ठसा – राम खांडेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनिल साखरे

यथा चतुर्भिः कनपं परीक्ष्यते।
नीघर्षणच्छेदन ताप ताडनैः।।
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते।
त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।

या संस्पृत वचनानुसार राम खांडेकर हे विद्या, स्वभाव, गुण आणि कर्म या गोष्टींवर अगदी खरे उतरलेले होते. त्यामुळेच मुंबईच्या मंत्रालयातील एक स्टेनोग्राफर ते माजी पंतप्रधान स्वर्गीय नरसिंह राव यांचे खासगी सचिव एवढा मोठा प्रवास त्यांना शक्य झाला. जवळपास पाच दशके ते सरकार आणि प्रशासन यातील महत्त्वाचा दुवा राहिले. 1962 सालच्या हिंदुस्थान-चीन युद्धामध्ये हिमालयाच्या मदतीला जेव्हा सह्याद्रीने धाव घेतली, म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्यावर पेंद्रात संरक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली त्यावेळी यशवंतराव राम खांडेकरांना दिल्लीला घेऊन गेले. खांडेकरांची सचोटी, प्रामाणिकपणा, चिकाटी, कामावरील निष्ठा आणि झोपून देऊन काम करण्याची पद्धत, शिवाय व्यापक जनसंपर्प, कार्यक्षमता बघून अगदी यशवंतरावांपासून तर मोहन धारिया, वसंत साठे, पुढे मग पंतप्रधान नरसिंह राव अशा वरिष्ठ सत्ताधाऱयांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी उत्पृष्ट काम केले. खरे तर अशा वेगवेगळ्या वृत्तीच्या, भिन्न विचारसरणीच्या आणि प्रपृतीच्या माणसांसोबत काम करणे म्हणजे मोठे अवघड काम, पण खांडेकरांनी आपल्या सचोटीने, वागण्या-बोलण्यातील निरलस वृत्तीने आणि शालीनतेने सर्वांशी उत्तम जुळवून घेतले आणि सर्वांचे ते आवडते स्वीय सहाय्यक बनले. सायकलवरून जाणारा पंतप्रधानांचा सचिव हे बघण्याचे भाग्य त्यावेळी दिल्लीकरांना लाभले. सत्तेच्या अगदी वरिष्ठ वर्तुळामध्ये राम खांडेकर यांचा संचार होता. कायम सत्तेच्या धुंदीत असलेली दिल्ली भल्याभल्यांना बिघडवते, परंतु राम खांडेकर यांनी त्यांचा संपूर्ण कार्यकाळ एका निरलसपणे आणि प्रामाणिकपणे घालवला. पण पुठल्याही गैर गोष्टीमध्ये ते अडकले नाहीत. 1962 मध्ये दिल्लीच्या प्रदर्शनातून स्वतःच्या पैशाने घेतलेला कश्मिरी कलापुसरीचा लाकडी सोफा लोकांना दाखवण्यात धन्यता मानणारे राम खांडेकर हे दिल्लीच्या सत्तावर्तुळात निराळेच ठरले. खरे तर अशा सत्शील, चारित्र्यसंपन्न व्यक्तीच्या घरातील शोभा वाढवण्याचे भाग्य लाभले म्हणून स्वतः सोफ्यानेही धन्यता मानली असेल. याउलट आताच्या घडीला काय बघायला मिळते, तर उच्च पदावर आपली वर्णी लागावी म्हणून वर्ष-दोन वर्षं आधीपासूनच ‘सेटिंग’ लावणारे प्रशासनातील अधिकारी आणि त्यांच्यासाठी घायपुतीला येणारे नेते-मंत्री. अशा पार्श्वभूमीवर राम खांडेकर यांची उंची अधिकच भासते. जवळपास पाच दशकांचे मुंबईपासून तर दिल्लीपर्यंतचे राजकारण- सत्ताकारणाचे साक्षीदार, सत्तेच्या दरबारी राजकारणात पटावरील हत्ती, घोडे, वजीर, प्यादी यांच्या हालचाली कशा रीतीने केल्या जातात त्या अगदी जवळून बघितलेले असे राम खांडेकर होते. त्यामुळे म्हटले तर प्रचंड दारूगोळा त्यांच्याजवळ जमा झालेला होता. तो त्यांनी लेखनामध्ये वापरला असता तर सनसनाटी म्हणून लोकांनाही ते सर्व वाचायला आवडले असते. किंबहुना आपले लेखनमूल्य वाढावे, प्रसिद्धी मिळावी म्हणून इतर अधिकाऱयांनी आपल्या लिखाणामध्ये अशा स्पह्टक गोष्टींचा वापर पुरेपूर केला आहे. राम खांडेकर यांनी मात्र वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून, पुस्तकात लिहिलेल्या आपल्या लिखाणामध्ये विनाकारण असा पुठलाही स्पह्टकपणा न आणता अत्यंत सकारात्मक आणि संयतपणे वाचकांच्या अनुभवात आणि ज्ञानात भर घालणारे लिखाण केले. सोबत काम केलेल्या नेत्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांचे अनेक नवीन पैलू लोकांसमोर सादर केले. राज्याच्या, देशाच्या जडणघडणीमध्ये वरच्या थरातील सत्तेच्या आतील वर्तुळात कशारीतीने निर्णय घेतले जातात, मोठमोठय़ा घटना, गोष्टी कशा घडतात याची अगदी मनोज्ञ माहिती त्यांनी अगदी सहज आणि सोप्या भाषेत वाचकांना करून दिली. त्यांच्या सत्शील आचरणाचे आणि नैतिकतेचे इतके वजन होते की, प्रसंगी मोठय़ा सत्ताधीशांनी आपण घेतलेले निर्णय, ठरवलेले कार्यक्रम खांडेकरांच्या सांगण्यावरून बदलले होते. आपल्या सात्त्विक आणि पृतार्थ जीवनाचा आदर्श जनतेसमोर ठेवून राम खांडेकर यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांचा आदर्श देशाच्या शासन आणि प्रशासनाच्या इतिहासात कायम राहील.