तालिबानच्या हिट‘लिस्ट’वर…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजीव मुळ्ये

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पाश्चात्त्य वृत्तसंस्थेची महिला पत्रकार बुरखा घालून वार्तांकन करताना दिसली, यावरून पत्रकार तिथे कोणत्या परिस्थितीत काम करतात याचा अंदाज यावा. ज्याप्रमाणे अमेरिकेला मदत करणारे अफगाण नागरिक तालिबानच्या ‘हिट “ लिस्ट’वर आहेत, तशीच त्यांनी पत्रकारांची एक “ लिस्ट’ तयार केली असल्याची बातमी आहे. ही यादी बरीच मोठी असून यादीतील पत्रकारांचा शोध तालिबानी घेत आहेत, असे सांगितले जाते.

कोरोनासारखा महासंसर्ग असो, निदर्शने-आंदोलने असोत, दंगली असोत वा युद्धजन्य स्थिती असो… सोफ्यावर बसून शांतपणे पेपरात वाचताना किंवा जेवता जेवता टीव्हीवर पाहताना या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचविणारे पत्रकार कोणत्या परिस्थितीत काम करतात, हा विचार अभावानेच मनात येतो. कधी-कधी परिस्थिती अचानक बदलते, आटोक्याबाहेर जाते आणि पत्रकारांना मोठी जोखीम पत्करून बदललेली परिस्थितीही वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी लागते. अफगाणिस्तानात फारसा संघर्ष न होता तालिबान्यांनी काबूल ताब्यात घेऊन सत्तांतर घडविले, तेव्हा विमानतळावर सैरावैरा धावणारी माणसे, एसटीप्रमाणे विमानाला लटपून प्रवास करताना उंचावरून पडलेली माणसे याबरोबरच अम्युझमेन्ट पार्पपासून जिमपर्यंत सर्वत्र विजयोन्माद करणारे तालिबानी आपण पाहिले. काबूलमधील ब्युटी पार्लर बंद पडली आणि हिजाब-बुरखा विकणाऱयांची संख्या वाढली ही बातमीही आपण पाहिली, परंतु हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचविणारे पत्रकार या परिस्थितीत कसे काम करत असतील, याचाही विचार करणे गरजेचे आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पाश्चात्त्य वृत्तसंस्थेची महिला पत्रकार बुरखा घालून वार्तांकन करताना दिसली, यावरूनच पत्रकार कोणत्या परिस्थितीत काम करतात याचा अंदाज यावा.

काबूल ताब्यात घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद म्हणाला, “आम्हाला विरोध करणाऱया सर्वांना आम्ही माफ केले आहे, कारण अफगाणिस्तानात शांतता नांदण्यासाठी, स्थिरतेसाठी ते आवश्यक आहे.’’ यातील ‘शांतता आणि स्थिरता’ हे शब्द तालिबान्यांना किती आवडतात हे जगाला ठाऊक आहे. जबीउल्लाहची पत्रकार परिषद सुरू असतानाच तालिबानी काबूलच्या रस्त्यावर त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवत होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱया शबनम खानचा व्हिडीओ सर्वांनी पाहिला. “तालिबानच्या विजयानंतरही मी काम करतच राहिले, परंतु दुसऱयाच दिवशी ऑफिसच्या गेटवर तालिबान्यांनी मला अडवले. ‘‘आता सरकार बदलले आहे. तू इथे काम करू शकत नाहीस असे म्हणून त्यांनी मला घरी पाठविले’’ असे सांगणारी शबनम या व्हिडीओत दिसते. तालिबानच्या विजयापासूनच अफगाणिस्तानात पत्रकारांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली. महिला पत्रकारांवर तर तालिबानने बंदीच घातली आहे. तालिबानच्या विरोधात जलालाबाद येथे रॅली काढण्यात आली, तिचे वार्तांकन करणाऱया पत्रकाराला तालिबान्यांनी बेदम मारले.

तालिबानच्या तावडीतून सुटण्यासाठी अफगाण नागरिक जागतिक समुदायाकडे आशेने पाहत आहेतच; परंतु आता तर ती वेळ पत्रकारांवरही आली आहे. ‘‘सर्व देशांनी येथील पत्रकारांच्या बचावासाठी पुढे यावे’’ असे आवाहन अफगाणिस्तानातील पत्रकारांच्या संघटना करू लागल्या आहेत. तालिबान्यांची रसद संपल्यामुळे ते तेथील नागरिकांच्या घरातील चीजवस्तूंची, अन्नधान्याची, वाहनांची लुटालूट करू लागले आहेतच; शिवाय खंडणीही मागू लागलेत. परिणामी, त्यांचे क्रौर्य वाढत जाईल अशीच चिन्हे आहेत. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे ती तेथील पत्रकारांमुळे, परंतु ही स्थिती फार काळ कायम राहणार नाही. तालिबानी दहशतवादी माध्यमांच्या प्रतिनिधींना आताच धमकावू, मारू लागले आहेत. तालिबानच्या भीतीमुळे काही पत्रकारही लपून बसले आहेत किंवा देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत अशीही माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यासाठी वेगवेगळ्या देशांचा व्हिसा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अफगाणिस्तानच्या भवितव्यात स्वतंत्र माध्यमे मोठी भूमिका बजावतील असे तालिबानचा प्रवक्ता म्हणतो; पण तालिबानची पृती स्वतंत्र माध्यमांचा गळा दाबणारीच असल्याचे दिसते.

तालिबानने सत्ता हाती घेताच महिला टीव्ही अँकर्सना बंदी घातली आहे. माध्यमांसाठी अद्याप कोणताही आदेश तालिबानने काढला नसला तरी त्यांना ‘आचारसंहिता’ ठरवून दिली जाईल अशीच चिन्हे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्त पत्रकारितेला तालिबान पाठिंबा देईल हे दिवास्वप्नच! स्थानिक माध्यमांमधील जी मोठी आणि सक्षम आहेत, त्यात काम करणाऱया महिला सर्व बंदी आदेश धुडकावून काम सुरूच ठेवायचे अशा मताच्या आहेत आणि त्या आजही काम करीत आहेत असे प्रसिद्ध झाले आहे, परंतु उद्याचे पुणी सांगावे? तालिबानने एकेक करून अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांवर ताबा मिळविला तसतशी तेथील माध्यमांची कार्यालये बंद झाली. काबूलमध्ये काही मोठी माध्यमगृहे सुरू आहेत. कदाचित तालिबानलाही काही गोष्टी जगासमोर येऊ द्यायच्या असतील, परंतु तालिबानला विविध ठिकाणी होणारा विरोधसुद्धा माध्यमांच्या पॅमेऱयात पैद होत असताना तालिबानी गप्प कसे राहतील? तालिबानच्या प्रवक्त्याच्या बोलण्यातील ‘स्वतंत्र माध्यमे’चा अर्थ एवढय़ावरून समजायला हरकत नसावी.

पत्रकारांनी लपून बसणे किंवा देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करणे यामागे कोणती भीती दडली असावी हे उघड आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेला मदत करणारे अफगाण नागरिक तालिबानच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत, तशीच त्यांनी पत्रकारांची एक ‘लिस्ट’ तयार केली असल्याची बातमी आहे. ही यादी बरीच मोठी असून यादीतील पत्रकारांचा शोध तालिबानी घेत आहेत, असे सांगितले जाते. ही सांगोवांगी माहिती नाही. डॉयचे वेले नावाच्या जर्मन माध्यम समूहाच्या एका पत्रकाराच्या घरी तालिबानी दहशतवादी गेले. तो सापडला नाही म्हणून शेजाऱयांच्या आणि आसपासच्या अन्य घरांमध्ये शोधाशोध सुरू केली. या पत्रकाराचे दोन नातेवाईक तालिबान्यांना सापडले. त्यांना तातडीने गोळ्या घालण्यात आल्या. त्यातील एकाचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानात गेलेले परदेशी पत्रकार आणि त्यांचे नातेवाईक किती मोठय़ा संकटात आहेत, याचा स्पष्ट अंदाज यावरून येतो. तालिबान्यांच्या टोळ्याच काबूल आणि अन्य ठिकाणी शिकाऱयांप्रमाणे पत्रकारांना शोधत आहेत. वस्तुतः ज्यावेळी तालिबानने काबूलकडे मोर्चा वळविला, तेव्हाच त्यांनी पत्रकारांना टिपायला सुरुवात केली. तालिबान काबूलमध्ये येण्यापूर्वीच काही पत्रकार अफगाणिस्तानातून बाहेर पडू लागले. त्यातील काही हिंदुस्थानातही आले.

अफगाणिस्तानात जेवढे पत्रकार जिवावर उदार होऊन अजूनही काम करीत आहेत, त्यांच्यामुळे किमान एवढय़ा घटना तरी आपल्याला समजत आहेत, परंतु आपल्याला मिळत असलेली माहिती हे हिमनगाचे केवळ टोक असावे असे तेथील परिस्थितीवरून म्हणता येते. पत्रकारांना ठार मारण्याबरोबरच काही पत्रकारांचे अपहरणही तालिबान्यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीत काम करणाऱया नेमातुल्लाह हेमात या पत्रकाराला तालिबान्यांनी असेच उचलून नेले. त्याचप्रमाणे अमदादउल्लाह हमदर्द या पत्रकाराला जलालाबादमध्ये ठार मारण्यात आले. हा पत्रकारही जर्मनीतील माध्यम समूहासाठी काम करीत होता. दानीश सिद्दिकी या हिंदुस्थानी छायाचित्रकाराचा मृत्यू कोण विसरेल? प्रथम सिद्दिकी यांचे निधन झाले एवढीच बातमी आली होती, परंतु त्यांनाही तालिबान्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने, हाल हाल करून ठार मारल्याचे नंतर पुढे आले. त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेह वाहनांखाली चिरडला गेला होता अशीही माहिती मिळाली. या गोष्टी ऐपून एवढी क्रूरता यांच्यात येते पुठून? असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो.

या आपल्याला समजलेल्या केवळ मोजक्या घटना आहेत. प्रत्यक्षात अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती अशी आहे की, पत्रकारांची कोणतीही संघटना आजमितीस अफगाणिस्तानात परिस्थितीची शहानिशा करण्यासाठी पथक पाठवू शकत नाही. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानातील खरी परिस्थिती जशीच्या तशी आणि सविस्तरपणे जगासमोर मांडण्याचे धाडसही आज तेथील कोणताही पत्रकार करू शकत नाही. जर्मनीतील पत्रकार संघटनांनी आणि माध्यम संस्थांनी सरकारला खुले पत्र लिहून अफगाणिस्तानात काम करणाऱया कर्मचाऱयांना तातडीचा व्हिसा देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे युद्धे आणि युद्धपैद्यांविषयी काही आंतरराष्ट्रीय नियम, करार आहेत तसेच पत्रकारांसाठीही काही नियम आणि यंत्रणा आहेत, परंतु तालिबानची जोरदार आगेपूच सुरू असताना अशा नियम आणि यंत्रणांचा वापर झाल्याचे दिसले नाही. अफगाणिस्तानात तालिबानने निर्माण केलेली परिस्थिती ‘युद्धजन्य’ असली तरी पारंपरिक युद्धांपेक्षा तेथील वातावरण खूपच वेगळे आहे. पुराणमतवादी शासकांकडे त्या देशाचा ताबा गेला आहे. नव्या शासकांना मोजके देश वगळता जगातून पुणाचा पाठिंबा नाही. अशा स्थितीत नियम पाळण्याची सक्ती कोण पुणावर करणार? हा प्रश्नच आहे. वाघाच्या गुहेत जाणाऱया प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसतात; पण बाहेर पडणाऱया पावलांचे ठसे दिसत नाहीत, तसेच अफगाणिस्तानात वार्तांकन करणाऱया पत्रकारांचे होणार का? या चिंतेने जगभरातील अनेक माध्यम संस्था, पत्रकार संघटना आणि पत्रकारांच्या पुटुंबीयांची गाळण उडाली आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)