मुद्दा – घातक नव्हे तारक!

1212

हिंदुत्वाचा विचार देशाला घातक असल्याचे विधान एका पक्षाच्या श्रेष्ठांनी केल्याचे वाचनात आले. राज्यात जातीपातीचे राजकारण करण्यात हातखंडा असणाऱ्या या नेत्यांनी असे विधान करण्यात नवल नाही. त्यांच्याच पक्षातील अनेक नेते त्यांची छत्रछाया सोडून ज्यांना ते घातक ठरवत आहे अशा पक्षांना जाऊन मिळत आहेत. त्यामुळे एवढी वर्ष त्यांच्यावर हिंदुविरोधी संस्कार करण्यात हे कमी पडले असेच म्हणावे लागेल. दुसरी बाब म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम’ची शिकवण देणाऱ्या आणि जगातील सर्वात सहिष्णू धर्म असलेल्या हिंदुत्वाचा विचार घातक कसा असू शकेल? ज्या विचारांना ते घातक ठरवत आहेत त्याच विचारांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे सर्वार्थाने कल्याण साधणाऱ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजही जगात आदर्श राज्यव्यवस्था म्हणून  ‘रामराज्या’चा उल्लेख केला जातो. हिंदुत्व हेच मूळ असणाऱ्या असणाऱ्या भारतभूमीत एकेकाळी सोन्याचा धूर निघत असल्याचे म्हटले जाते. इस्लामी आक्रमकांनी आणि त्यानंतर आलेल्या इंग्रजांनी देशाचे सारे वैभव लुटून नेले. या लुटारूंच्या धर्माचा विचार हिंदुत्वाच्या विचाराहून श्रेष्ठ नक्कीच नाही. ज्या विचारांचे शल्य यांना बोचत आहे त्या हिंदुत्वाच्या विचारांच्या पक्षांवर देशवासीयांनी विश्वास दाखवून देशाची आणि राज्याची सत्ता बहाल केली आहे. हिंदुत्वाचा विचार हा कधीच घातक नसून देशासाठी नेहमी तारकच ठरलेला आहे.

>> जगन घाणेकर

आपली प्रतिक्रिया द्या