लेख : स्टेम सेल दात्यांची वाढती गरज

669

>> डॉ. श्रीनाथ क्षीरसागर

स्टेम सेल उपचार पद्धतीत प्रत्येक दाता महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक HLA गट हा असाधारण असतो आणि म्हणूनच स्टेम सेलची गरज असलेल्या पुणा रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणारा तो एकमेव पर्याय असू शकतो. सध्या देशामध्ये सुमारे 2.8 लाख जणांनी स्टेम सेल दाता म्हणून आपले नाव नोंदवले आहे. हिंदुस्थानी आरोग्य व्यवस्थेवरील रक्ताचा कर्परोग आणि रक्तविकारांचा भार पाहता या संख्येमध्ये दहापट वाढ होण्याची गरज आहे. स्टेम सेल दानाभोवती असलेल्या भ्रामक कल्पना दूर केल्या जातील आणि अगदी किंचित दुखणे अंतर्भूत असलेल्या स्टेम सेल दानामुळे एखादे आयुष्य वाचू शकते या वास्तवाचा लोक स्वीकार करतील तेव्हाच हे शक्य होईल

स्टेम सेल्सच्या वापराची नवी वाट रोगव्यवस्थापनाचा चेहरा हळूहळू बदलून टाकत आहे. या ‘चमत्कारी’ मानवी पेशींमध्ये पुनर्रचनेच्या आणि कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये परिवर्तित होऊन अनेक प्रकारच्या रोगांवर इलाज करण्याच्या परिवर्तनशील क्षमता दडल्या आहेत. एम्रबॉयोनिक आणि का@र्ड स्टेम सेल उपचार पद्धतीवर प्रयोगशाळांमध्ये सखोल संशोधन सुरू असतानाच स्टेम सेल ट्रान्सप्लॅन्टेशनच्या पद्धतीचा वापर जगभरामध्ये विविध आजार आणि रक्ताचा कर्परोग यांवरील उपचारांसाठी केला जात आहे. रक्ताचा कर्परोग आणि थॅलसेमिया, सिकल सेल ऑनिमिया आणि ए प्लॅस्टिक ऑनिमिया अशा अनुवांशिक रक्तविकारांशी झगडणाऱ्या हजारो रुग्णांसाठी बोन मॅरो किंवा पेरिफेरल ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लॅन्ट हे एकमेव आशास्थान आहे. या प्रक्रियांमध्ये रुग्णांच्या शरीरातील नष्ट झालेल्या पेशींच्या ठिकाणी त्यांच्या पुटुंबातील किंवा बिगरनात्याच्या, स्वेच्छेने पेशीदान करू इच्छिणाऱ्या दात्याकडून  निरोगी, रक्त तयार करणाऱ्या पेशीचे (स्टेम सेल्स) रोपण केले जाते.

बोन मॅरो स्टेम सेल ट्रान्सप्लॅन्टमध्ये दात्याच्या बोन मॅरोमधून घेण्यात आलेल्या रक्त तयार करणाऱ्या स्टेम सेल्स दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येतात आणि नंतर रुग्णाच्या शरीरयंत्रणेमध्ये त्यांचे रोपण केले जाते, तर पेरिफेरल ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लॅन्टमध्ये दात्याच्या शरीराच्या बाह्यपरिघामध्ये प्रवाहित असणाऱ्या रक्तामधून (पेरिफेरल ब्लड फ्लो) रक्त तयार करणाऱ्या स्टेम सेल्स काढून घेतल्या जातात. सध्याच्या काळात 95% स्टेम सेल ट्रान्सप्लॅन्ट्स ही पेरिफेरल ब्लड स्टेम स्टेल्सचा वापर करून केली जातात.

कोणत्याही तरुण आणि निरोगी व्यक्तीला हिंदुस्थानातील प्रमुख स्टेम सेल रजिस्ट्रींपैकी कोणत्याही एका ठिकाणी आपले नाव नोंदवून आपल्या स्टेम सेल्स दान करता येतील. या रजिस्ट्री एकमेकाRशी उत्तमरीत्या जोडलेल्या आहेत, त्यांचे कामकाज पारदर्शी पद्धतीने चालते आणि गरजेच्या वेळी, आपण दान केलेल्या स्टेम स्टेल्सच्या प्रमाणात ते मिळण्याची हमी त्या देतात.

बोन मॅरो दानासाठी, दात्याला एका शस्त्रक्रियेसारख्या प्रक्रियेतून जावे लागते. यात दात्याला भूल द्यावी लागते व त्यानंतर पेल्व्हिसच्या मागच्या भागातून बोन मॅरो काढून घेतला जातो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला किंचित अस्वस्थता जाणवू शकते. मात्र ती बोन मॅरो ट्रान्सफर झाल्यानंतरच्या दोन आठवडय़ांच्या आत नाहीशी होते. यादरम्यान झालेली स्टेम सेल्स आणि बोन मॅरोची क्षती 2-3 आठवडय़ांत पूर्णपणे भरून निघते.

दुसऱ्या पद्धतीमध्ये रक्तप्रवाहातील स्टेम सेल्स काढून घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये इच्छुक दात्याच्या रक्तातील स्टेम सेल्सची संख्या वाढविण्यासाठी त्याला ग्रॅन्युलोसाइट्स का@लनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर (GCSF) नावाचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन सलग पाच दिवस दिल्यानंतर स्टेम सेल्स गोळा केले जातात. स्टेम सेल्स गोळा करण्यासाठी या पद्धतीला प्राधान्य दिले जाते त्यासाठी भूल द्यावी लागत नाही आणि रुग्ण दाता त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. ही प्रक्रिया रक्तदानाच्या प्रक्रियेशी मिळतीजुळती आहे.

ट्रान्सप्लॅन्टनंतर दात्याच्या स्टेम सेल्सचा वापर करून रुग्णाचे रक्त आणि रोगप्रतिकारक यंत्रणेला नवसंजीवनी मिळते व त्यामुळे त्याचा आजार बरा होण्याची शक्यता वाढते (उदा. ट्रान्सप्लॅन्टमुळे थॅलेसेमिया आणि ए प्लॅस्टिक ऑनिमियाच्या रुग्णांचा आजार बरा होण्यात यश मिळाल्याचे प्रमाण 70-80 टक्के आहे) किंवा रुग्ण वाचण्याचे प्रमाणही वाढते (उदा. मल्टिपल मायलोमा आणि ल्युकेमियाच्या रुग्णांमध्ये हे प्रमाण 50-60 टक्क्यांनी वाढले आहे).

स्टेम सेल दाता म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी ह्युमन ल्युकोसाइट अँटिजन (HLA) टायपिंग नावाची एक छोटीशी चाचणी केली जाते. भविष्यात ट्रान्सप्लॅन्टच्या वेळी रुग्ण आणि दात्याचा रक्तगट जुळविणे हा या चाचणीचा हेतू असतो. फक्त 20-30 टक्के रुग्णांना संपूर्णपणे जुळणाऱ्या रक्तगटाचा दाता आपल्याच पुटुंबातून मिळतो अन्यथा बहुतांश रुग्ण हे बिगरनात्यातील दात्यांवरच अवलंबून असतात.

स्टेम सेल उपचार पद्धतीत प्रत्येक दाता महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक HLA गट हा असाधारण असतो आणि म्हणूनच स्टेम सेलची गरज असलेल्या पुणा रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणारा तो एकमेव पर्याय असू शकतो. सध्या देशामध्ये सुमारे 2.8 लाख जणांनी स्टेम सेल दाता म्हणून आपले नाव नोंदवले आहे. हिंदुस्थानी आरोग्य व्यवस्थेवरील रक्ताचा कर्परोग आणि रक्तविकारांचा भार पाहता या संख्येमध्ये दहापट वाढ होण्याची गरज आहे. स्टेम सेल दानाभोवती असलेल्या भ्रामक कल्पना दूर केल्या जातील आणि अगदी किंचित दुखणे अंतर्भूत असलेल्या स्टेम सेल दानामुळे एखादे आयुष्य वाचू शकते या वास्तवाचा लोक स्वीकार करतील तेव्हाच हे शक्य होईल.

एखाद्या इच्छुक दात्याने आपले नाव नोंदवल्यानंतर प्रत्यक्ष स्टेम सेल दान करण्याची गरज उद्भवेल तेव्हा आपल्या बांधिलकीला जागणेही महत्त्वाचे आहे. अशा दात्यांच्या पुटुंबातील व्यक्तींनी त्यांना हे दान करण्यासाठी पाठिंबा व प्रोत्साहन देणेही महत्त्वाचे आहे.

ज्या-ज्या व्यक्तींनी स्टेम सेल दान करून आयुष्ये वाचवली आहेत त्यांच्या मते या अनुभवाने त्यांच्या मनामध्ये आनंद आणि समाधानाची पेरणी केली आहे. तरुण आणि निरोगी हिंदुस्थानींनी पुढाकार घेऊन स्टेम सेल्स दान करून आयुष्ये वाचविण्याची तसेच त्यांनी घेतलेल्या या शपथेला त्यांच्या पुटुंबीयांनी पाठिंबा देण्यासाठीची हीच वेळ आहे.

(लेखक हेमॅटोलॉजिस्ट आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या