याला या भेटींसोबत काही पुस्तकंही द्या. येणाऱया त्याच्या मित्रांना रिटर्न गिफ्ट म्हणूनही एखादं पुस्तक द्या. यासाठी त्यांच्या आई- वडिलांनाही यामध्ये सामील करून घ्या. सुरुवातीला मुलं नाक मुरडतील, पण पुढे कदाचित काही चांगलं, सकारात्मक हाती लागू शकेल. हे सगळं आज आम्हाला पटत नाही, रुचत नाही आणि पुढे मुलं मोठी झाल्यावर आपण त्यांच्याच नावाने शंख करत सुटतो. त्या वेळी हा विचारही मनात येत नाही की, कुठेतरी या सगळ्याला आपणही जबाबदार आहोत. कौतुक करताना, मुलांचे हट्ट पुरवताना पालकांनी त्यांच्यावर आपल्या सुसंस्कारित वागणुकीमधून संस्कार करत त्यांच्या आयुष्याची घडण सुंदर करणं गरजेचं आहे.
आज शाळांना सुट्टी लागली की, अनेक शिबिरांचं पीक येत असतं. यामधलंच एक क्रिकेट शिबीर आणि त्यामध्ये लगोलग आपल्या मुलाला दाखल करणारे त्याचे पालक. सगळ्यांनाच सचिन – विराट – धोनी – द्रविड यांच्यासारखं क्रिकेट खेळायचं असतं. त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच ही मुलं शिबिरात दाखल होतात, पण जेव्हा सुरुवातीला त्यांना शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बेसिक व्यायामाचे प्रकार शिकवायला सुरुवात केली जाते तेव्हा त्याचा मुलांना कंटाळा येऊ लागतो. त्यांना एकदम हातात बॅट हवी असते. मग घरी गेल्यावर मुलं आपल्या पालकांकडे तक्रार करतात की, शिबिरात क्रिकेट शिकवत नाहीत, फक्त व्यायामाचे प्रकार करून घेतात, धावायला लावतात, पण हे असंच असतं हे किती पालक त्यांना समजावून सांगतात? आपल्या आयडॉलसारखं बनण्याची स्वप्न पाहणं यामध्ये चुकीचं काहीच नाही, परंतु त्या उंचीवर पोहोचण्यासाठी त्या खेळाडूंनी किती मेहनत घेतली होती हे जाणून घेणं, त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमधून हे समजून घेणं, आपल्याला ज्या खेळात रुची आहे असं वाटतं, त्या खेळाबद्दल पुस्तकांमधून समग्र माहिती घेणं हे फार महत्त्वाचं असतं. यासाठी पालकांनी आपल्या मुलाला मदत करायला हवी आणि सत्य परिस्थितीची जाण त्यांना करून द्यायला हवी. अर्थात हे अगदी कोणत्याही क्षेत्रासाठी, म्हणजे गायन, नृत्य, अभिनय, क्रीडा अथवा इतर काही या प्रत्येक क्षेत्रासाठी लागू होतं. आपल्या पाल्याने तोंडातून इच्छा व्यक्त करताच ती पूर्ण करणे यात आपली इतिकर्तव्यता आहे, ही भूमिका आधी पालकांनी बदलायला हवी. आपल्या पाल्याची पुवत जाणून घेऊन त्याला आवड असलेल्या तसंच इतरही क्षेत्रांची पायाभूत माहिती त्याला द्यायला हवी. थोडक्यात काय, तर वाचन, मनन आणि वैचारिक मंथन या साऱ्यातूनच एक सुसंस्कारित नागरिक आणि अशा नागरिकांतून एक स्बुद्ध, सुजाण आणि सुयोग्य समाज घडणार आहे. दोन दिवसांनी (27 जुलै) होणाऱया राष्ट्रीय पालक दिनी प्रत्येक पालकाने याचा विचार करण्याची गरज आहे.