भाज्या आणि फळं

यकृताच्या सुरळीत कार्यासाठी आहारात लसणाचा समाकेश असणे उपयुक्त असते. लसणात सेलेनियम हा घटक असतो ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. याशिकाय लसणामुळे कोलेस्टेरॉल कमी राहण्यासही मदत होते.
दालचिनीमध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज असते. ज्याने यकृत निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात दालचिनीचा वापर करणे फायदेशीर असते.

यकृताचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी हळद गुणकारी आहे. त्यात करक्युमिन नावाचा घटक असतो तो गुणकारी असतो. हळदीमुळे यकृत तर साफ होतेच, पण चरबी कमी करण्यासही त्याची मदत होते.
लिंबामध्ये सायट्रिक ऑसिड असते. ते यकृत निरोगी राखण्यास मदत करते. एन्जाइमला सक्रिय करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो. यामध्ये जीकनसत्क ‘क’ असल्याने एन्जाइम काढण्यासाठी त्याचा फायदा होतो. यामुळे पचनशक्तीही सुधारत असल्याने दिकसातून एक ग्लास लिंबू सरबत प्याके.

यकृत निरोगी राखण्यासाठी नियमित बीट किंवा त्याचा रस प्यावा. रक्त शुद्ध होण्यासाठी बिटाचा उपयोग होतो. त्यामुळे बिटाचा ज्यूस किंका कोशिंबीर करून त्याचा आहारात समाकेश करू शकता.
आलुबुखार हे फळ खावे. आलुबुखार यामध्ये असलेल्या ऑण्टिऑक्सिडेण्टस् फ्री रॅडिकल्सपासून यकृताचा बचाव करते.
कच्चा कोबी किंवा कोबीची भाजी याचा आहारात समावेश असायला हवा.कोबीत असलेल्या सल्फर यकृतातील विषारी घटक दूर करते आणि यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते.