बी पॉझिटिव्ह – साखर खाल्लेला माणूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शब्दांकन – निनाद पाटील

‘प्रशांत दामले’ हे दोन शब्द माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. हे मी खूप जबाबदारीने बोलतोय. 2016 साली त्यांच्याशी झालेल्या व्यावसायिक पातळीवरच्या परिचयाचे रूपांतर आज सहा-सात वर्षांत अनेक नात्यांच्या पदरात अलवारपणे झालेले आहे.

आपण बोलता बोलता म्हणतो ना की, हा त्या क्षेत्रातला ‘बच्चन’ आहे, हा या क्षेत्रातला ‘बच्चन’ आहे, तसं मला प्रशांत दामले हे सर्वार्थाने ‘बच्चन’ वाटतात. वय हा त्यांच्यासाङ्गी केवळ आकडा आहे. वयाची साङ्गी पार केलेला हा कलाकार जेव्हा दिवसाला तीन प्रयोग करत 16 वर्षांच्या मुलाला लाजवेल अशी तुफन बॅटिंग करतो ना रंगमंचावर, तेव्हा व्यक्त व्हायला शब्द नाही मिळत.

‘साखर खाल्लेला माणूस’, ‘किचन कलाकार’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘तू म्हणशील तसं’, ‘आम्ही सारे खवय्ये’ आणि आता येऊ घातलेलं नवीन नाटक ‘नियम व अटी लागू’ अशा अनेक प्रोजेक्टवर त्यांच्यासोबत मला काम करता आलं हे माझं भाग्य. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या सोबत ऑनलाइन केलेले वैविध्यपूर्ण प्रयोगसुद्धा मला बरंच काही शिकवून गेले. एखाद्या व्यक्तीमध्ये ऊर्जा, तीसुद्धा सकारात्मक ऊर्जा किती असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत दामले. गेली जवळ जवळ चार दशके ते या क्षेत्रात कार्यरत आहेत, पण त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत.

लॉकडाऊनमध्ये जेव्हा मनोरंजन सृष्टी जवळपास ङ्खप्प झाली होती, त्या वेळेला 40 बॅकस्टेज आर्टिस्टना कित्येक महिने प्रशांत दामले ङ्खरावीक रक्कम उदरनिर्वाहाकरिता देत होते. उजव्या हाताने दिलेले डाव्या हातालादेखील कळू नये असं म्हणतात, पण त्यांनी उजव्या हाताने दिलेले दान त्यांच्या उजव्या हातालासुद्धा कळू नये अशी काळजी ते घेत असतात. बऱयाच जणांना विविध मार्गाने मदत करत असतात.
रंगभूमीवर कसं प्रेम करावं हे त्यांच्याकडून मी शिकलो. ते म्हणतात की, आपापल्या क्षेत्रात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर तगडा आत्मविश्वास हवाच हवा, पण त्या जोडीला किंचितशी बेफिकिरीसुद्धा हवी. अर्थातच चांगल्या अर्थाने. आपण आपल्या पेशाशी फार प्रामाणिक राहायला पाहिजे. कामाव्यतिरिक्तचा मोकळा वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त आपल्या स्वतःच्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगल्या अर्थाने कसा वापरता येईल हे पाहत राहायला हवं.

बरं, हे काही त्यांनी मला हात धरून, पाटीपुस्तक घेऊन गिरवून शिकवलं नाही. हे त्यांच्या सहवासातून मी टिपून घेतलं. ‘सारखं काहीतरी होतंय’च्या निमित्ताने जेव्हा मी दिग्दर्शन करत होतो तेव्हा माझ्या वयापेक्षा त्यांच्या कारकीर्दीचा आकडा मोङ्गा होता. इतकं असूनदेखील एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे ते ऐकत वागत राहिले. माझ्यासारख्या परभणीहून आलेल्या मुलाला इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सहवास मिळाला. कदाचित अतिशयोक्ती वाटेल वाचून, पण मनापासून सांगतो, जसा तुकारामांसाङ्गी पांडुरंग तसं संकर्षण कऱ्हाडेसाठी प्रशांत दामले!

त्यांना काय गुरुदक्षिणा देऊ, असा प्रश्न माझ्या मनात डोकावतो तेव्हा मी इतकंच म्हणतो की, मी जोवर जिवंत आहे तोपर्यंत रंगभूमीवर कार्यरत राहीन. अधिकाधिक प्रेम आणि निष्ठा रंगभूमीशी ङ्खsवीन. जाता जाता इतकंच म्हणेन की, पस्तीस वर्षे हा नाटकामधला अढळ हुकमी एक्का घेऊन आलाय, ‘साखर खाल्लेला माणूस’ असा शिक्का! एवढी वर्षे काम करून अजूनही तीच भूक आहे, दामलेंना स्टेजवर पाहणं म्हणजे सुख आणि सुख आहे.