
>>> शुभांगी बागडे
अनुवाद प्रक्रिया ही सर्जनशील लेखनाएवढीच महत्त्वाची असते. देश आणि भाषांच्या सीमा ओलांडून साहित्याचे, संस्कृतीचे आदानप्रदान होण्यास भाषांतर हे माध्यम ठरते. आता जगभरात भाषांतर विद्या शाखा ही साहित्य अभ्यासातली महत्त्वाची विद्या शाखा मानली जाते. अनुवादाचे हे महत्त्व जाणून मराठी भाषेतील अनुवाद क्षेत्राचा वेध घेणारा लेख.
भाषांतराच्या माध्यमातून देश आणि भाषांच्या सीमा ओलांडून एक व्यापक परिचय करून दिला जातो. हे असते साहित्याचे, संस्कृतीचे आदानप्रदान.अपरिचित भाषा आणि संस्कृतींमधील संवाद घडवण्यासाठी तसेच इतर भाषिक समाजातील समूहांच्या जगण्याचे अर्थ लावणे, याबाबत तौलनिक जाण निर्माण करणे यासाठी भाषांतर निश्चितच उपयोगी ठरते. भाषांतरात भाषा हा मुख्य घटक असला तरी भाषेशिवाय त्या साहित्याचे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पैलू पाहिले गेले पाहिजेत. तसेच त्याचा निरंतर आणि सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. एक साहित्यकृती दुसऱया भाषेत भाषांतरित होते म्हणजे काय घडते? या प्रश्नाची गांभीर्याने चिकित्सा केली तर मानवी इतिहासातून मनोरंजक आणि उद्बेधक तपशीलही आपल्याला सापडू शकतात.
भाषांमध्ये तयार होणारं ज्ञान हे त्या त्या भाषेच्या इतिहासाने आणि परंपरेने एकत्रित झालेल्या संचिताच्या पायाकर आधारलेले असते. या ज्ञानात त्या-त्या भाषा समूहातल्या रीतिरिकाज, परंपरा, मौखिक व लिखित साहित्य, तिथली भौगोलिक परिस्थिती, त्यांचा संघर्ष अशा बऱयांच गोष्टींचा समावेश होतो. त्यातूनच त्या भाषिक समाजाच्या संस्कृतीची ओळख होते. पिढय़ान्पिढय़ांच्या एकत्रित अनुभवाचं ते संचित असतं.
आपलं भाषा टिककण्याविषयीचं धोरण धूसर असून जे आहे. भाषाप्रेम उत्सकी होऊन गेलेलं आहे. भाषा काचकणं, भाषा-भाषांचं जाळं मजबूत करणं आणि आजच्या काळात व्यापारी रेटय़ात आपली भाषा टिकवण्याचा प्रयत्न करणं हा प्राधान्याचा विषय असला पाहिजे. हे केलळ मराठीपुरतेच सीमित नाही तर ही परिस्थिती इतर प्रांतांतलीसुद्धा आहे. मेघालयातल्या गारो आणि खासी, मिझोराममधल्या मिझो आणि त्रिपुरातल्या कोवबोरोकसारख्या भाषांचीही आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. आजच्या काळातला नागरिक हा एकाच केळी मातृभाषेसह, अनेक भाषांसह आणि अनेक भाषांच्यात जगत आहे. अशा केळी क्यापक हेतू ठेवून आपल्या भाषेच्या दृष्टीनंही भाषा किकेक पाळणं आकश्यक आहे.
भाषाभाषांमधील संवाद माणसाच्या जगण्यालाच समृद्ध करत असतो. विविध भाषांच्या आदान-प्रदानातून एका भाषेची संस्कृती दुसऱया भाषेच्या संस्कृतीत सहज मिसळून जाते. यातूनच या विविध संस्कृतीचे एक वैश्विक नाते निर्माण होते. या पार्श्वभूमीवर त्या त्या भाषेतील वाङ्मयीन साहित्य अनुवाद प्रक्रियेला आणि त्यासंदर्भातील कामाला अधिक महत्त्व प्राप्त होते. मराठी साहित्य भाषा व्यवहारात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे चालविण्यात येणाऱया ‘मायमावशी’ भाषांतरविषयक नियतकालिकाचा याबाबत आवर्जून उल्लेख करायला हवा. अनुवादक, कवी असलेल्या गणेश विसपुते यांच्या संपादनाखाली सध्या ‘मायमावशी’द्वारे उत्तमोत्तम साहित्य रसिक वाचकांसाठी उपलब्ध होत आहे आणि वाचकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
भाषांतर व्यवहारातून हिंदुस्थानी भाषांतील साहित्याचा परस्पर परिचय व्हावा ही आंतरभारतीच्या संकल्पनेत साने गुरुजींची अपेक्षा होती. त्याच तळमळीतून स्वत: गुरुजींनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले होते. त्या संकल्पनेतून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा एक उपक्रम म्हणून रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मदिनी 7 मे 2006 रोजी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यावेळी विख्यात गुजराती कवी सुरेश दलाल, जितेंद्र भाटिया, वीणा आलासे, मंगेश पाडगावकर, प्रमोद तलगेरी यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ अनुवादक रामदास भटवळ, लेखक अर्जुन डांगळे, संपादक सुनील कर्णिक, साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक पुष्पा भावे, कवयित्री नीरजा आणि स्मारकाचे विश्वस्त यांनी एकत्रितपणे केंद्राचे काही उपक्रम आखले आणि पूर्णत्वास नेले. 2006 सालापासून आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राने विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यातला ‘साहित्य संवाद’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे. दर दोन वर्षानी हिंदुस्थानी भाषांमधील लेखकांना निमंत्रित करून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत कमलेश्वर, गिरीश कर्नाड, इंदिरा गोस्वामी, विष्णू खरे, मंगलेश डबराल, गणेश देवी, प्रबोध पारेख असे अनेक ज्येष्ठ साहित्यिक सहभागी झालेले आहेत.
आपल्या भाषेची अभिवृद्धी प्रामुख्याने भाषांतरांनी झालेली आहे. मराठीतील भाषांतरवार, लेखक-भाषांतरवार, अभ्यासक, काचक आणि विद्यार्थ्यांसाठी गंभीरपणे या क्षेत्रात काम करणारे जर्नल आवश्यक आहे आणि गेली 11-12 वर्षे ते काम करण्याचा प्रयत्न ‘मायमावशी’ करत आहे. भाषेविषयी काम करणाऱया कलाकंताला भाषेची नुसती आस्था असून चालत नाही तर भाषेची जाणही लागते.
अनुवादाची आजची अशी परिस्थिती असतानाच्या काळात ‘मायमावशी’सारखा भाषांतर साहित्याचा उत्तम अंक मराठीत निघत आहे. ही विविध भाषा साहित्य संवादाची सकस उपलब्धी आहे.
पिढय़ान् पिढय़ांच्या एकत्रित जीवनानुभवाचं पुढच्या पिढीकडे देण्यासाठीचं ते संचित आणि साधनही असतं. हे सगळं विविध स्वरूपात त्या-त्या काळातल्या साहित्यात उमटत असतंच. म्हणजे भाषा हे आपल्यासाठी निव्वळ संप्रेषणापलीकडचं विश्वभान देणारं वास्तव असतं. एखादी भाषा ढिसाळपणे मरू देणं म्हणजे त्या भाषेतलं मौलिक संचित कायमसाठी नष्ट करणं. एखाद्या वेगळ्या भाषेतल्या साहित्यकृतीच्या भाषांतरातून आपल्याला त्या भाषेतल्या संचिताचा आयता ठेका मिळण्याची शक्यता असते. तो मूळ स्रोत टिकून राहिला तर आपल्याला संस्कृतीची जाळीदार नक्षी आणि वैविध्यातल्या सौंदर्याची ओळख होऊ शकेल.
– गणेश विसपुते
लेखक, अनुवादक, कवी, समीक्षक





























































